उद्धव ठाकरे संतापले, थेट मोदी, शाह, अजित पवार, फडणवीस, शिंदे यांच्यावर हल्ला

| Updated on: Nov 11, 2024 | 3:53 PM

उद्धव ठाकरे सोमवारी प्रचारासाठी यवतमाळ जिल्ह्यात होते. त्यांची वणी येथे जाहीर सभा होती. या सभेसाठी ते हेलिकॉप्टरने आले आहेत. यावेळी हेलिपॉडवर उतरताच उद्धव ठाकरे ठाकरे आणि त्यांचे स्वीय साहायक मिलिंद नार्वेकर यांची बॅग निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासली.

उद्धव ठाकरे संतापले, थेट मोदी, शाह, अजित पवार, फडणवीस, शिंदे यांच्यावर हल्ला
uddhav thackeray
Follow us on

नाशिक जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी झाली नव्हती. लोकसभा निवडणुकी दरम्यान नाशिकमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत आलेल्या लोकांच्या हातात जड बॅगा होत्या. त्याची तपासणी झाली नसल्यामुळे ‘नाशिक मध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस पडतोय’ असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होतो. आता विधानसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यात उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बॅगांची तपासणी सोमवारी झाली. त्यामुळे उद्धव ठाकरे संतापले. प्रचार सभेतून त्यांनी थेट या विषयावर हात घालत भाजप आणि महायुतीवर हल्ला केला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे सोमवारी प्रचारासाठी यवतमाळ जिल्ह्यात होते. त्यांची वणी येथे जाहीर सभा होती. या सभेसाठी ते हेलिकॉप्टरने आले आहेत. यावेळी हेलिपॉडवर उतरताच उद्धव ठाकरे ठाकरे आणि त्यांचे स्वीय साहायक मिलिंद नार्वेकर यांची बॅग निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा संताप झाला. त्यांनी प्रचार सभेतून महायुतीवर जोरदार निशाणा साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले, मी वणी येथे हेलिकॉप्टरने दाखल झालो. त्यावेळी काही अधिकारी माझ्या स्वागतासाठी आले होते. त्यांनी म्हटले तुमची बॅग तपासायची आहे. मी त्यांना म्हणालो, तुमचे काम आहे, तपासून घ्या. पण माझी बॅग तपासली तशी कधी नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची बॅग तपासली का? जे आपल्या बॅगा तपासत आहे, त्यांचेही खिसे तपासा हा मतदारांचा अधिकार आहे. आता तपास अधिकाऱ्याचे ओळख तपासा. त्यांना लोकसभा निवडणुकीत मिंदे यांच्या बॅग चालल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

डोळसपणे मतदान करा

उमेदवार घेऊन आलो पण आमदार घेऊन जाणार आहे. वणीचा उमेदवार मशालीचा पाहिजे. महाविकास आघाडी निवडून आणायचे आहे. प्रत्येक ठिकाणी विजय दिला असे सांगत आहे. 20 तारखेला डोळ्यावर पट्टी ठेऊ नका. डोळस पणाने मतदान करा. मी माणसाला नाही यंत्रणेला दोष देत आहे.

पुढचे पाच वर्षे जीवनावश्यक भाव स्थिर राहील. मुलींना मोफत शिक्षण देणार आहे. गुजरातला नेलेले वैभव महाराष्ट्रात परत आणणार आहे. आपले सरकार आल्यावर अदाणीला दिलेली जमिनी परत घेऊन परवडणारी घरे सर्वांना देणार आहे.