Marathi News Maharashtra Tv9 marathi poll says mahayuti many big leader will lose maharashtra assembly election 2024
महाराष्ट्रातील ‘या’ दिग्गजांचा अक्षरश: धुव्वा उडणार, विधानसभा निवडणुकीचा सर्वात मोठा पोल
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये भरपूर घडामोडी घडून गेल्या आहेत. या घडामोडींवर आता जनता मतदानाच्या माध्यामातून प्रतिक्रिया देणार आहे. महाराष्ट्रात लवकरच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीचा पोल टीव्ही 9 मराठीने जारी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधारावर हा पोल काढण्यात आला आहे.
Follow us on
लोकसभा निवडणुकीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी एक महत्त्वाचा पोल समोर आला आहे. या पोलनुसार, महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीनंतर सत्तांतर अटळ आहे. महाराष्ट्रात आगामी काळात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणयाची शक्यता आहे. ‘टीव्ही 9 मराठी’च्या पोलनुसार, महाराष्ट्रात आागमी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला तब्बल 158 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महायुतीला केवळ 127 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या दिग्गजांना धक्का बसणार आहे. अनेक जण हजारो मतांनी पिछाडीवर राहण्याची शक्यता आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, शिवसेनेचे तानाजी सावंत, उदय सामंत, भाजपचे सुधीर मुनगंटीवार, हरिभाऊ बागडे अशा अनेक नेत्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील ‘या’ दिग्गजांना मोठा धक्का बसणार?
पोलनुलार, शिवसेना आमदार अब्दुल सत्तार हे सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून 27 हजार 759 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
शिवसेना नेते तथा राज्याचे विद्यमान आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे परांडा विधानसभा मतदारसंघातून तब्बल 81 हजार 177 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे मंत्री उदय सामंत हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून 10 हजार 37 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या यामिनी जाधव या भायखळा विधानसभा मतदारसंघातून 46 हजार 66 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून 21 हजार 20 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर हे कुर्ला विधानसभा मतदारसंघातून 23 हजार 659 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील हे 11 हजार 368 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे येवला विधानसभा मतदारसंघातून 13 हजार 205 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
अजित पवार गटाचे आमदार संजय शिंदे हे माढा विधानसभा मतदारसंघातून 52 हजार 515 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक हे अणुशक्ती विधानसभा मतदारसंघातून 29 हजार 83 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे हे सिन्नर विधानसभा मतदारसंघातून 1 लाख 28 हजार मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे हे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून तब्बल 55 हजार 951 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे हे अकोलो विधानसभा मतदारसंघातून 54 हजार 379 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हे कुडाळ मतदारसंघातून 26 हजार 236 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या अंधेरी पूर्व मतदारसंघातून 10 हजार 118 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत हे कन्नड विधानसभा मतदारसंघातून 31 हजार 104 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघातून 14 हजार 483 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे विकास ठाकरे हे 6 हजार 604 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील हे चक्क 63 हजार 798 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार हे तब्बल 48 हजार 200 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
भाजपचे संतोष दानवे हे भोरदन येथून 962 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
भाजपचे आमदार संभाजी निलंगेकर हे निलंगा मतदारसंघातून 20194 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांचा फुलंब्री मतदारसंघातून 29,856 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील हे तुळजापूर येथून तब्बल 52176 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
भाजपचे घाटकोपर पश्चिम विधानसभेचे आमदार राम कदम हे 15,772 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.
भाजपचे बबनराव लोणीकर हे परतूर येथे 25,344 मतांनी पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.