Uddhav Thackeray : मालवण राजकोट किल्ल्यातील राड्यावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया काय?

| Updated on: Aug 28, 2024 | 1:59 PM

Uddhav Thackeray : "वाऱ्याने पुतळा पडला कारण हे निर्लज्जपणाच कळस गाठणारं सरकार आहे. राज्यपाल कोश्यारी यांनीही शिवाजी महाराजांचा अपमान केला होता. पण कोश्यारींची टोपी वाऱ्याने उडाली असं कळलं नाही. गद्दार केसरकर म्हणाले, चांगलं घडेल" असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray : मालवण राजकोट किल्ल्यातील राड्यावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया काय?
MVA
Follow us on

“हे महाफुटीचं सरकार आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. कारभाराने किळस आणली आहे. आम्ही तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र बंद केला होता. पण कोर्टाच्या माध्यमातून त्यावर बंदी घातली होती. मालवणमध्ये पुतळा कोसळला. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी मोर्चा आयोजित केला. त्या मोर्चात मोदी आणि शहांचे दलाल आणि शिवद्रोही आले. ते शिवद्रोही आहेत” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता नारायण राणे, निलेश राणे यांच्यावर टीका केली आहे. मालवणात राजकोट किल्ल्यावर आज मोठा राडा झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे आले होते. त्यावेळी हा राडा घडला. राणे समर्थक मुख्य द्वारावर जमले होते. त्यांनी आदित्य ठाकरेंची वाट अडवून धरली होती. अखेर पोलीस बंदोबस्तात दीड तासानंतर आदित्य ठाकरे खाली उतरले.

“वाऱ्याने पुतळा पडला कारण हे निर्लज्जपणाच कळस गाठणारं सरकार आहे. राज्यपाल कोश्यारी यांनीही शिवाजी महाराजांचा अपमान केला होता. पण कोश्यारींची टोपी वाऱ्याने उडाली असं कळलं नाही. गद्दार केसरकर म्हणाले, चांगलं घडेल” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “1 सप्टेंबरला दुपारी ११ वाजता हुतात्मा स्मारकाला वंदन करून. गेटवेला शिवाजी महाराजाचां पुतळा आहे. तो पुतळा मजबुतीने उभा आहे. आम्ही या पुतळ्यासमोर जमणार आहोत आणि सरकारला जोडे मारो आंदोलन करू. मी आहे तिथे. पवारसाहेब असतील नाना पटोले असतील. सर्व शिवप्रेमींनी यावं अशी विनंती आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “भाजपच्या कार्यकर्त्यांना ही गोष्ट पटली असेल असं वाटत नाही. ते शिवद्रोही होते तिथे. एकएकाला बघतो असं या शिवद्रोहींनी म्हटलं त्यांचे चेहरे समोर आले” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘कोर्ट महाराष्ट्राचं असेल किंवा कोलकात्याचं, मी लक्ष ठेवतोय’

“आम्ही सरकारच्या प्रतिमेला जोडे मारणार आहोत. सरकारची महाराष्ट्र द्रोही आणि शिवद्रोही ही प्रतिमा गडद होत आहे. कोश्यारी यांनी महाराजांचा अपमान केला होता. त्यांना तरीही हटवलं नव्हतं. म्हणजे यांच्या नसानसात शिवद्रोह ठासून भरलेला आहे. तो शिवद्रोह महाराष्ट्र सहन करणार नाही. कोर्ट महाराष्ट्राचं असेल किंवा कोलकात्याचं. मी लक्ष ठेवतोय. ज्यांनी बंद बेकायदेशीर ठरवला. ते भाजपवर काय कारवाई करतोय ते पाहू” असं उद्धव ठाकरे म्हणाले.