गुडीपाडवा निमित्त शिवाजी पार्क मैदानावरवर आज मनसेची जाहीर सभा होणार आहे. सभास्थळी जवळपास 50 हजारांच्या वर खुर्च्यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. या जाहीर सभेतून आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करणार आहेत. राज्यात गुढी पाडव्याचा सर्वत्र उत्साह सुरु आहे. गुढीपाडवा नवीन वर्षानिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी झाली आहे. नागपूरात गुढीपाडव्याचा उत्साह सुरु झाला आहे. लक्ष्मीनगर चौकातून निघणार भव्य शोभायात्रा निघणार आहे. शोभायात्रेत अभिनेत्री प्राजक्ता माळी सहभाग होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी होणार आहेत. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात आपली भूमिका जाहीर केली. त्यांनी महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभास्थळी दाखल झाले आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. राज ठाकरे लवकरच आपली भूमिका मांडणार आहेत. राज ठाकरे यांचं आजचं भाषण महत्त्वाचं आहे. कारण राज ठाकरे आज महायुतीसोबत जाणार की नाही? याबाबतची घोषणा करणार आहेत.
मनसेची इथुन पुढची वाटचाल ही फक्त सत्तेच्या दिशेनं असणार आहे, असं नेते संदीप देशपांडे म्हणाले आहेत. तसेच इतर पदाधिकारी एकला चलो रे म्हणत असतील तर ती त्यांची भूमिका, अंतीम निर्णय राज ठाकरे यांचाच असेल, असंही देशपांडे यांनी स्पष्ट केलं. तसेच 4 तासांत बोलघेवड्यांना उत्तर मिळेल, असं म्हणत देशपांडे यांनी संजय राऊतांना टोला लगावला.
मुख्तार अन्सारी यांचा मोठा मुलगा अब्बास अन्सारी याला सर्वोच्च न्यायालयाने तीन दिवसांचा अंतरिम दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अब्बास अन्सारी यांना वडील मुख्तार अन्सारी यांच्या कबरीवर फातिहा वाचण्याची परवानगी दिली.
व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) रेकॉर्डच्या विरुद्ध इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) डेटा क्रॉस-चेकिंगशी संबंधित प्रकरणाची सुनावणी 16 एप्रिल रोजी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले.
मध्य प्रदेशातील बालाघाट येथील सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने अनेक दशके जुन्या विचारसरणीचे पालन केले. एक तर स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला आणि स्वातंत्र्य चळवळीत सामान्य माणसाने केलेले बलिदान काँग्रेसने सत्तेवर येताच नाकारले.
केजरीवाल यांच्या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, सरकारी साक्षीदाराची चौकशी करणे म्हणजे न्यायालयालाच प्रश्न विचारण्यासारखे आहे. सरकारी साक्षीदार होण्याचा कायदा 100 वर्षे जुना आहे. केजरीवाल यांना निवडणूक प्रचारापासून रोखण्यासाठी अटक करण्यात आली यावर न्यायालयाचा विश्वास नाही. न्यायालय कायद्यानुसार चालते.
नाशिक जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी व्यापारी व शेतकऱ्यांनी कांदा लिलाव सुरु केले आहे. लेव्हीबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत तोडगा न निघाल्याने हा निर्णय घेतला. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी व्यापारी व शेतकऱ्यांनी आपसात सुरु केली कांदा खरेदी विक्री.
आज नारायण राणेंची उमेदवारी जाहीर होणार होती पण झाली नाही.राणेंनी भाजपमुळे आपला स्वाभिमान पक्ष विसर्जित केला होता.त्यांच्यात उरलेला स्वाभिमान ही त्यांनी विसर्जित केलाय की काय? – वैभव नाईक यांची टीका
सांगली लोकसभेचा तिढा सुटला. शिवसेना ठाकरे गटाकडेच सांगलीची जागा असेल. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलच शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असतील. शिवसेनेचे उमेदवारी जाहीर होताच जिल्ह्यातील काँग्रेस नेते नॉटरीचेबल झाले आहेत. काँग्रेस नेते विश्वजीत कदम, विशाल पाटील आणि आमदार विक्रम सावंत संपर्क क्षेत्राबाहेर आहेत. तर जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर शुकशुकाट पहायला मिळत आहे.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेना मोठा भाऊ ठरला असून त्याखालोखाल काँग्रेसला जागा मिळाल्या आहेत. मात्र, या जागा वाटपात 10 जागा मिळवून शरद पवार गटानेही बाजी मारल्याचं दिसून आलं आहे.
महाविकास आघाडीचं अखेर जागा वाटप जाहीर झालं आहे. महाविकास आघाडीत ठाकरे गट 21, शरद पवार गट 10 आणि काँग्रेस 17 जागांवर लढणार आहे. यात भिवंडीची जागा शरद पवार गटच लढणार आहे. तर सांगलीची जागा ठाकरे गटाला देण्यात आली आहे.
अमरावती- अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात सकाळी गारपिटीसह वादळी वाऱ्याचा पाऊस झाला. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं. गहू, संत्रा, कांद्याच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस कुठल्या जागांवर लढणार ते वाचून दाखवलं. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस एकूण 17 जागांवर लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यात सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये मोठा वाद झाला होता.
एकाही जागेवर मविआत मतभिन्नता नाही… एकमताने आम्ही जागावाटपाचा निर्णय घेतला आहे… असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला विरोध करणाऱ्या याचिकेवर आज निकाल… दिल्ली उच्च न्यायालय देणार निकाल… सुनावणीवेळी केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी ही अटक एक षडयंत्र असून ही अटक स्क्रिप्ट असल्याचा आरोप केला होता… केजरीवाल यांना दिलासा की पुन्हा जेल यांचा होणार फैसला
दिल्लीतील मराठी जणांकडून गुढीपाडवा साजरा… दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात गुढी उभारून गुढीपाडवा साजरा.. टाळ मृदुंगाच्या गजरात गुढीपाडवा साजरा… महाराष्ट्र सदनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती…
दिंडोशी गुढीपाडवा शोभायात्रा समिती आयोजित भव्य दिव्य गुढीपाडवा शोभायात्रा काढण्यात आली. या मिरवणुकीत आमदार सुनील प्रभूही सहभागी झाले होते… सुनील प्रभू यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत आज राजकारणावर बोलण्यास नकार दिला.
कल्याण पूर्वेतील स्वागत यात्रेत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी उपस्थिती लावली. यावेळी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाडही उपस्थिती होत्या, दरम्यान दोन्ही महिला नेत्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत सोबत फोटो काढले.
भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील यांनी इंदापूर येथील आपल्या निवासस्थानी गुढीपाडव्याच्या निमित्ताने गुढी उभारली. सर्व जनतेला नूतन वर्ष सुख समाधान व आनंदाचे जावो अशी सदिच्छा दिल्यात. यावेळी राजवर्धन पाटीलही उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज बारामती तालुक्यातील काटेवाडीत गुढीपाडव्याचा सण साजरा केला. काटेवाडी येथील निवासस्थानी विधीवत पूजा करुन गुढी उभारण्यात आली.. यावेळी अजितदादा, सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार आणि जय पवार हेही उपस्थित होते.
सोने आणि चांदीने महागाईचे तोरण बांधले. दोन्ही मौल्यवान धातूची घौडदौड सुरुच आहे. दरवाढीची गुढी उभारल्याने ग्राहकांच्या खरेदीच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. सोने आणि चांदीने एप्रिल महिन्यातच सर्व रेकॉर्ड गुंडाळून ठेवले आहे.
डोंबिवलीत गुढीपाडवा नववर्ष स्वागत मिरवणूक पालकीचे शिवसेना शिंदे गटाच्या मध्यवर्ती शाखेकडून जंगी स्वागत करण्यात आलं. फुलाचा वर्षाव करत तलवारबाजी करण्यात आली. आमदार रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे मध्यवर्ती शाखेजवळ उपस्थित आहेत. मात्र खासदार यांच्या आधीच आमदार रवींद्र चव्हाण स्टेजवरून निघून गेल्याने पुन्हा एकदा खासदार एकनाथ शिंदे यांही आमदारांना रवींद्र चव्हाण यांना बोलावून सत्कार केला.
एआयएमआयएमने राज्यातील हायहोल्टज मतदारसंघ अमरावतीत खेळी खेळली आहे. पक्ष प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी या मतदारसंघात उमेदवार दिलेला नाही. त्याऐवजी पक्षाने या आंबेडकरांना पाठिंबा जाहीर केला आहे. भाजपने या मतदारसंघातून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज बारामती तालुक्यातील काटेवाडीत गुढीपाडव्याचा सण साजरा केला. काटेवाडी येथील निवासस्थानी विधीवत पूजा करुन गुढी उभारण्यात आली. यावेळी अजितदादा, सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार आणि जय पवार हेही उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उत्तर मुंबई लोकसभा उमेदवार पियुष गोयल यांनी आपल्या पत्नीसोबत गुढीपाडवा साजरा केला आणि बोरिवलीतील नवीन घरात गृहप्रवेश केला, यावेळी खासदार गोपाळ शेट्टी देखील उपस्थित होते.
मोदी-शाहंना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही ही राज ठाकरे यांची भूमिका. आता कोण पाय ठेऊ देत ते पहायचय असं संजय राऊत म्हणाले.
वर्षावरील बैठका हा आचारसंहितेचा भंग. संविधान न मानणारे आचारसंहितेचा भंग करु शकतात. महाराष्ट्राचे दुश्मन पराभूत होतील. मोदी विरुद्ध शरद पवार, मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना आहे, असं संजय राऊत म्हणाले.
मनसेच्या शिवाजी पार्क वरील मेळाव्यासाठी मनसे कार्यकर्ते जमायला सुरवात झाली आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गुडी उभारण्यात आली आहे.. थोड्या वेळात राज ठाकरे गाडीची कुटुंबीयासह पूजा करणार आहेत. गाडीची पूजा करताना राज ठाकरे बाहेर आल्यावर त्यांची एक झलक बघण्यासाठी मनसे कार्यकर्ते शिवतीर्थ समोर ठाण मांडून बसले आहेत..
उद्धव ठाकरे वादळामध्ये दीपस्तंभासारखे उभे आहेत. मोदींना ठाकरेंची आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेची भीती वाटतो. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे विरुद्ध नरेद्र मोदी, धर्म विरुद्ध अर्धम असा सामना आहे. मोदी जिथे जातील तिथे भाजपाच्या जागा कमी होणार असं संजय राऊत म्हणाले.
मविआत काही वाद नाही. विशाल पाटील, विश्वजीत कदम यांच्या भावनांशी सहमत. मविआ लोकसभेला 35 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असं संजय राऊत म्हणाले.
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उत्तर मुंबई लोकसभा उमेदवार पियुष गोयल यांनी आपल्या पत्नीसोबत गुढीपाडवा साजरा केला आणि बोरिवलीतील नवीन घरात गृहप्रवेश केला. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी देखील उपस्थित होते. पियुष गोयल यांनी गुढी पाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. हे नवीन वर्ष भारताच्या भविष्याचे वर्ष आहे, हे नवीन वर्ष भारताला जागतिक नेता बनवेल. माझे बालपण मुंबईचे आहे, मुंबई एकच आहे, देश आणि समाजात फूट पाडण्याचा विचार करणाऱ्यांना हे कधीच समजणार नाही असं पियुष गोयल म्हणाले.
डोंबिवलीत गुढीपाडवा निमित्त स्वागत यात्रेत हस्य जत्रेची टीम झाली सहभागी. टीव्ही नाईन मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांना दिल्या शुभेच्छा. डोंबिवलीत मराठमोळ वातावरण पाहून आनंद होत आहे. एक मे पासून गो घुमा हा चित्रपट येत असून या चित्रपटांमध्ये प्रत्येक घरातली व बायकांच्या जवळची गोष्ट या चित्रपटात असून हा एक विनोदी चित्रपट आहे. यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमाला गृहात जाण्याचा आवाहन देखील या वेळेस नम्रताने केले. इतर कलाकारांनी नवीन वर्ष सुख, समृद्धीचे आणि समाधानी प्रेमाचे जावो अशा शुभेच्छा दिल्या.
“मी जीवनात कधीच कुठल्या पक्षात जाणार नाही. माझा स्वतःचा युवा स्वाभिमान पक्ष आहे. माझा भाजपला पाठिंबा आहे. नवनीत राणा यांना पाठींबा आहे. पूर्ण ताकदीने नवनीत राणा यांना विजयी करणार” भाजप प्रवेशावर आमदार रवी राणा यांचे स्पष्टीकरण. दुसरीकडे नवनीत राणा यांचं रवी राणा यांच्या भाजप प्रवेशावर मोठं वक्तव्य. ‘रवी राणा यांच्या भाजप प्रवेशावर बाहेरच्या लोकांनी बोलू नये’
साईबाबांच्या शिर्डीतही गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाचा उत्साह दिसून येत आहे. साई मंदिराच्या कळसावर पारंपारिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली आहे. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नीक विधिवत पूजा करून ही गुढी उभारली.
गुढीपाडवा मुहूर्तावर आंबा खरेदीस गर्दी होते. त्यामुळे वाशीमधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात गुढीपाडवा मुहूर्तावर विक्रमी हापूस आंब्याची आवक झाली आहे. एकूण ९५,२४० पेट्या हापूस आंब्याचा आल्या आहेत.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी कमी मतदान असलेल्या शहरांमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांत मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून असा उपक्रम देशात प्रथमच राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची मूळ संकल्पना पुणे जिल्ह्याची असून पुणे शहरातील ३५ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सांगितले.
नागपूरात गुढीपाडव्याचा उत्साह सुरु झाला आहे. ढोलताशा पथकाच्या गजरात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आले. गुढीपाडवा शोभायात्रा पारंपरिक वेशात महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांचा सहभाग घेतला. शोभायात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी होणार आहेत. देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विकासाची गुढी उभारली जाणार आहे.