मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आजपासून शांतता जनजागृती रॅली काढली जाणार आहे. याची सुरुवात हिंगोली जिल्ह्यापासून होणार आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीला महायुतीचे नेते, आमदार, खासदार, नगरसेवक, सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच महायुतीचे जिल्हा, तालुका, विभागस्तरीय आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची असणार आहे.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती स्थिर आणि निरोगी आहे. ते घरी आराम करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान केयर स्टारर यांच्याशी फोनवर बोलून त्यांचे अभिनंदन केले. संभाषणात, दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंधांचे स्मरण केले आणि सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याची वचनबद्धता व्यक्त केली.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलैपासून सुरू होणार असून ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. मोदी सरकार 23 जुलै रोजी आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे.
हातरस चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
#WATCH | Hathras, UP: Dev Prakash Madhukar, main accused in Hathras stampede sent to 14-day judicial custody by CJM court. pic.twitter.com/HM1fzIwAca
— ANI (@ANI) July 6, 2024
सुरतमध्ये 6 मजली इमारत कोसळल्याने खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत 15 जण जखमी झाले आहेत. तर 5 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
मराठा आणि कुणबी एकच आहे त्यामुळे सरसकट कुणबी आरक्षण द्या. आम्ही दिलेली सांगेसोयरेची जी व्याख्या केली त्याप्रमाणे आम्हाला आरक्षण द्या. साडेचार तास झाले समाज उन्हात रस्त्यावर आहे. असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
समाजावर जेव्हा संकट येतील तेव्हा हिंगोली जिल्हा ताकतीने उभे राहतील. मराठाचा आक्रोश आहे. एकट्या भुजबळांचे ऐकून समाजावर अन्याय केला तर याद राखा. मराठा समाजावर अन्याय केला तर एकही उमेदवार निवडून येणार नाही. सरकारने शहाणपणाची भूमिका घेणे गरजेचे आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
जळगाव जिल्ह्यात अनेक भागांमध्ये तब्बल एक ते दीड तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तब्बल तीन ते चार दिवसाच्या दांडीनंतर आज पावसाने पुनरागमन केले आहे. उशिराने पेरणी झालेल्या पिकांना पावसाची आवश्यकता होती. आजच्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे.
पुणे शहर पोलीस भरती दरम्यान एक तरुण दगावला आहे. रनिंग करताना तरुणाचा मृत्यू झाला. ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती. पुण्यात शिवाजीनगर पोलीस ग्राऊंडवर सुरू आहे पोलीस भरती. तुषार बबन भालके वय 27 वर्षे पोलीस भर्तीत मरण पावलेल्या तरूणाचे नाव आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या भागावर तेलंगणा सरकारने बांधलेल्या धरणाचे तीन पिलर खचल्यानंतर दुरुस्तीचे काम पावसाने रखडल्याने महाराष्ट्रातील गडचिरोलीत चिंता व्यक्त होत आहे.
कांदा आणि दुधाला हमीभाव मिळावा यासाठी निलेश लंके यांनी नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरु केले आहे.
मनोज जरांगे यांच्या मराठवाडा दौऱ्याला सुरुवात झाली आहे. आज हिंगोलीत मनोज जरांगे पाटील आहेत. हिंगोलीत जरांगे पाटील यांच्या शांतता महारॅलीला सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी भगव्या झेंड्याचं ध्वजरोहन केलं.
वाहन चोरी करुन पळ काढणाऱ्या आरोपीस रबाळे एमआयडीसी पोलीसांनी अटक केलीय. रबाळे हद्दीतून वाहन चोरी झाले होते. मात्र गाडीमध्ये जीपीआरएस सिस्टिम असल्याने पोलिसांनी तात्काळ जीपीआरएस सिस्टिम ट्रॅक करून गाडी घेऊन समृद्धी महामार्गावर पोहोचलेल्या आरोपीला चार तासात गाडी सकट अटक करण्यात पोलिसांना यश आलेय. जीपीआरएस सिस्टिममुळे हे वाहन आरोपीसह शोधण्यात पोलीसांना यश आले असून सर्व वाहन चालकांनी आपल्या वाहनांमध्ये जीपीआरएस सिस्टिम बसवून घेण्याचे आवाहन पोलिसांनी केलीय.
लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी मणिपूरला जाणार आहेत. 8 जुलैला राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर जाणार आहेत. मणिपूरमधील दोन्ही समाजातील पीडितांची राहुल गांधी भेट घेणार आहेत.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमावेळी सभेतील मंडप उडाला. सोलापुरात आई प्रतिष्ठानतर्फे महिला मेळाव्यादरम्यान मंडप उडाला. सोलापुरातील रामवाडी परिसरामध्ये आई प्रतिष्ठानतर्फे महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्या दरम्यान भाषण करत असताना जोराचा वारा आल्यामुळे मंडपाचा संपूर्ण पडदा खाली आला. महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना आणि विद्यार्थिनींना मोफत साहित्य वाटप करण्यासाठी कृतज्ज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे नियोजित कार्यक्रमातला मंडप उडाला. या मेळाव्याला मोठ्या संख्येने महिला सहभारी झाल्या आहेत.
8 जुलैला राहुल गांधी मणीपुर दौऱ्यावर. मणिपूर मधील दोन्ही समाजातील पीडितांची राहुल गांधी भेट घेणार
मराठा बाधंवांवर बेरोजगाराची वेळ आली. नोकरी नाही. याला ओबीसी आरक्षण जबाबदार नाही आणि मराठा समाज ओबीसीमध्ये आल्याने त्यांची परीस्थिती लगेच बदलणार नाही.
जरांगे पाटील यांचे हिंगोलीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले आहे. फुलांची उधळण जरांगे पाटील यांच्यावर होत आहे.
मनोज जरांगे पाटील हे हिंगोलीमध्ये दाखल झाले असून जोरदार स्वागत त्यांचे केले जात आहे.
नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात असलेल्या गंमत जंमत हॉटेल जवळ भीषण अपघात झाला आहे. पुलावरून गाडी थेट गोदावरी नदीत कोसळल्याने एकाचा मृत्यू तर 2 जण जखमी झाले. मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील थिलोरी येथे वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. नंदू दापरे या तरूणाने नशेत गाड्यांची तोडफोड केली. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून त्या तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज जरांगे जरांगे पाटील यांची रॅली थोड्याच वेळात हिंगोली मध्ये दाखल होणार. जरांगे पाटील यांची हिंगोली मध्ये शांतता महारॅली होणार आहे.
जरांगे पाटील यांचा शेकडो गाड्यांचा ताफा थोड्याच वेळात हिंगोलीत दाखल होणार. हिंगोलीत पोहोचताच जरांगे पाटील यांचे होणार जोरदार स्वागत
धुळे – खासदार शोभा बच्छाव यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू आहे. धुळे शहरासह ग्रामीण भागातल्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठक असून रस्ते, वीज ,स्वच्छता, एमआयडीसी, सह पाणीपुरवठा दुष्काळाच्या संदर्भात बैठकीत चर्चा होणार. येणाऱ्या विविध समस्यांवर तोडगा काढण्याचे खासदार शोभा बच्छाव यांचे प्रशासनाला आदेश. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित.
छत्रपती संभाजीनगरात भारतीय जनता पार्टीने नगरसेवकांची बोलावली तातडीची बैठक. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची फूट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलावली बैठक असून छत्रपती संभाजी नगरातील सर्वच नगरसेवकांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय जनता पार्टीतून ठाकरे गटात नगरसेवक जाण्याच्या शक्यतेमुळे बोलावली बैठक. आजच्या बैठकीत नगरसेवकांची होणार झाडाझडती.
पुण्याच्या मंचर येथे शिवसेना ऊबाठा शिवसैनिक आक्रमक झाले असून दुधाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन सुरू आहे.
शिवसैनिकांनी शिरूर – भीमाशंकर मार्ग रोखून, रस्त्यावर दुधाच्या किटल्या ठेवून रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
टीम इंडियाला आता 11 कोटी रुपये देण्याची गरज होती का?. खेळाडू देशासाठी खेळतात. 120 कोटी रुपये बीसीसीआयने दिल आहेत. एवढी मोठी रक्कम इनाम म्हणून दिल्यावर स्वत:च्या तिजोरीतून पैसे द्यायची काय गरज होती? असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला.
“नाना पटोले यांनी जर एमसीएची निवडणूक लढवली तर मी ही निवडणुक लढवणार. मी सोमवारी फॉर्म घेणार. नाना विटी दांडू खेळणारे प्लेयर, त्यांचा क्रिकेटशी संबंध काय?. रविंद्र वायकरांबद्दल क्लोजर रिपोर्ट आला तर त्यात नवल काय?. संजय राऊत हे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्यामध्ये एलबीडब्ल्यू झालेत” अशी टीका प्रसाद लाड यांनी केली.
रावसाहेब दानवे यांनी राजू शिंदे यांची भेट घेतली. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दोघांची भेट झाली. रावसाहेब दानवे यांच्याकडून राजू शिंदे यांच्या मनाधरणीचे प्रयत्न. ठाकरे गटाच्या वाटेवर असलेल्या राजू शिंदे यांना थांबवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रयत्न. नाराज नेत्यांना थांबवण्यात भाजप नेत्याच्या प्रयत्नांना यश मिळते का हे पाहणे महत्त्वाचे.
“दुसरं काय होऊ शकतं, आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीन चीट द्यायचं बाकी आहे. हे सरकार महाराष्ट्रातल असो की दिल्लीतल असो ओवाळून टाकलेले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत आहेत आणि आमची ताकद किती हे दंडाची बेडकी फुगून दाखवत आहेत” वायकर यांना क्लीन चीट दिल्याच्या प्रकरणात संजय राऊत यांनी ही टीका केली.
शिवसेना, राष्ट्रवादीबाबत 3 महत्त्वाच्या सुनावण्या… पुढील आठवड्यात सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता… शिवसेना पक्ष, चिन्हावरील सुनावणी 15 जुलैला सुनावणी होण्याची शक्यता… राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत 16 जुलैला सुनावणी होण्याची शक्यता… शिवसेना आमदार अपात्रतेवर 19 जुलैला सुनावणी होण्याची शक्यता… राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी…
भंडारदरा परिसरात पावसाचा जोर… छोटे मोठे धबधबे प्रवाहित… भंडारदरा परिसर हिरवाईने नटला…. तर भात लागवडीत आदिवासी व्यस्त…. गेल्या एक महिन्यापासून पावसाने फिरवली होती पाठ… सततच्या पावसामुळे 11 टिएमसी क्षमता असलेल्या धरणाचा पाणीसाठा 20 टक्क्यांपर्यंत पोहोचला….
खासदार निलेश लंके यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस… कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी जन आक्रोश आंदोलन… प्रशासनाने दुर्लक्ष केलं प्रशासनाला कोणाचा तरी दबाव – निलेश लंके… आज जनावरांसह मोठा आंदोलन करणार, तर उद्या प्रत्येक गावातून लोक येणार…
क्लीनचीट मिळाली याचा अर्थ आमच्यावर खोटे खटले दाखल केले… आमच्यावर देखील दबाव आणण्याचा प्रयत्न झाला… आता फक्त दाऊदला क्लिनचीट देणं बाकी राहिलंय… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
वायकरांना मिळालेल्या क्लिनचीटवरून राऊतांची टीका… आता फक्त दाऊदला क्लिनचीट देणं बाकी राहिलंय… वायकर ईडी, सीबीआयला घाबरुन पळून गेले…असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
मोदी भ्रष्ट नेत्यांचे सरकार आहेत… सरकार जनतेला किंमत देत नाही… सरकार फक्त मन की बात करतं… असं देखील नाना पटोले म्हणाले.
भंडाऱ्यात नाना पटोलेंच्या बॅनरची चर्चा… राज्यात अनेक तळागाळातील खेळाडू… ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे… एमसीएची निवडणूक लढायची की नाही येत्या आठवड्यात ठरवणार… असं नाना पटोले म्हणाले आहेत..
देवप्रकाश मधुकर याला आज कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. हाथरस दुर्घघटनेतील प्रमुख आरोपी देवप्रकाश याला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर एक लाख रुपयांचं बक्षीस होते. देवप्रकाशाने स्वतःहून पोलिसांसमोर समर्पण केले.
राहुल गांधी आज अहमदाबाद, गुजरात इथं काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करतील. त्यानंतर राहुल गांधी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. तसंच राजकोट गेमिंग झोन दुर्घटनेत मोरबी ब्रीज दुर्घटनेत, हारनी बोट दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या पीडित लोकांची भेट घेणार आहेत.
मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे स्थानकावर पंचवटी एक्सप्रेस गाडीची कपलिंग तुटल्याने गेले वीस मिनिटांपासून एक्सप्रेस गाडी स्टेशन परिसरात उभी आहे. रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवरती कपलिंग बसवण्याचे काम सुरू आहे. मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेन वर याचा कुठलाच परिणाम झाले नसल्याचा रेल्वे प्रशासनाने माहिती दिली आहे.
मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅलीला कोणतेही गालबोट लागणार नाही. मात्र छगन भुजबळ यांना एकमेकांच्या पुढे आंदोलन उभा करून खुन्नसचीपणा दाखवण्याचा नाद असल्यामुळे ते कोणत्याही कार्यकर्त्याला सांगून रॅलीमध्ये गालबोट लावू शकतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवावं आणि छगन भुजबळ हे सरकारमध्ये असल्यामुळे जर काही घडलं तर त्याला मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री हे देखील जबाबदार असतील. समाजात शांतता सुव्यवस्था राहावी हे सरकारचं काम आहे मात्र ते काम आम्ही करत असल्याचे ते म्हणाले.
सांगली मिरज मार्गावर रात्री मुंबईला जाणाऱ्या अशोका ट्रॅव्हल बस चा विचित्र अपघात झाला आहे, वटवाघुळ अचानक तोंडावर आल्याने चालकाचा ताबा सुटून ट्रॅव्हल झाडावर आदळून अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे, इचलकरंजी ते मुंबई मुंबई जात असताना सांगली येथील कर्मवीर भाऊराव चौक येथे वटवाघुळ अचानक तोंडावर आदळल्याने चालकाचा ताबा सुटून झाडावर बस आढळून अपघात झाल्याची घटना घडली आहे.
राजधानी दिल्लीतल्या पाकिस्तान दूतावासामधून खळबळ जनक घटना समोर येत आहे. पाकिस्तानी दूतावासातील एका कर्मचाऱ्यांन महिले सोबत छेडछाड झाल्याचे समोर येत आहे. स्वयंपाक गृहात काम करणाऱ्या भारतीय महिला सोबत छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला आहे.पीडित महिलेची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 54 वर्षीय मिनाज हुसेन या पाकिस्तानी तात्काळ भारत देश सोडण्याचे पाकिस्तान दुतावासाने आदेश दिले आहेत.
जुलैच्या पहिल्या सत्रात सोन्याने मरगळ झटकली. सोने दरवाढीवर स्वार झाले. तर चांदीने सलग पाच दिवस दमदार बॅटिंग केली. जुलैच्या पहिल्या सत्रातच भरुन काढली. सोन्याने मरगळ झटकली. सोने दरवाढीवर स्वार झाले. तर चांदीने सलग पाच दिवस दमदार बॅटिंग केली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. एक किलो चांदीचा भाव 93,200 रुपये आहे.
Maharashtra News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज महायुतीची बैठक होणार आहे. या बैठकीला महायुतीचे जिल्हा, तालुका, विभागस्तरीय आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची असणार आहे.
छत्रपती संभाजीनगरात भाजप आणि ठाकरे गटात फोडफोडीचे राजकारण सुरु असल्याची माहिती मिळत आहे. भाजपकडून ठाकरे गटाच्या दोन माजी महापौरांना फोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. ठाकरे गटाचे माजी माजी महापौर नंदकुमार घोडीले आणि अनिता घोडीले यांना फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे गटाने भाजपचे राजू शिंदे आणि सहा नगरसेवक फोडल्यानंतर भाजपनेही प्रयत्न सुरू केल्याचे बोललं जात आहे.
Maharashtra News : पुणे शहरात झिकाचे सात रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहे. झिकाचा सर्वाधिक धोका गर्भवतींना असल्याने महापालिकेने त्यांच्या तपासणीवर भर दिला आहे. एरंडवणे, मुंढवा आणि डहाणूकर कॉलनी परिसरात झिकाचे रुग्ण आढळून आले आहेत. या परिसरातील ४१ गर्भवतींचे रक्त नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहे. तसेच आरोग्य विभागाकडून शहरात सर्वेक्षण सुरू आहे. यात २४६ घरांमध्ये डासांच्या अळ्या आढळून आल्या. या प्रकरणी ८२ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्याकडून देऊन ६६ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
Maharashtra News : हिंगोली- मराठा आरक्षणासंदर्भात आजपासून मनोज जरांगे पाटील यांच्या जनजागृती शांत रॅलीला सुरुवात होणार आहे. मराठवाड्यातली पहिली रॅली आज हिंगोलीत असणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत हिंगोलीमध्ये जनजागृती शांतता रॅली काढली जाणार आहे. या रॅलीत लाखो मराठा बांधव सहभागी होणार आहेत.
Maharashtra News : वसई विरार मध्ये रात्रभर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. संततधार पावसासह अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. सध्या शहरात कुठेही पाणी साचले नाही. तसेच विरार चर्चगेट पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरु आहे