Amravati | चिखलदरा परिसरात पुन्हा 2 बिबट्यांचं दर्शन, 3 श्वानांची शिकार
चिखलदरा (Chikhaldara) पर्यटनस्थळाला लागूनच मोठा मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. त्यामुळे चिखलदरा शहरानजीक नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर राहतो. नुकतीच एका हॉटेलमध्ये दोन बिबटे (Leopard) शिरल्याची घटना समोर आली होती. 3 श्वानां(Dogs)ची केली शिकार केलीय.
चिखलदरा (Chikhaldara) पर्यटनस्थळाला लागूनच मोठा मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. त्यामुळे चिखलदरा शहरानजीक नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर राहतो. चार दिवसांपूर्वीच चिखलदऱ्यातील एका हॉटेलमध्ये दोन बिबटे (Leopard) शिरल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता पुन्हा गविडगील किल्ला परिसरात शिवसागर पॉइंटवर नर-मादी बिबट्याचे पर्यटकांना दर्शन झाले आहे. 3 श्वानां(Dogs)ची केली शिकार केल्याची माहिती मिळतेय. गेल्या अनेक दिवसांपासून अस्वल, रानडुक्क आदी प्राणी चिखलदरा या शहराच्या बाजूला दिसतात. आता तर मुख्य रस्त्यावर बांधलेल्या इमारतीमध्ये त्यांचा शिरकाव जीवासाठी घातक ठरत आहे. या वन्यप्राण्यांचा योग्य बंदोबस्त करावा, वनविभागाने याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. आता कुत्र्यांची शिकार केलीय. मात्र येथील नागरिकांना भीती अधिक वाटत आहे.