महाराष्ट्र विधानपरिषदेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज अंतिम तारीख आहे. 12 जुलै रोजी मतदान पार पडेल. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 11 जागा 27 जुलै रोजी रिक्त होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे भाजपचे 5, एकनाथ शिंदेंची शिवसेना 2, काँग्रेस 1, महाविकास आघाडीची आणखी एक जागा निवडून येऊ शकते. तर दुसरीकडे नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे विजयी झाले आहेत. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज लोकसभेत भाषण करणार आहे. मोदींच्या भाषणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की सलग तीन वेळा 100 चा टप्पा पार करता आला नाही.काँग्रेसच्या इतिहासातील हा तिसरा सर्वात मोठा पराभव आहे. काँग्रेसने आपला पराभव मान्य केला असता तर बरे झाले असते.ते सार्वजनिक व्यवस्थेची अवहेलना करत आहेत, पण त्यांनी आमचा पराभव केला आहे, हे देशातील नागरिकांच्या मनात बिंबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका धार्मिक कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. सत्संगाचा कार्यक्रम सुरू असताना चेंगराचेंगरी झाल्याचं सांगण्यात येत आहे. चेंगराचेंगरीत गुदमरून आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो.
लोकसभा निवडणुकीमुळे या गोष्टी लोकांच्या नजरेतून गायब झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसोबतच चार राज्यांच्या निवडणुकाही झाल्या. या चारही राज्यात एनडीएला अभूतपूर्व यश मिळाले आहे. आम्ही शानदार विजय संपादन केला आहे. ओडिशाने आपल्याला भरपूर आशीर्वाद दिले आहेत. आंध्र प्रदेशात एनडीएने क्लीन स्वीप केला आहे. हे कोणीही पाहू शकत नाही. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्येही सरकार स्थापन झाले आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये दणदणीत विजय मिळवला होता.
एका जातीला दुसऱ्या जातीच्या विरोधात उभे करण्यासाठी काँग्रेस पक्ष उघडपणे नवीन आख्यायिका तयार करत आहे आणि रोज नवीन अफवा पसरवत आहे. 4 जून रोजी अपेक्षित निकाल न मिळाल्यास जाळपोळ करण्यात येईल, असे मंचावरून स्पष्टपणे जाहीर करण्यात आले. अराजकता पसरवणे हा त्यांचा उद्देश आहे.
पंढरपूर शहर-परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांचे हाल झाले आहेत. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र पावसामुळे पंढरपुरातील सखल भागात पाणी साठलं आहे.
उत्तर प्रदेशातून मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मोठी दुर्घटना घडली आहे. हाथरस येथे भोले बाबाच्या सत्संगावेळी चेंगराचेंगरी झाल्याचं समोर आलं आहे. चेंगराचेंगरीत जवळपास ७० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 150 पेक्षा जास्त भाविक घटनेत गंभीर जखमी आहेत. या चेंगराचेंगरीमुळे अनेकांची प्रकृती गंभीर झाली आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला जखमींवर उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
“आमचं सरकार 10 वर्षात ‘सबका साथ सबका विकास’ या मंत्रावर काम करत आली आहे. आमच्या सरकारने तुष्टीकरणावर नाही तर संतुष्टीकरणावर काम केलं आहे. आमचं 10 वर्षातील काम पाहून देशाने आम्हाला 140 कोटी जनतेने आम्हाला संधी दिली आहे. या निवडणूकीत भारतातील जनतेने विवेकतेने मतदान केलं. आम्ही विकसित भारतासाठी जनतेचा आशिर्वाद मागितला होता. विकसीत देश झाला तर देशातील जनतेचे स्वप्न पूर्ण होतात”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
देशाच्या जनतेने पाहिलंय की, आमची प्रत्येक निती, प्रत्येक निर्णय, प्रत्येक कार्य एकच तराजू राहिला आहे तो म्हणजे भारत प्रथम. देशाच्या सगळ्या लोकांच्या कल्याण करण्याचा प्रयत्न आमचा आहे – पंतप्रधान मोदी
करमाळा तालुक्यात पावसाला सुरुवात. दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण. अचानक पाऊस आल्याने नागरिकांची धावपळ
बजेटच्या तारखेविषयी अजूनही संभ्रम आहे. 22 जुलै ही आतापर्यंत अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख मानल्या जात होती. पण अर्थमंत्रालयाच्या सूत्रांच्या आधारे नवीन अपडेट समोर येत आहे. पूर्ण बजेट सादर करण्याची नवीन तारीख समोर आली आहे.
लोकसभा निवडणुकीत 48 पैकी एकाही जागेवर मुस्लिम उमेदवार नव्हता, तरीही मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला भरभरून मतदान केलं.विधानपरिषद जागाही प्रज्ञा सातव यांना दिली गेली. महाराष्ट्रात मुस्लिम समाजाची संख्या 11.5 टक्के आहे, आगामी विधानसभा निवडणुकीत 20 ते 25 जागांवर मुस्लिम समाजाला उमेदवारी द्यावी, हुसेन दलवाई यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे मागणी केली आहे.
नाशिक शहरातील चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना 300 युनिट वीज मोफत मिळावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. मागणी मान्य करण्यासाठी सरकारला भाग पाडले जाईल जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा सरकारला इशारा दिला.
वाशिम जिल्ह्यात पावसाने दमदार सुरुवात केली. सतत पाऊस पडत असल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील विविध प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे.
राहुल गांधी विरोधी पक्षनेते झालेत त्यामुळे त्यांना संसदेचे नियम माहित पाहिजेत. काल राहुल गांधी काही गोष्टी बरळले, काही बरळत राहिले तर त्या गोष्टी रेकॉर्डवर राहणार नाहीत, त्याचे पुरावे असावे लागतात. दहा वर्षानंतर विरोधी पक्षनेतेपद मिळाल आहे संजय राऊत समर्थन करणार नाहीत तर मग कोण करणार असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी लगावला.
लाडली बहीण योजनेसाठी महिलांची महा ई सेवा केंद्र आणि सेतू कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. अर्ज भरण्यासाठी 15 दिवस मुदत ठेवल्याने मोठी गर्दी झाली आहे. अर्ज भरण्यासाठी महिला सकाळपासून रांगेत आहेत. पैशांची अतिरिक्त मागणी होत नसली तरी रांगेत थांबावे लागत आहे. बॉण्डसाठी मोठ्या प्रमाणात पैसे मागितले जात असल्याचा आरोप महिलांनी केला.
मेळघाटात प्रवासी घेऊन जाणारी खासगी ट्रॅव्हल दरीत कोसळली. यामध्ये 22 प्रवासी जखमी तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. अकोट वरून धारणी येथे ट्रॅव्हल येत होती.अकोट -धारणी मार्गावरील खटकाली फाट्यावरील जवळ ही घटना घडली.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. विधिमंडळ परिसरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. निलंबनाचा एकतर्फी निर्णय हा घातक असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
विधानसभेत बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. जनमत पायदळी तुडवून मविआ सरकार आणलं गेलं. पण आम्ही उठाव करून महायुतीचं सरकार आणलं. हे सरकार पडेल, असं विरोधक वारंवार बोलत राहिले. पण आमच्या सरकारने दोन वर्षे पूर्ण केली, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
सोलापुरात लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी महा ई-सेवा केंद्र आणि सेतू कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. अर्ज भरण्यासाठी 15 दिवस मुदत ठेवल्याने मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अर्ज भरण्यासाठी आम्ही सकाळपासून रांगेत आहोत. त्यामुळे आम्हाला त्रास होतोय. पैशाची अतिरिक्त मागणी होत नसली तरी रांगेत थांबावे लागत आहे. बॉण्डसाठी मोठ्याप्रमाणात पैसे मागितले जात आहेत. मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या आहेत त्यामुळे आम्हाला खूप वेळ थांबावे लागत आहेत. पिण्याच्या पाण्याची सुविधा व्हायला हवी अशी आमची मागणी आहे, अशी या महिलांची मागणी आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. पुढच्या पाच दिवसांसाठी त्यांचं निलंबन करण्यात आलंय. यावेळी विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी केली आहे.
दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन, दुधाला 40 रुपये दर देण्याची मागणी… अहमदनगरच्या राहुरीमध्ये राजू शट्टींच्या उपस्थितीत रास्तारोको… अमदार प्राजक्त तनपुरेंचाही आंदोलनात सहभाग…
पुण्यात झिकाची आणखी एका महिलेला लागण… पुण्यात एकूण झिकाचे ७ रुग्ण आढळून आलेत… पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी कल्पना बळिवंत यांची माहिती.. महापकिकेकडून उपाय योजना सुरु आहेत…
सरकारने योजनेसाठी मुदत वाढवून द्यावी… अर्जदार महिलांची मागणी… राज्य सरकारने लाडली बहीण योजनाची कागदपत्र काढण्यासाठी महिलांची गर्दी… राज्य सरकारच्या नव्या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद… या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्न, रहवाशी दाखला गरजेचा आहे… हे दाखले काढण्यासाठी महिलांची सेतूमध्ये मोठी गर्दी
नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत किशोर दराडे यांचा विजय झाल्याने जल्लोष… नाशिकच्या शिवसेना कार्यालयाच्या बाहेर शिवसेनेचा जल्लोष… नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ठाकरे आणि शिंदे सेनेत पाहायला मिळाली…
शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर अर्ज भरण्यासाठी दाखल… अजित पवारांच्या उपस्थितीत दोन्ही उमेदवार अर्ज भरणार…
विधान परिषदेचं कामकाज पुन्हा एकदा स्थगित झालं आहे. तासाभरासाठी विधान परिषदेचं कामकाज स्थगित करण्यात आलं आहे.
अहमदनगरमधील राहुली इथं राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत आज भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. आमदार प्राजक्त तनपुरे, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे हेदेखील आंदोलनात सहभागी झाले आहेत. बैलगाड्या आणि जनावरांसह शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत. दुधाला किमान 40 रुपये दर मिळावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
नवी दिल्ली- लोकसभेचं कामकाज सुरू झालं असून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी संबोधन केलं. “सत्य हे सत्य असतं, ते नाकारून चालत नाही. असं वाटतंय की पराभव झालेलं सरकार सत्तेत आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडीचा नैतिक विजय झाला आहे. देशातील जनता सांगत आहे की हे सरकार पडणार आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे तर मग पर कॅपिटा इन्कम का कमी आहे,” असा सवाल अखिलेश यांनी केला.
बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या समर्थनात नारळ अभिषेक करण्यात येत आहे. पाच हजार नारळांचा अभिषेक करण्यात येत आहे. नामलगावच्या गणपती मंदिरात नारळ फोडण्यास सुरुवात झाली आहे.
गोंदिया- जिल्ह्यात शाळांची दूरवस्था झाली असून 714 शाळांमधील 1214 वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीची नितांत गरज आहे. 188 नवीन वर्गखोल्यांची जिल्ह्याला आवश्यकता आहे. शासनाला निधीची मागणी करण्यात आली असून अद्याप निधी न मिळाल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
लोणावळ्यातील पर्यटकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या भुशी धरण परिसरातील अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. लोणावळा नगरपरिषद आणि पुणे रेल मंडळ प्रशासनाकडून संयुक्त अतिक्रमण कारवाई सुरू आहे. भुशी धरण परिसरात चहा, नाष्टा, फेरीवाले, कणीस विक्रेते यांनी दुकाने थाटली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे.
नवी दिल्ली कृषी विभागाकडून कांदा खरेदीच्या माहितीसाठी केंद्रीय पथक लासलगावात दाखल झालं आहे. लासलगाव बाजार समितीत कांदा लिलावाची पथकाने माहिती घेतली. केंद्रीय पथकाने यावेळी शेतकऱ्यांसोबत चर्चासुद्धा केली. नाफेड एनसीसीएफच्या कांदा खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा शेतकरी संघटनांनी आरोप केला.
राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाच आंदोलन. हिंदू हिंसक या वक्तव्याविरोधात भाजपच आंदोलन. आंदोलनादरम्यान भाजपा कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. नाशिकच्या एमजी रोड परिसरात असलेल्या काँग्रेस कार्यालय जवळ आंदोलन. आंदोलन दरम्यान राहुल गांधींचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न. राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत केलं आंदोलन.
कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक असणाऱ्या दाभोळकर कॉर्नर येथे रिक्षा चालकांनी केला रस्ता रोको. कोल्हापूर शहराची काही काळ वाहतूक विस्कळीत. रिक्षा चालक करणार आंदोलन पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात.
लाडकी बहीण योजनेसाठी तहसील कार्यालयात गर्दी. कागदपत्रे काढण्यासाठी महिलांची गर्दी सुरू. सकाळी 10 वाजल्यापासून तहसील कार्यालयाच्या सेतू सुविधा केंद्रावर गर्दी. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची गर्दी सुरू.
“साहेब तुमचा शब्द खरा ठरवला उभाठाचा पराभव झाला. ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंचा दराडे यांना फोन. किशोर दराडे नाशिक शिक्षक विभाग मतदार संघात विजयी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केले अभिनंदन. शिंदे गट शिवसेनेचे सचिव सचिव भाऊ चौधरी यांच्या फोनवरून दराडे यांना फोन.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय दलाची बैठक सुरु झाली आहे. लोकसभेत सोमवारी राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणानंतर आक्रमक विरोधकांना तोंड देण्याची रणनीती या बैठकीत होणार आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. पालखी प्रस्थान सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंद्रायणी नदीची पाहणीही केली. गेली तीन दिवस इंद्रायणी नदी फेसाळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
शिवसेनेचे उबाठा खासदार उपराष्ट्रपतींना भेटणार आहेत. उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची खासदार संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत.
ठाणे नाशिक महामार्गावर गेल्या एक तासापासून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहे. तसेच महामार्गांवर अर्धवट कामांमुळे वाहनधारकांना मोठा फटका बसला आहे.
पंकजा मुंढे यांच्या वरळी येथील कार्यालयासमोर समर्थकांची गर्दी वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंढे यांना विधानपरिषदची उमेदवारी जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
राहुल गांधी काल सर्वांना भारी पडले, राहुल गांधींनी भाजपच्या नकली हिंदुत्वाचा मुखवटा उतरवला, राहुल गांधींचं भाषण देशाला मार्गदर्शक होतं, भाजपने हिंदुत्वावर गप्पा मारु नये, संजय राऊतांकडून पाठराखण
कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे निरंजन डावखरे विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयानंतर रायगडमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची मुंबईत बैठक पार पडली. मुंबईत रात्री उशिरा काँग्रेस नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि यशोमती ठाकूर यांच्यासह विश्वजीत कदम सतेज पाटीलही उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने विधानसभा निवडणुकांबद्दल चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
लोणावळ्यात मागील 24 तासांत 136 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यातील हा रेकॉर्डब्रेक पाऊस आहे. पावसामुळे लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी होत आहे.