महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसतर्फे शोभा बच्छाव यांचं नाव धुळे लोकसभेसाठी निश्चित झालं आहे. पण, यामुळे दुसरीकडे काँग्रेसमधील एक गट नाराज झाला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांना उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. श्याम सनेर निष्ठावंत कार्यकर्ते असून धुळे लोकसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी त्यांचा जनसंपर्क आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत. दुपारी दीड वाजता हेलिकॉप्टरचा प्रवास करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहचणार पुण्यात. पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहात व पालखीतळ सासरवड पुणे या ठिकाणी लोकसभा निवडणुकीबाबत आढावा बैठक घेणार. भाजपाचे मोठे नेते गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात आले, तर आपल्या जिल्हा विषयी त्यांना माहिती होईल असं प्रफुल पटेल म्हणाले. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे गोंदिया जिल्ह्यामध्ये 12 तारखेला येणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथे 14 तारखेला येणार. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची 11 वी यादी जाहीर झाली आहे. अकराव्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव नाही. राज्यातील भाजप उमेदवारांची यादी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
पूजा तडस आणि सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत तडस कुटुंबीयांवर आरोप केला आहे. घर परस्पर विकून सुनेला घराबाहेर काढलं, असा आरोप अंधारेंनी केला. तडस कुटुंबीयांनी माझ्यावर गंभीर आरोप केले आणि मला लोखंडी रॉडेल मारलं असं पूजा तडस म्हणाल्या. पूजा तडस या वर्ध्यातून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.
अभिनेता अक्षय कुमारच्या प्रॉडक्शन कंपनीतून बोलत असल्याचं भासवून चित्रपटात भूमिका देण्याचं आमिष दाखवून तरुणीची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जुहू पोलिसांनी अटक केली. आरोपीने निर्भया प्रकरणावर आधारित चित्रपटात महत्त्वाची भूमिका देण्याचं आमिष दाखवलं होतं.
घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो 1 मार्गिकेवरून प्रवास करताना आता कागदी तिकीट किंवा ई-तिकीट घेण्याची, मोबाइलवरून क्यूआर कोड स्कॅन करण्याची गरज नाही. आता फक्त मनगटी पट्टा (रिस्ट बँड) स्कॅन करून मेट्रो 1 मधून प्रवास करता येईल. मनगटावरील पट्ट्याची अनोखी तिकीट सेवा बुधवारपासून सुरू करण्यात आली.
राजस्थानवरून ईशान्येकडे जाणारा थंड वाऱ्याचा झोत आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा संयोग विदर्भात होत आहे. त्यामुळे दोन दिवस गारपीट होण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात चक्रवाताची स्थिती झाली असून बाष्पयुक्त उष्ण वारे राज्यात येत आहेत. या स्थितीमुळे विदर्भात दोन दिवस गारपिटीसह अवकाळी पाऊस पडेल
वर्षा गायकवाड या नाराज असल्याचे वृत्त काल आले होते. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानुसार, मुंबईत जागा वाटपावर आम्ही नाराज आहोत. यामुळे पक्षश्रेष्ठींकडे माझे म्हणणे मी मांडले आहे. मुंबईत अनेक ठिकाणी आमचे संघटन आहे. यामुळे मुंबईत पक्षाला प्रतिनिधीत्व मिळावे, ही अपेक्षा होती.
मंदिराबाहेर मिळणारे लाल धागे दहशतवाद्यांचे कवच ठरत असल्याचा गौप्यस्फोट ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी केला. डोंबिवलीत गणेश मंदिर संस्थानच्या वतीने गुढीपाडवा व नववर्षाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी अनुभव कथन केले.
१५ एप्रिल रोजी दौंड तालुक्यात शरद पवारांची सभा होणार आहे. बारामती लोकसभेच्या विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या सभा होणार आहेत.
सांगली व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमधील काँग्रेसचे काही नेते भाजपचा छुपा प्रचार करत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मधील काही उमेदवार भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा त्यांनी केला. जयंत पाटील यांच्या मुलाचा पराभव दिसला म्हणून हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये सत्यजित आबा यांचा बळी दिल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.
पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचारासाठी येत आहेत.सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, रवी धंगेकर हे तिन्ही उमेदवार एकत्र येत आहेत.मार्केट यार्डच्या दारावर या तिन्ही उमेदवारांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरु आहे.
अमरावतीमधून भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र राणा या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. बावनकुळे यांच्या एका विधानामुळे नवनीत राणा नाराज असून त्यांनी त्यांची नाराजी स्पष्टपणे बोलूनही दाखवली आहे. मी आणि माझे पती रवी राणा, यांच्यात मध्ये पडू नका, बोलू नका, असा सल्ला त्यांनी बावनकुळे यांना दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पदाची प्रतिष्ठा खूप खाली आणली आहे. मोदींना लोकसभा , विधानसभेच्या निवडणुका या विरोधकांशिवाय हव्या आहेत. त्यांना देशात पुतिन मॉडेल आणायचं आहे अशी टीका संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर केली.
मंत्री मंगलप्रभात लोढा हे मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेणार. लोढा हे दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. आज सकाळी ११.३० च्या सुमारास ते राज ठाकरे यांची भेट घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी आमचं संघटन, पक्षाला प्रतिनिधीत्व मिळावं ही आमची अपेक्षा आहे. मुंबईत जागावाटप करताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही, वर्षा गायकवाड यांचा आरोप.
राजू शेट्टी यांनी इंडिया आघाडीवर सडकून टीका केली आहे. जयंत पाटील यांच्या मुलाचा पराभव दिसला म्हणून हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये सत्यजित आबा यांचा बळी दिला आहे, असे ते म्हणाले.
सांगली व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमधील काँग्रेसचे काही नेते भाजपचा छुपा प्रचार करत आहेत.
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मधील काही उमेदवार भाजपमध्ये प्रवेश करतील.
कल्याण पूर्वेतील सूचक नाका परिसरात दुकानासह घराला आग लागली . या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही.
आगीची माहिती मिळताच कल्याण पूर्व अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. शक सर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मोदींना देशात पुतिन मॉडेल आणायचं आहे. मोदींना देशात विरोधक नकोत. त्यांना विरोधकांशिवाय निवडणुका हव्या आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
आमदार शशिकांत शिंदे यांचे सातारा जिल्ह्याच्या वेशीवर शिरवळ येथे आगमन झाले आहे. महाविकास आघाडीतून आमदार शशिकांत शिंदे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. तुतारीच्या गजरात आमदार शशिकांत शिंदे यांच्या जंगी स्वागत करण्यात आले. शिरवळ येथे स्वागतासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या वतीने आमदार शशिकांत शिंदे यांना सातारा लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज सातारा जिल्ह्याच्या वेशीवर शिरवळ येथे कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आमदार शशिकांत शिंदे यांचे ठिकठिकाणी स्वागत होणार आहे.
नागपुरात एकीकडे राजकारणाचा पारा गरम झाला असताना पावसाने मात्र वातावरणात गारवा निर्माण केला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून थांबून थांबून पावसाची हजेरी पहायला मिळत आहे. नागपुरात या दिवसांमध्ये तापमानाचा पारा वाढलेला असतो मात्र आता सर्वत्र पावसाळी वातावरण झाल्याचे चित्र पाहायला मिळते.
ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामाला आळा घालण्यासाठी जीपीएस सॅटेलाइट प्रणालीचा अवलंबून करण्यात येणार आहे. तसेच अनधिकृत बांधकाम होत असल्याचे निदर्शनास येताच ते तत्काळ निष्कसित करण्याच्या स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
जळगावच्या जामनेरमध्ये अवकाळी पावसामुळे एक हजार ३०० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसाचा तडाख्यात मका, केळी, लिंबू, बाजरी, भाजीपाला व गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांची रक्षा खडसेंच्या उमेदवारीवर नाराजी कायम. मुक्ताईनगरात महायुतीत बिघाडी झाल्याच चित्र निर्माण झालं आहे. रक्षा खडसे ही अखेर संतापल्या. मुक्ताईनगरच्या आमदारांना जे करायचे ते त्यांनी करावं. त्यांच्याबाबत मी खूप प्रयत्न करून बघितले. 137 कोटी प्रकरणी चंद्रकांत पाटील कोर्टात गेले, तर मी पण त्यांना कोर्टाच्या माध्यमातूनच उत्तर देईन, असं रक्षा खडसे म्हणाल्या.
महायुतीकडून आता अचानक विजय करंजकर यांचं नाव पुढे. दोन दिवसांपासून महायुतीकडून विजय करंजकर यांच्या नावाची चर्चा. विजय करंजकर सध्या ठाकरे गटात. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने आहेत नाराज. करंजकर यांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती मुख्यमंत्री शिंदे यांची भेट. शिंदे गटातून करंजकरांना नाशिक लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी ?
महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसतर्फे शोभा बच्छाव यांचं नाव धुळे लोकसभेसाठी निश्चित. दुसरीकडे मात्र काँग्रेस मधील एक गट नाराज. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांना उमेदवारी मिळावी कार्यकर्त्यांचा आग्रह. श्याम सनेर निष्ठावंत कार्यकर्ते. धुळे लोकसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी त्यांचा जनसंपर्क. त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळायला हवी यासाठी झाली बैठक. शामसनेर यांच्याकडे खर्च करण्यासाठी पैसा नाही या कारणाने वरिष्ठांनी उमेदवारी नाकारल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील काही जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट. आज दिवसभरात तीन ते पाच डिग्री तापमान वाढण्याची शक्यता. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याच आवाहन. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन्ही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज दिवसभरात उष्णतेची लाट.