Udayanraje Bhosale यांची हटके स्टाइल; कॉलर उडवून केली चाहत्यांची इच्छा पूर्ण
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे त्यांच्या हटके स्टाइलने (Style) कायम चर्चेत असतात त्यांचा कॉलर उडवण्याचा अंदाज सर्वांनाच माहीत आहे. आज त्यांनी सातारा (Satara) शहरातील एका कार्यक्रमात कॉलर उडवून चाहत्यांची इच्छा पूर्ण केली आहे.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे त्यांच्या हटके स्टाइलने (Style) कायम चर्चेत असतात त्यांचा कॉलर उडवण्याचा अंदाज सर्वांनाच माहीत आहे. आज त्यांनी सातारा (Satara) शहरातील एका खासगी कार्यक्रमात कॉलर उडवून त्यांच्या चाहत्यांची इच्छा पूर्ण केली आहे. या कार्यक्रमात अभिनेता सिद्धार्थ जाधव हादेखील उपस्थित होते. यावेळी चाहत्याने त्यांना कॉलर उडवण्याची विनंती केली. राजेही मग उत्साहात कॉलर उडवतात. त्यांना आपल्या चाहत्याची इच्छा पूर्ण केली. कॉलर उडवल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज येत होता. अभिनेता सिद्धार्थ जाधवदेखील यावेळी उपस्थित होता. आधी ते कॉलर उडवण्यास तयार नव्हते, मात्र अनेकांनी त्यांना विनंती केली, त्यानंतर त्यांनी कॉलर उडवली वन्स मोअर म्हटल्यावर मात्र त्यांनी पुन्हा कॉलर उडवली नाही.