मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर या महिन्यांच्या सुरुवातीला एचएन रिलायन्स रुग्णालयात मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलीय, त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने सोमवारी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून, ते सध्या मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात फिजिओथेरपीने बरे होत आहेत. त्यांना योग्य वेळेत डिस्चार्ज दिला जाईल, अशी माहिती सीएमओनं ट्विटर हँडलवर दिलीय.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एचएन रिलायन्स रुग्णालयात फिजिओथेरपी सुरू असून, ते पूर्णतः बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येईल, असेही महाराष्ट्राच्या सीएमओकडून स्पष्ट करण्यात आलेय. रिलायन्स हॉस्पिटलचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया केलीय. डॉ. अजित देसाई हे व्यवसायाने हृदयरोगतज्ज्ञ आहेत आणि डॉ. शेखर भोजराज हे स्पाइन सर्जन आहेत.
CM Uddhav Balasaheb Thackeray has undergone successful spine surgery and is currently recuperating with physiotherapy at H.N. Reliance Hospital in Mumbai. He will be discharged in due course of time.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 22, 2021
उद्धव ठाकरेंच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर सीएमओने एक निवेदन जारी केलेय. मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर आहे आणि ऑपरेशननंतर त्यांना त्यांच्या हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये हलवण्यात आले, अशीही माहिती मिळालीय. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच शस्त्रक्रियेनंतर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केलीय. ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याशी सिंह यांनी फोनवरुन संवाद साधत ही चौकशी केली होती.
मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना मान आणि मनक्याचा त्रास होत होता. एका कार्यक्रमात ते मानेला पट्टा बांधून आल्याचे दिसले होते. हा त्रास वाढल्यामुळे त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहणे टाळले होते. तसेच दिवळीनिमित्त भेटीसाठी आलेल्या मान्यवरांनादेखील ते भेटले नव्हते. त्यानंतर ठाकरे यांच्यावर 12 नोव्हेंबर रोजी सर्व्हायकल स्पाईन संबंधित यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गिरगावातील एच. एन. रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
संबंधित बातम्या
‘दंगलीत आरोपी असलेल्या अनिल बोंडेंनी शहाणपणा करु नये’, अशोक चव्हाणांचं जोरदार प्रत्युत्तर