भंडारा: मी आताच पीडित कुटुंबीयांना भेटलो. हात जोडून उभं राहण्याशिवाय मी काहीच करू शकलो नाही. सांत्वन करता येईल असे शब्दच माझ्याकडे नव्हते, असे भावुक उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. भंडार दुर्घटनेतील कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री अत्यंत भावूक झाले होते. (Uddhav Thackeray meet parents of deceased babies in Bhandara )
काल शनिवारी भंडारा येथील रुग्णालयात आग लागल्याने दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेवर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भंडाऱ्यात येऊन पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. दुर्घटनेतील पीडित कुटुंबाची मी भेट घेतली. हात जोडून उभं राहण्याशिवाय मी काहीही करु शकलो नाही. त्यांची सांत्वना करता येईल असे शब्द माझ्याकडे नव्हते, असं भावुक उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
चौकशी करणार
ही दुर्घटना आम्ही अत्यंत गंभीरपणे घेतली आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. मुंबई अग्निशमन दलाचे निवृत्त अधिकारी प्रभात रहांगदळे या चौकशी समितीत असतील. ही दुर्घटना नेमकी कशी घडली हे शोधल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा अपघात अचानक घडला की आणखी कोणती कारणं आहेत, हे तपासलं जाईल. घटनेच्या मुळापर्यंत जाऊन तपास केला जाईल. असं मुख्यमंत्री म्हणाले.
दोषींवर कारवाई करणार
भंडारा दुर्घटनेतील दोषींना सोडणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. गेल्या वर्षभर आपण कोरोनाचा सामना करत होतो. त्यामुळे काही गोष्टींकडे डोळेझाक झाली का? याची चौकशी करण्यात येणार आहे, असंही ते म्हणाले.
गाईडलाईन तयार करणार
भंडारा दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नवीन गाईडलाईन तयार करण्यात येणार आहे. राज्यात पुन्हा अशा घटनांमध्ये कुणाचाही जीव जाऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. इलेक्ट्रिक फॉल्टमुळे आग लागली की आणखी काही कारणं आहेत, याचीही चौकशी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोनामुळे आपले कर्मचारी तणावाखाली होती. त्यामुळे काही दुर्लक्ष झालं का? हे सुद्धा तपासण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
सर्व रुग्णालयांचे ऑडिट
राज्यात पुन्हा अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर सेफ्टी ऑडिट करण्यात येणार आहे. तसे आदेशच देण्यात आले आहेत, असंही त्यांनी सांगितलं. (Uddhav Thackeray meet parents of deceased babies in Bhandara )
VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 7:30 PM | 9 January 2021https://t.co/Noxg0zt4Ru
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 9, 2021
संबंधित बातम्या:
Bhandara fire | भंडारा दुर्घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करणार: मुख्यमंत्री
CM Bhandara Visit LIVE | भंडारा दुर्घटनेची चौकशी करणार, दोषींवर कठोर कारवाई करणार: मुख्यमंत्री
राणे, चंद्रकांतदादांची वाय प्लस सुरक्षा रद्द; आठवलेंना एस्कॉर्टशिवाय वायप्लस सुरक्षा
(Uddhav Thackeray meet parents of deceased babies in Bhandara )