नाशिकः ‘जीव प्यारा असेल, तर हेल्मेट घाला बाबांनो’ असे कळवळीने सांगत नाशिक पोलिसांनी (Nashik Police) जवळपास 500 वाहनधारकांना समुपदेशनाचा (bikers counseling) डोस दिला. शहरात विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचे होणारे वाढते अपघात पाहता पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी पुढाकार घेत ही (use helmets) मोहीम सुरू केली आहे. (Two hours of counseling for 500 bikers, appeals to use helmets)
नाशिकमध्ये दुचाकीस्वारांचे अपघात सत्र थांबताना दिसत नाही. ऑगस्ट महिन्यात नऊ दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. हे अपघातसत्र थांबवण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वातंत्र्यदिनापासून शहरातील सर्व पेट्रोल पंपावर नो हेल्मेट, नो पट्रोल धोरण सुरू केले. मात्र, हेल्मेटधारकांनी या मोहिमेलाही फाटा दिला. फक्त पेट्रोल घेण्यापुरते पेट्रोल पंपावरच हेल्मेट घालणे सुरू केले आहे. हे चित्र पाहता पोलिस आयुक्तांनी शुक्रवारपासून (10 सप्टेंबर) अनोखी हेल्मेट सक्ती सुरू केली आहे. त्यानुसार या मोहिमेत आता हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना लगेच दंडाची पावती नाही, तर दोन तासांच्या समुपदेशनाचा डोस मिळत आहे. आतापर्यंत तब्बल 500 जणांचे पोलिसांनी प्रबोधन केले आहे.
50 महिला, तरुणींना उपदेश
हेल्मेट उपदेशामध्ये मंगळवारी शहरातील 50 महिला व तरुणींवर पोलिसांनी कारवाई केली. त्यांना पोलिस वाहनात बसवून ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क येथे नेण्यात आलेत. तेथे त्यांना वाहतुकीच्या नियमांचे धडे देत आपल्या जीवसाठी हेल्मेट कसे गरजेचे आहे, याचा उपदेश करण्यात आला.
पोलिसांच्या धास्तीने हेल्मेटधारक वाढले
सध्या पोलिसांनी दंडाला फाटा देत थेट दोन तास समुपदेशन सुरू केले आहे. या समुपदेशाच्या धास्तीपायी अनेकांनी हेल्मेट घालायला सुरुवात केली आहे. शहरातील मुंबईनाका, शालिमार, कॉलेजरोड, पंचवटी, अशोकामार्ग, नाशिकरोड, महात्मानगर, लेखानगर, इंदिरानगर या भागात हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वारांचे प्रमाण रस्त्यावर वाढल्याचे दिसत आहे.
नियमांचे पालन नाही
नाशिकमध्ये वाहनधारक वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत. मग तो चारचाकी वाहनधारक असो की, दुचाकी. सर्रासपणे राँगसाइड प्रवास करणे, दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास, हेल्मेट न घालणे, वेगमर्यादेचे उल्लंघन, सिग्नलचे नियम न पाळणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या दुचाकी अपघातांनी शहर हादरून गेले आहे. त्यामुळेच पुढाकार घेत पोलिस आयुक्तांनी ही नवी समुपदेशनाचा डोस देणारी हेल्मट सक्ती सुरू केली आहे. (Two hours of counseling for 500 bikers, appeals to use helmets)
इतर बातम्याः
नाशिकमधल्या मतदार याद्यांमध्ये घोळ; 2 लाख 87 हजार नावे दुबार
नारायण राणे यांचा जबाब पोलिस 25 सप्टेंबर रोजी ऑनलाइन नोंदविणार