वाल्मिक कराडला केज न्यायलयाने 7 दिवसीय पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर कराडला बीड पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. यावेळेस न्यायालयाबाहेर कराडविरोधात आणि समर्थनाथ घोषणाबाजी केली जात आहे. वाल्मिक कराडला फाशी द्या, अशी मागणी कोर्टाबाहेर वकील हेमा पिंपळे यांनी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला कराड यांच्या समर्थनाथ घोषणाबाजी केली जात आहे.
मोठी बातमी समोर आली आहे. वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एसआयटीने 10 दिवसांच्या कोठडीच्या मागणी केली होती. मात्र केज न्यायलयाने 7 दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सोलापूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे यांचं पार्थिव प्रयागराज येथून एअर ॲम्बुलन्सने सोलापुरात आणण्यात आलं आहे. सोलापूर एअरपोर्टवर कार्यकर्त्यांची अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. पार्थिव नागरिकांना अंतिम दर्शनासाठी जुना विडी घरकुल येथील संभाजीराव शिंदे प्रशालाच्या प्रांगणात ठेवण्यात येणार आहे.
बीड कोर्टाने तपास अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले आहेत. फक्त फोन कॉलवर कराडला आरोपी बनवण्यात आलं का? असा सवालही कोर्टाने विचारला आहे. हत्या, खंडणी प्रकरणात फोन कॉलच्या आधारेच आरोपी बनवलं का? असा प्रश्नही कोर्टाने उपस्थित केला आहे.
आरोपीसाठी शहरं बंद ठेवायची असा नवीन पॅटर्न आल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं आहे. बंद करून व्यापारी स्वत:चं नुकसान करत असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादीच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.
केजमध्ये वाईन शॉप सुरु करण्यासाठी दिलेलं प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे. केज नगरपंचायतीकडून कराडला दिलेलं ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे. खासदार बजरंग सोनावणे यांनी हरकत घेतली होती.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग मिळाला आहे. या प्रकरणी वाल्मिक कराडविरुद्ध मकोका लावण्यात आला आहे. कराडला बीड कोर्टात घेऊन जात असताना चार अनोळखी वाहनं ताफ्यात शिरली होती. त्याचा आता तपास केला जात आहे. कराडला केजवरून बीडला घेऊन जाताना हा प्रकार घडला होता.
कराडनं हत्येच्या दिवशी संतोष देशमुख यांना धमकी दिल्याची माहिती एसआयटीने कोर्टात दिली आहे. आरोपींनी कट रचून संतोष देशमुख यांची हत्या केल्याचंही सांगण्यात आलं आहे. दहा दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणीही एसआयटीने केली आहे. संघटीत गुन्हा असल्याने कराडवर मकोका लावल्याचं एसआयटीने कोर्टात स्पष्ट केलं.
वाल्मिक कराडला कोर्टात आणण्यात आलं. विशेष मोक्का कोर्टात थोड्याच वेळात वाल्मिकला हजर करणार आहे. न्यायाधीश सुरेखा पाटील यांच्या कोर्टात सुनावणी होणार आहे. एसआयटीचे वरिष्ठ अधिकारी कोर्टात दाखल झाले आहेत. सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे एसआयटीकडून युक्तिवाद करणार आहे. वाल्मिक कराडचे वकील अशोक कवडे कराडची बाजू कोर्टात मांडणार आहे.
गेवराई ते बीड रोडवर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड समर्थकांनी काही काळ रस्ता रोको केला होता. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. परंतु गेवराई पोलिसांनी आंदोलनकर्त्याना समजूत काढून बाजूला करत, हा मार्ग मोकळा केला
वाल्मीक कराडला न्यायलयाच्या मागच्या दारातून एसआयटीची टीमने न्यायालयात दाखल केले. आता थोड्याच वेळात याप्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे. यामुळे सध्या न्यायालय परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणात आरोपी वाल्मीक कराड याला बीड न्यायालयात हजर केले जाणार असून थोड्याच वेळात या प्रकरणाची सुनावणी अपेक्षित आहे. एसआयटीचे पथक केज येथून कराडला घेऊन बीड कोर्टात आले आहे.
एसआयटीचे अध्यक्ष सुरेश धस यांच्या जवळचे आहेत त्यांना सुद्धा या पदावरुन दूर करून अतिशय निष्पक्षपाती व्यक्तीला एसआयटीवर आणले गेले पाहिजे असे वाल्मीक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांनी म्हटले आहे.
नव्या काँग्रेस मुख्यालयात असलेल्या लायब्ररीला डॉ. मनमोहन सिंह यांचं नाव दिलं जाणार असल्याची घोषणा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे.
“महाराष्ट्रात जी निवडणूक झाली ती पूर्णपणे चुकीची आहे. मी निवडणूक आयोगाला सांगितलं आहे की मतदार यादीमध्ये पारदर्शकता ठेवा. पारदर्शकपणे मतदान होणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. आम्ही जी माहिती आयोगाकडे मागितली ती त्यांनी दिली नाही,” असं राहुल गांधी म्हणाले.
बीड- वाल्मिक कराडला केज पोलीस स्टेशनमध्ये हजर केलं जाणार आहे.. मकोका अंतर्गत पुण्यात अटक दाखवली जाणार आहे. वाल्मिक कराडला अटक दाखवण्याची प्रक्रिया सुरू असून काही वेळात केज कोर्टात हजर केलं जाणार आहे.
“कोरोना काळातही भारताने चांगलं काम केलंय. भारतानं ‘सागर’ हा जगाला मंत्र दिला. वाघशीर या सहाव्या पाणबुडीचं राष्ट्रार्पण करण्याचं भाग्य मिळालं. जगाचा भारतावरील विश्वास वाढलाय. आपण जगाला वन अर्थ, वन फॅमिलीचा मंत्र दिला”, असं मोदी म्हणाले.
“नौसेनेला सशक्त करण्यासाठी आपण मोठं पाऊल उचलत आहोत. दोन्ही युद्धनौकांसह पाणबुडी भारत निर्मित आहेत. भारतीय नौदल ताकदवान बनतंय”, असं मोदी म्हणाले.
गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या शस्त्र परवान्यांचा मुद्दा ऐरणीवर आलाय. सध्या राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात शस्त्र परवाने रद्द करण्याच्या प्रक्रिया सुरू असतानाच जालना जिल्हा पोलीस प्रशासन देखील ॲक्शन मोडवर आलेय.जिल्ह्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या व्यक्तींचे शस्त्र परवाने (बंदूक आणि इतर शस्त्रे) रद्द केले जाणार असल्याची माहिती जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली आहे.
महापालिका निवडणुकांपूर्वी नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि राज्य प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी घेतला काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून येत्या दोन दिवसात त्या पक्षाचा राजीनामा देणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर हेमलता पाटील नाराज आहेत. विधानसभा निवडणुकीत नाशिकमधली जागा ठाकरे गटाला दिल्यापासून हेमलता पाटील नाराज होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. आज दोन युद्धनौका आणि पाणबुड्यांचं राष्ट्रार्पण होणार आहे. मोदींच्या हस्ते आयएनएस सूरत आणि आयएनएस निलगिरी या युद्धनौकांचं आणि आयएनएस वाघशीर या पाणबुडीचं जलावतरण होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. मोदींच्या हस्ते आज 2 युद्धनौका, पाणबुड्यांचे आज राष्ट्रापर्ण होणार आहे. त्यानंतर ते महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत. तर आज दुपारी दे खारघर येथे इस्कॉन मंदिराचे लोकार्पण करतील.
वाल्मीक कराडचा तुरुंगातून एसआयटीने ताबा घेतला. वाल्मीकला हत्या आणि मकोकाच्या गुन्ह्यात कागदोपत्री अटक करण्याची प्रक्रिया सुरू.
कागदोपत्री अटकेची कारवाई पूर्ण करून केज कोर्टात हजर करणार.
शिवसेना ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या विष्णू भंगाळे यांची शिवसेना शिंदे गटाच्या जळगाव जिल्हा जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विधानसभेच्या मतदानाच्या आदल्या दिवशी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी राजीनामा देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. दोन महिन्यांनंतर विष्णू भंगाळे यांची शिवसेना शिंदे गटाच्या जळगाव जिल्हा जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याच्यामुळे जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये आरोपी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांचं नाव आल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. यामुळेच काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली आहे.
मिरा-भाईंदर पालिकेने कर्करोगग्रस्त महिलांसाठीच्या आर्थिक मदतीच्या धोरणात बदल केला आहे. याआधीच्या धोरणात कर्करोगाच्या प्रकारासंदर्भात स्पष्टता नसल्याने अनेक महिला मदतीपासून वंचित राहिल्या होत्या. नव्या धोरणामुळे महिलांच्या आर्थिक मदतीचा मार्ग खुला झाला आहे.
दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाची मंजुरी… दिल्ली निवडणुकीपूर्वी केजरीवालांच्या अडचणीत वाढ… अरविंद केजरीवाल यांच्यावरील आरोपनिश्चिती होण्यापूर्वी पूर्वपरवानगी आवश्यक होती… केंद्रीय गृहमंत्रालयाने ED ला पूर्व परवानगी दिली आहे… गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ED ला खटला चालवण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्रालयाची पूर्व परवानगी घेणे गरजेचे असेल. त्यानुसार ही परवानगी दिली गेलेली आहे…
सकाळी दहा वाजता होणार उद्घाटन… सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन… राज्यातील काँग्रेस नेतेही उद्घाटनाला उपस्थित राहणार… नव्या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाला इंदिरा भवन असे नाव…
राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे (एनटीए) 15 जानेवारीला घेण्यात येणारी विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी नेट) पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेची नवी तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, 16 जानेवारीची परीक्षा आधीच्याच नियोजनानुसार होणार असल्याचं ‘एनटीए’चे संचालक राजेश कुमार यांनी सांगितलं.
राजधानी दिल्लीतील दृश्यमानता पोहोचली शून्यावर. दिल्ली विमानतळ, इंडिया गेट परिसरात प्रचंड दाट धुक. हिमाचल प्रदेश उत्तराखंड राज्यातही पहाटेपासून मोठ्या प्रमाणात धुकं. उत्तर भारतातील सर्वच राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे मार्गांवरही परिणाम. दिल्लीत येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या उशिरा.
कर्वेनगर येथील नामांकित शाळेत अल्पवयीन बालकांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी नृत्य शिक्षकाच्या पोलीस कोठडीत विशेष न्यायाधीश के. डी. शिरभाते यांच्या न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि प्रवक्ते हेमलता पाटील यांची फेसबुक पोस्ट चर्चेत. या फेसबुक पोस्टद्वारे पुन्हा खदखद व्यक्ति केली. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून पक्ष सोडण्याचे देखील दिले संकेत. भावी राजकीय वाटचालीसाठी तुमच्या आशीर्वादाची अपेक्षा असा पोस्टमध्ये उल्लेख.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्याहस्ते आज मुंबईच्या नौदल गोदीत आयएनएस सूरत, आयएनएस नीलगिरी या युद्धनौका आणि आयएनएस वाघशीर ही पाणबुडी देशाला समर्पित करण्यात येईल. खारघर येथे बांधण्यात आलेल्या इस्कॉन मंदिराच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आहे. महायुतीच्या आमदारांशी सुद्धा मोदी संवाद साधतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येत आहेत. मुंबई दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पणाचे विविध कार्यक्रम होणार आहेत. त्याचवेळी पीएम मोदी आज महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत. दुसऱ्याबाजूला आज सुद्धा संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. सोमवारी संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी सर्व आरोपींना मोक्का लावावा यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं. काल वाल्मिक कराड समर्थकांनी परळी पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन केलं. यावेळी काही समर्थकांनी वाल्मिक कराडच्या सुटकेच्या मागणीसाठी स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. एका समर्थकाचा पेटवून घेण्याच्या प्रयत्नात पाय जळाला.