मोठी बातमी समोर आली आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणेला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.तिन्ही आरोपींना 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. केज न्यायालयाने ही कोठडी सुनावली आहे.
जालन्यातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलीय.अर्जुन खोतकर यांचा विधानसभेतील निवडणूक अर्ज हा विहित नमुन्यात भरलेला नसून त्यांच्याकडून लाभाची पद आणि गुन्ह्याविषयी माहिती लपवल्याचा आरोप करत गोरंट्याल यांनी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती,मात्र ही तक्रार फेटाळून लावल्यानंतर या निर्णयाविरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतलीय.
परभणीतील कोम्बिंग ऑपरेशनची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. सोमनाथच्या कुटुंबाला, वाकोडे यांच्या कुटूंबाला आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे 6 किंवा 7 तारखेला या सर्वाना मुख्यमंत्री भेटतील, असे आमदार सुरेश धस यांनी म्हटले.
संतोषच्या मारहाणीचा व्हिडीओ आकाला दाखवला असेल तर त्याची जेलवारी निश्चित आहे, असे भाजप आमदार सुरेश धस यांनी परभणीत सांगितले.
आरोपींना मोक्का लावले पाहिजे, असे सांगत आमदार सुरेश धस अजित पवार यांना उद्देशून म्हणाले, आकाच्या आकाला का मंत्रिमंडळात घेतले. बीड जिल्ह्यातील सर्व हत्या कोणी घडवून आणले. ते पाहा. हवे तर बारामतीची माणसे पाठवा, चौकशी करा.
बीडमध्ये गुंडाराज सुरु आहे. विशिष्ट नेत्याचे दादागिरी सुरु आहे. त्यांना आता वठणीवर आणण्यासाठी आपण बीडमध्ये येत राहू, असे नरेंद्र पाटील यांनी म्हटले.
शिवसेना उबाठाचे नेते राजन साळवी भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे भावना मांडल्या. आता आपण समाधानी झाल्याचे साळवी यांनी म्हटले.
आमच्या माणसाचे प्राण गेले आहे. सर्वांची एकच मागणी आहे, आकाला उचला. नरेंद्र पाटील यांनी अशी बीडमध्ये बोलताना सांगितले.
अमरावतीच्या बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील यवतमाळ नाका परिसरातील गुप्ताजी ढाबा समोरील गोडाऊनमध्ये सुरू असलेल्या एसबी क्रिएशन या कापड कारखान्यातून दहा बालकामगारांची मुक्तता करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांच्या स्पेशल स्कॉड व कामगार आयुक्त कार्यालयातील पथकाने ही संयुक्त कारवाई केली.
हिंसाचाराच्या सहा महिन्यानंतरही कोल्हापूरच्या विशाळगडावरील व्यवहार ठप्पच आहे. विशाळगडावर अजूनही संचारबंदी लागू आहे. गडावर स्थानिक व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जात नाही. पर्यटक नसल्याने गडावर शांतता आहे.
परभणीत संतोष देशमुख आणि सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्त ‘मुक मोर्चा’ काढण्यात आला असून मराठा नेते मनोज जरांगे पाटील व्यासपीठावर दाखल झाले आहेत. भाजपाचे आमदार सुरेश धस देखील या मोर्च्यात सहभागी झाले आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आणि बीड पोलीस तपास करत आहेत, त्यांच्या कामाबद्दल आणि त्यांचा तपासाबद्दल मी बोलणे अयोग्य असल्याचे पोलिस अधिकारी आशुतोष ठोंबरे यांनी म्हटले आहे.
संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले आणि संतोष सांगळे यांना केज कोर्टात हजर केले आहे.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला सीआयडीने अटक केली. त्यांना केज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर कृष्णा आंधळे हा फरार आहे.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणातील आरोपी पुण्यातूनच कसे सापडत आहेत, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. याविषयी सरकारने अधिकृत माहिती द्यावी अशी मागणी त्यांनी केली.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात तपासात कोणी अडथळे आणू नये, कोणी तशी वक्तव्ये करू नये असे मत मंत्री संजय शिरसाट यांनी मांडले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ परभणीतून आज मूक मोर्चा निघणार आहे. नूतन मैदानावर गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात नूतन मैदानवरुन मोर्चा निघणार आहे.मोर्चात सर्वपक्षीय नेते सहभागी होणार आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले वा इतर आरोपींची हत्या झाल्याची माहिती कपोलकल्पित असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रकाश साळुंके यांनी दिली. पोलिसांचा तपास गतीने सुरू असल्याचे ते म्हणाले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींची नार्को टेस्ट करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. या सर्व आरोपींना राजकीय पाठबळ आहे. त्यांना कोण वाचवत होतं. त्यांना कोण पाठीशी घालत होतं, हे समोर यायला हवं असे ते म्हणाले.
बुलढाणा जिल्ह्यातील हमी भाव केंद्रावरील सोयाबीन खरेदी मागील आठवड्यापासून बारदाना अभावी बंद आहे. त्यामुळे शेतकरी आपला माल खरेदी केंद्रावर न नेता त्याला बाजारात कमी भावात विकावा लागत आहे ..
आरोपी विशाल गवळी,आणि पत्नी साक्षी गवळीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावताच नराधम विशालला न्यायालयात कोसळले रडू. पत्नीला एकदा भेटू द्या, अशी विनंती त्याने पोलिसांना केली.
कल्याण अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
संतोष देशमुख हत्या : तीन पैकी दोन आरोपींना आता अटक झाली हे ऐकून बरं वाटलं, आता चौकशीला आता वेग जाईल. अटक झालेले आरोपी हेच प्रमुख सूत्रधार होते असं म्हटलं जात आहे, आता कोण कोण सहभागी आहे, हे सगळे आता लवकर बाहेर येईल.
या आरोपींची जिथे चौकशी होत आहे तिथे सीसीटीव्ही कॅमेरा पाहिजे आणि ऑन कॅमेरा चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.
राजकारणात काहीही शक्य आहे. उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले ते नवल होतं, पण ते आता परत येत असतील तर नवल नाही. ते त्यांच्या मूळ विचारात आहे. ठाकरे गटाला सोबत घ्यायचं की नाही याचा निर्णय वरिष्ठ घेतील, असे विधान आमदार आशिष देशमुख यांनी केले आहे.
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील हतरु ग्रामपंचायत अंतर्गत चिलाटी या गावातील नागरिकांनी 2023 मध्ये 300 मजुरांनी रोजगार हमीच्या कामावर काम केले होते. परंतु त्या कामाची मजुरी अद्याप मिळालेली नसल्यामुळे चिलाटी गावातील नागरिकांनी आणि उपसरपंच भैयालाल मावसकर यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला. संबंधित मजुरी देण्याची मागणी केली. परंतु मजुरी न मिळाल्याने चिलाटी गावकरी व भैय्यालाल मामस्कर गुरुवारी दोन जानेवारी रोजी टाळा ठोको आंदोलन करण्याची निवेदनाच्या माध्यमातून जाहीर केले होते. परंतु तरीही शासनाकडून मजुरी मिळाली नाही. यामुळे तीनशे आदिवासी बांधव आक्रमक होऊन यांनी हतरु येथे असलेल्या तलाठी कार्यालयाला तलाठोको आंदोलन केले आहे.
सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे. त्याशिवाय ते बोलणार नाहीत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना बीडमधला दहशतवाद मोडून काढायचा आहे. त्यांनाही बंदुकीचे राज्य संपवायचे आहे. ज्यादिवशी आम्हाला वाटेल की यात पडद्यामागे वेगळं घडतंय, तेव्हा आम्ही पुन्हा एकदा या प्रश्नाला वाचा फोडू – संजय राऊत
सिडनी कसोटीत भारतीय गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. भारताला पहिल्या डावात 4 धावांची नाममात्र आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 181 धावांवर संपुष्टात आला. भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या होत्या. मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी 3 तर नितीश रेड्डी आणि बुमराहने प्रत्येकी दोन विकेट घेतले.
कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीचे अपहरण हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आणि साक्षी गवळीची आज पुन्हा न्यायालयात हजेरी. संभाव्य कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न टाळण्यासाठी न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त. बॅरिकेडिंगसह चोख सुरक्षा. आरोपींना आधी 7 दिवसांची पोलीस कोठडी होती, नंतर ती 2 दिवसांनी वाढवली गेली. आज ती संपत आहे.
अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या वादावर अखेर तोडगा. आयोजकांना आलेल्या धमक्यानंतर साहित्य मंडळाचा निर्णय. या प्रकरणात सावरकरांचं नाव साहित्य संमेलनात द्यावं यासाठी आयोजकांना धमक्या देण्यात आल्या होत्या. या धमक्यानंतर मुंबईत महामंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत साहित्य संमेलनाच्या एका व्हीआयपी द्वाराला सावरकर यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपींपैकी दोन आरोपींना पकडल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती. अन्य एकाला देखील ताब्यात घेतल्याची माहिती. त्याने देखील आरोपींना फरार होण्यासाठी मदत केल्याची माहिती. काही वेळात पोलीस अधीक्षक पत्रकारांशी साधणार संवाद.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी परभणीत आज मूक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. सरकार आम्हाला न्याय आणि सुरक्षा द्यावी, नाहीतर शस्त्र परवाने द्या. आरोपी वाल्मिक कराडवर खुनाची कलमे लावून त्याला मोक्का का लावल्या गेला नाही? यासह विविध प्रश्नांवरुन परभणीच्या चौकात पोस्टरबाजी. दरम्यान पुणे सातारा महामार्गावरील कात्रज घाटातल्या जुन्या बोगद्याच्या आतील भागातील प्लास्टरचा काही भाग कोसळला. बोगद्याच्या वरील भागात केलेला प्लास्टरचा काही भाग वीटांसह कोसळला. सुदैवाने यावेळी याठिकाणी वाहन नसल्यानं दुर्घटना टळली. सकाळी 6 ते 7 वाजताच्या दरम्यान घटली घटना.