Maharashtra Political News live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर, हातकणंगले दौऱ्यावर

| Updated on: Apr 14, 2024 | 8:01 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 13 एप्रिल 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Political News live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर, हातकणंगले दौऱ्यावर
Follow us on

पॅलेस्टीनचा झेंडा फडकवल्याप्रकरणी मालेगावात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. हिंदुत्ववादी संघटनांची पोलीस स्थानकाच्या गेटवर घोषणाबाजी करीत आंदोलन. ध्वज फडकवल्याचा बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व शिव प्रतिष्ठान सह हिंदुत्ववादी संघटनांनी केला निषेध. देशद्रोहाचा गुन्हा न दाखल केल्यास तीव्र आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पोलिसांकडून 5 जणांवर गुन्हा दाखल. दुसऱ्याबाजूला लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सावंत, आमदार मदन येरावार, पालकमंत्री संजय राठोड, खासदार हेमंत पाटील यांची हॉटेल ओबेरॉय जसराज मधील 217 मध्ये अडीच तास बंद दाराआड चर्चा झाली. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 13 Apr 2024 04:52 PM (IST)

    बंगळुरू बॉम्बस्फोट प्रकरणी मोठा खुलासा, दहशतवाद्यांचा ISIS च्या अल हिंद मॉड्यूलशी संबंध

    बंगळुरू बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी ISIS च्या अल हिंद मॉड्यूलशी संबंधित होते. अब्दुल मतीन, मुसाव्वीर यांना परदेशातून सूचना येत असत. ISIS अल हिंद मॉड्यूल देशासाठी मोठा धोका आहे. अल हिंद मॉड्यूलचे स्लीपर सेल अनेक राज्यांमध्ये पसरलेले आहेत.

  • 13 Apr 2024 04:35 PM (IST)

    महादेव ॲप प्रकरणी एसआयटी बॉलिवूड अभिनेता साहिल खानची चौकशी करणार

    महादेव बेटिंग ॲप प्रकरणी बॉलिवूड अभिनेता साहिल खान मुंबई पोलिस मुख्यालयात पोहोचला. याप्रकरणी एसआयटी त्यांची चौकशी करणार आहे.


  • 13 Apr 2024 04:25 PM (IST)

    शिरोमणी अकाली दलाने पंजाबमध्ये 7 उमेदवारांची केली घोषणा

    बैसाखीच्या मुहूर्तावर शिरोमणी अकाली दलाने लोकसभा निवडणुकीसाठी पंजाबमधून आपल्या 7 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पंजाबचे माजी कॅबिनेट मंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे वरिष्ठ उपाध्यक्ष दलजीत सिंग चीमा यांना गुरुदासपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचवेळी श्री आनंदपूर साहिबमधून माजी खासदार प्रेमसिंग चंदू माजरा यांना रिंगणात उतरवण्यात आले.

  • 13 Apr 2024 04:03 PM (IST)

    उद्या सकाळी 9 वाजता भाजपा संकल्प पत्र जाहीर करणार

    रविवारी सकाळी ९ वाजता भाजप लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. भाजपचा हा जाहीरनामा भाजप मुख्यालय विस्तार भवन येथे प्रसिद्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री आणि जाहीरनामा समितीचे अध्यक्ष राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपचे संकल्प पत्र जारी केले जाईल. भाजपच्या जाहीरनाम्याचे शीर्षक ‘मोदींची हमी विकसित भारत 2047’ असं असू शकते.

  • 13 Apr 2024 12:51 PM (IST)

    डॉ. हिना गावित यांनी केली मोठी मागणी

    अवकाळी पावसामुळे शेती पिकांच्या प्रचंड नुकसान या नुकसानाची पाहणी भाजप उमेदवार डॉ. हिना गावित यांनी केली. अवकाळी पावसाचा फटका केळी, पपई, या पिकांचे नुकसान झालेल्या नुकसानाची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याचे मागणी केली.

  • 13 Apr 2024 12:42 PM (IST)

    भागवत कराड यांचे मोठे विधान

    परभणी, हिंगोली, नांदेड या तीन लोकसभेचा क्लस्टर प्रमुख असून त्याचा अहवाल देण्यासाठी मी आलो होतो. लोकसभेमध्ये प्रचार यंत्रणा अत्यंत चांगल्या पद्धतीने कामाला लागलेली आहे, असे भागवत कराड यांनी म्हटले आहे.

  • 13 Apr 2024 12:29 PM (IST)

    राज ठाकरे यांचा संजय राऊत यांना टोला

    कावीळ झालेल्या लोकांना सर्व जग पिवळं दिसते, म्हणत राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

  • 13 Apr 2024 12:04 PM (IST)

    वसंत मोरे यांच मोठं विधान राज ठाकरे यांना मी भेटण्याचा प्रयत्न करेन

    साहेब नाराज आहेत पण बघू काय करतात. मी निवडणुकीत पाठिंबा मागण्याचा प्रयत्न करेन काय विचार करायचा हा सर्वस्वी निर्णय हा राज ठाकरे यांचा आहे.

  • 13 Apr 2024 11:51 AM (IST)

     शिरूर लोकसभा मतदारसंघात तुतारी आणि घड्याळाचा संघर्ष

    शिरूर लोकसभा मतदारसंघात तुतारी आणि घड्याळाचा संघर्ष चांगलाच पेटला आहे.  शिरूर तालुक्यातील वडनेर येथे बैलगाडा शर्यती दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार पोपटराव गावडे भाषण करत असताना बैलगाडा मालकांनी तुतारी वाजवण्याचा सूर धरला आणि तुतारी वाजवलीच.

    यावेळी गावडे यांना आपले भाषण मध्येच थांबवावे लागले. तुतारीचा आवाज ऐका पण घड्याळाच्या टाईमा शिवाय काही चालत नाही असं म्हणून त्यांना आपलं भाषण आटोपतं घ्यावं लागलं.

  • 13 Apr 2024 11:33 AM (IST)

    वाशिम – महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ आज गोविंदाचा रोड शो

    वाशिम –  महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ आज सिने अभिनेता गोविंदा यांचा रोड शो आयोजीत करण्यात आला आहे.

    शहरातील सिव्हील लाईन परीसरातून रोड शोला सुरवात होणार आहे.   यावेळी आ. लखन मलिक, आ. विजय जाधव, माजी मंत्री सुभाष ठाकरे, चंद्रकांत ठाकरे, राजु पाटील राजे हे उपस्थित राहणार आहेत.

  • 13 Apr 2024 11:24 AM (IST)

    राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान, नुकसानीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

    राज्यभर ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे त्या त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.

    सर्व ठिकाणच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे सूचना मदत व पुनर्वसन विभागाकडून देण्यात आले आहेत. आचारसंहिता संपण्यापूर्वी संपूर्ण नुकसानीचा अहवाल राज्य सरकारकडे पोहोचला पाहिजे.

  • 13 Apr 2024 11:06 AM (IST)

    चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार कार्यालयाचे संजय राऊत यांच्या हस्ते होणार उद्घाटन

    चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार कार्यालयाचे संजय राऊत यांच्या हस्ते उद्घाटन होणार. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे राहणार उपस्थित.

    समर्थ नगरच्या मुख्य चौकात चंद्रकांत खैरे यांचं प्रचार कार्यालय असून उद्घाटन कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे.

  • 13 Apr 2024 10:42 AM (IST)

    Live Update | वाशिम मध्ये आज दुपारी 2 वाजता भावना गवळी कार्यकर्ते व पदाधिकारी बैठक घेऊन मांडणार भूमिका….

    भावना गवळी या कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी चर्चानंतर करून पत्रकार परिषद घेणार… मुख्यमंत्री यवतमाळच्या पत्रकार परिषदेत भावना गवळी उद्या सक्रिय होतील असं सांगितल्यानंतर आता गावळींच्या भूमीकडे लक्ष… भावना गवळी आणि त्यांचे कार्यकर्ते अद्याप प्रचारापासून आहेत दूर.

     

  • 13 Apr 2024 10:25 AM (IST)

    Live Update | जालन्यात यंदा भाजपचा पराभव हाईल – संजय राऊत

    बीडमध्ये पंकजा मुंडेंना निवडणूक सोपा राहिलेली नाही.. मराठवाड्याचं चित्र स्पष्ट झालं आहे… जालन्यात यंदा भाजपचा पराभव हाईल असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 13 Apr 2024 10:18 AM (IST)

    Live Update | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा १३३ वी जयंती, चैत्यभूमीवर उत्साह

    भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा १३३ वी जयंती आहे. मुंबईच्या चैत्यभूमी वर याचा उत्साह सध्या पाहायला मिळतोय.. संपूर्ण राज्यभरात लोकांनी या ठिकाणी यायला सुरुवात केलीये… यंदा निवडणुका आहेत त्यामुळे आचारसंहिता आहे… त्यामुळे राजकिय बॅनररहीत जयंती यावेळी साजरी केली जाणार आहे…

  • 13 Apr 2024 10:11 AM (IST)

    Live Update | जळगावकरांना पुढचे चार वर्ष पाणीटंचाईची नो चिंता..

    जळगावकरांना पुढचे चार वर्ष पाणीटंचाईची नो चिंता… वाघूर धरणावरून होतो संपूर्ण जळगाव शहराला पाणीपुरवठा… वाघूर धरणामध्ये जळगाव शहराला चार वर्ष पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध… वाघूर धरणात ७२.५८ टक्के जलसाठा शिल्लक… शेती आणि पिण्यासाठी तब्बल चार वर्षे पुरेल एवढा पाणीसाठा वाघूर धरणामध्ये आहे शिल्लक…

  • 13 Apr 2024 09:44 AM (IST)

    वाशिममध्ये पाणी टंचाईची समस्या

    वाशिमच्या रिसोड तालुक्यात यावर्षी सरासरी पेक्षा २४ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यातच रब्बी पिकांच्या सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर झाल्यानं बहुतेक सिंचन प्रकल्पांनी तळ गाठलाय. त्यामुळं आता भीषण पाणी टंचाईची शक्यता निर्माण झालीये.

  • 13 Apr 2024 09:27 AM (IST)

    एकाचा गाडीखाली चिरडून खून

    पुण्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे अनैतिक संबंधातून एका व्यक्तीला गाडीखाली चिरडल्याचा प्रकार समोर आलाय. यामध्ये अपघात दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. नारायणगाव येथील पुणे नाशिक महामार्गालगत एका हॉटेल समोर शाबिर कुरेशी हा व्यक्ती दुचाकीवर बसलेला असताना पाठीमागे भरधाव वेगाने आलेल्या कारने दुचाकीस्वाराला जागीच चिरडले. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

  • 13 Apr 2024 09:10 AM (IST)

    एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर

    कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोर्चे बांधणी सुरु करण्यात आली आहे. दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. यावेळी महायुतीचे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत.

  • 13 Apr 2024 08:56 AM (IST)

    Maharashtra News : निवडणूक कार्यालयात कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका, उपचारादरम्यान मृत्यू

    जालना लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. संजय सांडू ऋषी असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगरमधील गरवारे कंपनीनजीक असलेल्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयात कर्तव्यावर असताना काल दुपारी चार वाजेच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने ऋषी हे जमिनीवर कोसळले. त्यानंतर खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

  • 13 Apr 2024 08:46 AM (IST)

    Maharashtra News : माजी आमदाराकडून भाजपाला घरचा आहेर

    विश्वासात घेऊन काम नाही केलं, तर काँग्रेसची जी अवस्था आहे, ती भाजपाची व्हायला वेळ लागणार नाही, अशा शब्दात भाजपाचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुखांनी भाजपाच्या मंत्र्यांसह नेत्यांना खडे बोल सुनावत भाजपाला घराचा आहेर दिला आहे. तसेच सांगली लोकसभेचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्यावर देखील आगपाखड केली.

  • 13 Apr 2024 08:09 AM (IST)

    Maharashtra News : वादळी वाऱ्यासह पावसात नवनीत राणा यांचं प्रचार कार्यालय जमीनदोस्त

    अमरावती शहरात पहाटे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. अमरावती शहरातील वीज पुरवठा खंडित. खासदार नवनीत राणा यांचं प्रचार कार्यालय जमीनदोस्त. अमरावतीच्या इर्वीन चौकात झाडे कोसळली. वीज तारा व वीज खांब कोसळले. अमरावती शहरात अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वाहतुकीचा खोळंबा. कोसळलेली झाडे हटवण्यासाठी मनपा प्रशासन लागलं कामाला.

  • 13 Apr 2024 08:07 AM (IST)

    Maharashtra News : राज्यात तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा

    हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. 13 ते 15 एप्रिल असे तीन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असे विभागाने म्हटले आहे. याशिवाय 13 एप्रिल रोजी मध्य भारतात हलका ते मध्यम पाऊस, वादळ आणि गारपीटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 13 आणि 14 एप्रिल रोजी मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, वादळ आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात गेल्या आठवड्याच्या अखेरपासून सुरू झालेली अवकाळी पावसाचा मारा अजूनही सुरू आहे. येत्या 15 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार आहे.