“रायगडावर वाघ्या कुत्र्याचं स्मारक आहे. त्याबाबत एक समिती स्थापन करा. कुत्र्याची समाधी ठेवायची तर ठेवा, उखडायची तर उखडा. परंतु त्याच्यावरून पेटवापेटवी करण्याआधी अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत कोणी पेटून का उठत नाही?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. “मला प्रश्न पडतो. मोदींच्या हस्ते जलपूजन झालं. त्याचं काय करायचं. स्मारकावर पाणी सोडलं का? मी मोदींना स्मरण करून देणारा कोण? छत्रपतींच्या स्मारकाबाबत स्मरण करून द्यावं लागतं यापेक्षा दुसरं दुर्देव काय. हे हिंदुत्वाबाबत काय बोलायचं. ज्यांना स्मारकाचं काही पडलं नाही. ते कोरटकर, कोश्यारी आणि सोलापूरकरवर काय कारवाई करणार?” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
“कालपर्यंत विष देत होता, आज अन्नधान्य देत आहात. त्यांनी हिंदुत्व सोडल्याचं जाहीर करावं. त्यांना माझ्यावर आरोप करण्याचा अधिकार नाही. मी हिंदुत्व सोडल्याचं म्हणण्याचा अधिकार नाही. आता त्यांनी हिंदुत्व सोडलं. एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे, आपका मंगलसूत्र चोरी होगा, भाजपनेच हिंदुत्व सोडलं तर हिंदू सेफ आहे की नाही. जे हिंदूत्वाचे रक्षक आहेत ते कसे मशिदीत जाऊन सौगात देतात ते पाहायचं आहे” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
तुम्ही कुणाचा आदर्श ठेवता शिवाजी महाराजांचा की खंडोजी खोपडेचा?
“आता आपटे कुठे आहेत? अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरनंतर संचालक कुठे आहेत. त्यांच्याबद्दल काहीच बोललं जात नाही. सोलापूरकर कुठे आहे. कोरटकर याच्याबद्दल दोन दिवस चालेल. नंतर बंद होईल. गद्दार म्हटल्यावर कामरानचा स्टुडिओ तोडता. दोन दोन समन्स पाठवता आणि सोलापूरकरला एकही समन्स नाही. तुम्ही कुणाचा आदर्श ठेवता शिवाजी महाराजांचा की खंडोजी खोपडेचा? प्रचंड बहुमत मिळालेलं अस्वस्थ सरकार आहे” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.