Maharashtra Breaking News LIVE : नवीमुबंईतील बेलापूर व्हीलेज स्मार्ट होणार – मंदा म्हात्रे

| Updated on: Jul 01, 2024 | 8:17 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 30 जून 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : नवीमुबंईतील बेलापूर व्हीलेज स्मार्ट होणार - मंदा म्हात्रे
Follow us on

दक्षिण आफ्रिकेला हरवून भारतीय संघ टी20 वर्ल्डकप जिंकून चँपियन बनताच विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनीही टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारतीय संघाच्या विजयानंतर पंतप्रधना नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या. एक व्हिडीओद्वारे नरेंद्र मोदींनी संघातील सर्वांचे अभिनंदन केले. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनीही टीम इंडियाचे या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. रोहितला संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानतो, असे ते म्हणाले.  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार पुण्यात येणार असून मोदीबागेतील कार्यलयात ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. मुंबई,ठाणे, पालघर आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात सुद्धा मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज असून रायगड,रत्नागिरी जिल्हयांना ऑरेंज अलर्ट तर सिंधुदुर्गात येलो अलर्ट जारी. मराठवाडा आणि विदर्भात मात्र पावसाची शक्यता कमी…हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याचा अंदाज. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 30 Jun 2024 06:32 PM (IST)

    वेरूळचा सीता न्हाणी धबधबा सुरू

    छत्रपती संभाजीनगर : वेरूळ लेणीमध्ये असलेला सीता न्हाणी धबधबा सुरू झाला आहे. हा धबधबा फक्त पाऊस पडल्यास प्रवाहीत होतो. पाऊस थांबला की धबधबा खंडित होतो. हा धबधबा सुरू झाला की पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. पावसाळ्यामुळे वेरूळ लेणीवर हिरवा गालिचा टाकल्याचा भास होतो. पावसाळ्यात खास करून वेरूळ लेणीवर आल्हाददायक वातावरण असते. आज रविवार असल्याने पर्यटक दिवसभर या भागात रेंगाळून निसर्गाचा आस्वाद घेतात.

  • 30 Jun 2024 06:19 PM (IST)

    मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी पदभार स्वीकारला

    राज्याच्या मुख्य सचिव पदी पहिल्या महिला अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुजाता सौनिक यांनी मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून पदभार स्वीकारला.  1987 बॅचच्या सनदी अधिकारी असलेल्या सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी अखेर वर्णी लागली आहे. यापूर्वी त्यांचे पती मनोज सौनिक यांनी देखील राज्याच्या मुख्य सचिव पदी कार्यभार सांभाळलेला होता.  जून 2025 पर्यंत सुजाता सौनिक राज्याच्या मुख्य सचिव म्हणून कार्यभार पाहणार आहेत.


  • 30 Jun 2024 03:37 PM (IST)

    नवीमुबंईतील बेलापूर व्हीलेज स्मार्ट होणार – मंदा म्हात्रे

    नवीमुंबई येथील बेलापूर मतदारसंघातील बेलापूर गाव आता स्मार्ट व्हीलेज करण्याच्या हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत. बेलापूर मतदारसंघात पावसाळ्या दरम्यान कोणतीही आपत्ती येऊ नये यासाठी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांसोबत आज पाहणी दौरा केला.

     

  • 30 Jun 2024 03:18 PM (IST)

    ओबीसी बांधवानो शांतता बाळगा – मनोज जरांगे यांचे आवाहन

    ओबीसी बांधवांनो शांतता बाळगा. तुमचे नेते तुमच्यासोबत खोटे बोलत आहेत. तुमच्या आधी मराठ्यांना आरक्षण आहे असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

  • 30 Jun 2024 03:06 PM (IST)

    लोणावळ्याचा भुशी डॅम ओव्हरफ्लो

    लोणावळ्यातला भुशी डॅम ओव्हरफ्लो झाला आहे. भूशी डॅम ओव्हरफ्लो झाल्याने पावसाळी पर्यटक मोठ्या संख्येने भूशी डॅमवर पर्यटक पावसाचा आनंद घेत आहेत आणि धबधबे अनुभवत आहेत. भुशी डॅमवर पर्यटक आपल्या फॅमिलीसोबत आनंद घेत आहेत.

  • 30 Jun 2024 02:45 PM (IST)

    जुहू बीचवर दोन तरुणांना बुडणाऱ्या तरूणांना वाचवलं

    मुंबईतील जुहू बीचवर दोन तरुणांना बुडण्यापासून वाचवण्यात यश आलं आहे. अथर्व (17) आणि श्रेयस (16) हे दोघेही आपल्या 3 मित्रांसह समुद्रकिनारी गेले होते. समुद्रकिनारी उपस्थित असलेल्या जीवरक्षकांनी दोघांनाही बुडण्यापासून वाचवले.  आज सकाळी 11 वाजताची ही घटना आहे.

  • 30 Jun 2024 02:30 PM (IST)

    पुणे पोलिसांची संभाजी भिडेंना नोटीस

    पुणे पोलिसांची संभाजी भिडेंना नोटीस देण्यात आली आहे. आज पालखीला मानवंदना करताना कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही. याची काळजी घ्या.  तेढ निर्माण करणारी भाषणे आज करू नका पोलिसांनी सूचना दिल्या आहेत. संत तुकाराम महाराजांच्या पालखीला संभाजी भिडे यांचे धारकरी मानवंदना देणार आहेत. दरवर्षी पालखी सोहळा पुण्यात आल्यावर शिव प्रतिष्ठानचे धारकरी मानवंदना देत असतात.  यापूर्वी भिडे गुरुजी समर्थकांनी आणले होते. वारीत शास्त्र त्यावरून वाद झाला होता.

  • 30 Jun 2024 02:15 PM (IST)

    अन् तिला बेड्या ठोकल्या

    लोकलमध्ये महिला डब्यात गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या सराईत महिला चोरटीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 09 गुन्हे उघडकीस आणत 12 मोबाईल फोन जप्त केले आहेत.

  • 30 Jun 2024 01:55 PM (IST)

    लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो

    लोणावळा परिसरात शुक्रवार, शनिवारी झालेल्या जोरदार पावसाच्या सरी व आज रविवारी सकाळपासून झालेला पाऊस यामुळे भुशी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.

  • 30 Jun 2024 01:35 PM (IST)

    राज्य सरकारच्या आरोग्य वारी अभियानाचा आजपासून शुभारंभ

    महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत शुभारंभ. आरोग्य वारीच्या माध्यमातून वारकऱ्यांना पुणे ते पंढरपूर आरोग्य सुविधा पुरवण्यात येणार

  • 30 Jun 2024 01:16 PM (IST)

    कोस्टल रोड बोगद्यात अपघात

    कोस्टल रोड बोगद्यात अपघात झालाय. वाहने कमी असल्याने मोठा अनर्थ टळलाय.

  • 30 Jun 2024 01:10 PM (IST)

    स्वाभिमानी संघटनेने केला निषेध

    केंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी आयात धोरणा वरुन माळशिरस येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

  • 30 Jun 2024 12:50 PM (IST)

    केंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी आयात धोरणावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

    पंढरपूर- केंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी आयात धोरणावरुन माळशिरस इथं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारच्या आयात निर्णयाच्या अध्यादेशाची होळी करत स्वाभिमानी संघटनेनं निषेध केला. मका, तेल, दूध पावडर या वस्तूंच्या आयातीचा निर्णय शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजित बोरकर यांनी केला.

  • 30 Jun 2024 12:40 PM (IST)

    आव्हाड यांना त्यांच्या वादग्रस्त विधानामुळेच निवडणुकीत बाजूला ठेवलं होतं- रुपाली चाकणकर

    “आव्हाड यांना त्यांच्या वादग्रस्त विधानामुळेच निवडणुकीत बाजूला ठेवलं होतं. त्यांच्या वक्तव्याला फारसं महत्त्व देण्याची गरज नाही. ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी ही योजना आहे,” असं प्रत्युत्तर रुपाली चाकणकर यांनी दिलं. जितेंद्र आव्हाड यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली होती.

  • 30 Jun 2024 12:30 PM (IST)

    टी-20 वर्ल्ड कपमधील भारताच्या विजयावर फडणवीसांकडून आनंद व्यक्त

    टी-20 वर्ल्ड कपमधील भारताच्या विजयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. “यापूर्वी दोन वेळा फायनलमध्ये जाऊन आपण जिंकलो नव्हतो. मात्र त्यावेळी झालेल्या पराभवावर भारताने काल वर्ल्ड कप जिंकून फुंकर मारली आहे. विराट कोहली याने केलेली खेळी ही उत्कृष्ट होती आणि सूर्यकुमार यादव याने जो झेल घेतला तो गेम चेंजर होता. या संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये आपली टीम अपराजित राहिली. त्यामुळे या संपूर्ण टीमचं आणि कॅप्टन रोहित शर्मा यांचा मी मनापासून अभिनंदन करतो,” असं ते म्हणाले.

  • 30 Jun 2024 12:20 PM (IST)

    चंद्रपूर : तरुणीच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीची आत्महत्या

    चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील आनंदवन इथल्या 25 वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या समाधान माळी (25) या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली. वरोरा पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये आज सकाळी 8:30 च्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. आरती चंद्रवंशी या तरुणीची बुधवारी घरात शिरून आरोपीने हत्या केली होती.

  • 30 Jun 2024 12:10 PM (IST)

    पैठण तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतच्या सरपंचांचा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश

    छत्रपती संभाजीनगर- पैठण तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतच्या सरपंचांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. सरपंच अशोक धर्मे आणि त्यांच्यासोबतच्या सहा ग्रामपंचायत सदस्यांनी उद्धव ठाकरे गटाची साथ सोडत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. खासदार संदीपान भुमरे यांच्या संपर्क कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला.

  • 30 Jun 2024 11:57 AM (IST)

    Maharashtra News : अजित पवारांना मोठा धक्का

    पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष अजित गव्हाणेसह 16 नगरसेवकांनी घेतली मोदीबागेत शरद पवाराची भेट. आज पुन्हा विलास लांडेंच्या उपस्थितीत होणार भेट. पाच जुलैला प्रवेश होण्याची शक्यता.

  • 30 Jun 2024 11:56 AM (IST)

    Maharashtra News : विधानसभेचे मॅच ही आमची महायुती जिंकेल – फडणवीस

    विधानसभेचे मॅच ही आमची महायुती जिंकेल आणि त्याकरिता आम्ही आत्तापासून अग्रेसर झालेलो आहोत. विधानसभा निवडणुकीत मोठा यश मिळेल असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी काय वक्तव्य केल ते मला माहित नाही असं फडणवीस म्हणाले.

  • 30 Jun 2024 11:25 AM (IST)

    National News : जनतेचा संविधान आणि लोकशाहीवर विश्वास – पीएम मोदी

    या निवडणुकीत 65 कोटी लोकांनी मतदान केलं. जनतेचा संविधान आणि लोकशाहीवर विश्वास आहे. ऑलिम्पिकमध्ये आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवू. भारतीय खेळाडू अनेक खेळांमध्ये भाग घेतील. मी माझ्या आईच्या नावान एक रोप लावलं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

  • 30 Jun 2024 11:14 AM (IST)

    National News : मोदी सरकार 3.0 चा पहिला ‘मन की बात’

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चा आज 111 वा भाग. सर्वांच्या जीवनात आईच स्थान मोठं. मोदींनी ‘एक पेड माँ’ के नाम अभियानाची घोषणा केली. पंतप्रधान मोदींकडून आईच्या आठवणींना उजाळा. आईच्या नावाने एक झाड लावण्याच आवाहन.

  • 30 Jun 2024 10:50 AM (IST)

    गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्यांना अटक

    घरकाम करणाऱ्या महिलांना लक्ष करून त्यांना काम देण्याचे बहाण्याने चहा मधून गुंगीचे औषध देवून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगार महिलेस व तिच्या साथीदारास बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

  • 30 Jun 2024 10:40 AM (IST)

    श्रीजया चव्हाण राजकारणात

    माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण राजकीय आखाड्यात उतरणार आहेत. आई माजी आमदार अमिता चव्हाण यांच्या सोबत श्रीजया मतदारसंघ पिंजून काढत आहेत.

  • 30 Jun 2024 10:30 AM (IST)

    शरद पवार आज पुण्यात

    शरद पवार आज पुण्यात आहेत. मोदी बागेतील कार्यलयात शरद पवार यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते येते आहेत.

  • 30 Jun 2024 10:20 AM (IST)

    परवानगीविना ड्रोन वापरावर बंदी

    पुण्यात पालखी सोहळ्यात खासगी चित्रीकरणासाठी ड्रोन कॅमेराच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.खासगी चित्रीकरणासाठी पोलिसांकडून परवानगी मिळवणे आवश्यक असून,बेकायदा चित्रीकरण केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. संभाव्य घातपात तसेच ड्रोन कॅमेरा द्वारे चित्रीकरणाचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे पोलीस परवानगीशिवाय ड्रोन कॅमेऱ्याने चित्रीकरण केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

  • 30 Jun 2024 10:10 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कौतुकाचे झळकले बॅनर

    कल्याण डोंबिवली परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कौतुकाचे बॅनर झळकले आहेत. अर्थसंकलपात झालेल्या विविध योजनांच्या घोषनेचा उल्लेख करत मदतीचा हात एकनाथ असा मजकूर लिहीलेले बॅनर लागले आहेत.

  • 30 Jun 2024 10:00 AM (IST)

    स्वंयघोषित दादांचा बंदोबस्त करा

    अजितदादा तुमच्या माघारी स्वयंघोषित दादा होणाऱ्यांचा बंदोबस्त करा असे पत्रच कार्यकर्त्याने अजित पवारांना लिहिले. पत्राची राज्यभरात चर्चा सुरु आहे. बारामती तालुक्यातील खंडोबाचीवाडीतील किरण लकडे ह्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने अजितदादांना थेट पत्र लिहीत गाऱ्हाणे मांडले आहे. अजित पवार आता या कार्यकर्त्यांच्या पत्राची दखल घेणार का?याकडे लक्ष लागले आहे.

  • 30 Jun 2024 09:49 AM (IST)

    नवी मुंबईत पावसाला सुरवात

    नवी मुबंईत पावसाला सुरवात झाली आहे. सर्वत्र ढगाळ वातावरण असून बेलापूर आणि दमादर पावसाची हजेरी. पावसामुळे गारवा आल्याने मुंबईकर सुखावले.

  • 30 Jun 2024 09:43 AM (IST)

    कल्याण डोंबिवली परिसरात झळकले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कौतुकाचे बॅनर

    कल्याण डोंबिवली परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कौतुकाचे बॅनर झळकले . अर्थसंकल्पात झालेल्या विविध योजनांच्या घोषणांचा उल्लेख करत,   ‘ मदतीचा हात एकनाथ’ असा मजकूर लिहीलेले लागले बॅनर शहरात लागले आहेत.

  • 30 Jun 2024 09:22 AM (IST)

    पुण्यात पालखी सोहळ्यात खासगी चित्रीकरणासाठी ड्रोन कॅमेराच्या वापरावर बंदी

    पुण्यात पालखी सोहळ्यात खासगी चित्रीकरणासाठी ड्रोन कॅमेराच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.खासगी चित्रीकरणासाठी पोलिसांकडून परवानगी मिळवणे आवश्यक असून, बेकायदा चित्रीकरण केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.

    संभाव्य घातपात तसेच ड्रोन कॅमेरा द्वारे चित्रीकरणाचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस परवानगीशिवाय ड्रोन कॅमेऱ्याने चित्रीकरण केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

  • 30 Jun 2024 09:20 AM (IST)

    शरद पवार आज पुण्यात, मोदीबागेतील कार्यालयात कार्यकर्त्यांची घेणार भेट

    राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज पुण्यात आले आहेत. मोदीबागेतील कार्यलयात ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.