मोठी बातमी ! कसारा ते इगतपुरी दरम्यान मालगाडीचे डब्बे घसरले; वाहतूक विसकळीत

| Updated on: Dec 10, 2023 | 9:13 PM

कसारा आणि इगतपुरी दरम्यान मालगाडीचे डब्बे घसरले आहेत. त्यामुळे अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरची वाहतूक विसकळीत झाली आहे. ही वाहतूक सुरू करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. रेल्वेचे कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

मोठी बातमी ! कसारा ते इगतपुरी दरम्यान मालगाडीचे डब्बे घसरले; वाहतूक विसकळीत
Follow us on

कसारा | 10 डिसेंबर 2023 : कसारा आणि इगतपुरी दरम्यान मालगाडीचे डब्बे घसरले आहेत. त्यामुळे अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरची वाहतूक विसकळीत झाली आहे. ही वाहतूक सुरू करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. रेल्वेचे कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. या कामासाठी एक ते दीड तास लागणार आहे. त्यामुळे या मार्गावरील सेवांवर परिणाम होणार असून प्रवाशांना नाहकचा त्रास सहन करावा लागणार आहे.

आज संध्याकाळी 6 वाजून 31 मिनिटांनी ही घटना घडली. मुंबई डिव्हिजनवर डाऊन मेन लाइनवर कसारा टीजीआर-3 डाऊन लाइन सेक्शन दरम्यान एक मालगाडी पटरीवरून उतरली. मालगाडी- /डीएलआयबी कंटेनर ट्रेनचे दोन वॅगन पटरीवरून घसरले. त्यामुळे कसारा ते इगतपुरी सेक्शन डाऊन सेक्शनमद्ये मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या दुर्घटनेमुळे फक्त कसारा ते इगतपुरी दरम्यानच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. इतर वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. तसेच मुंबईतील लोकल सेवेवरही त्याचा काहीच परिणाम झाला नसल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं.

या मार्गावर वाहतूक सुरळीत

याशिवाय इगतपुरी ते कसारा यूपी खंडवरील एक्सप्रेसच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. त्या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. दरम्यान, मालगाडीचे डब्बे पटरीवरून घसरल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन युद्धपातळीवर काम सुरू केलं आहे. एक ते दीड तासात वाहतूक सुरळीत होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

इगतपुरीच्या दिशेने जात असताना ही मालगाडी घसरली. सुदैवाने आज रविवार होता. शिवाय दुसरी एक्सप्रेस नव्हते. तसेच बाजूच्या पटरीवरून कोणतीही गाडी जात नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. शिवाय संध्याकाळी उजेड असतानाच ही घटना घडल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांना तातडीने काम हाती घेण्यास सोयीचे झाले. घटनास्थळी रेल्वेचे अधिकारीही दाखल झाले असून ते दुर्घटनेची माहिती घेत आहेत. रेल्वे प्रशासनानेही या दुर्घटनेची माहिती दिली आहे. तसेच युद्धपातळीवर काम करण्यात येत असून रेल्वे वाहतूक लवकरच पूर्ववत केली जाणार असल्याचं म्हटलं आहे.