Uddhav Thackeray | ‘मी एक शब्द बोललो, तर एवढ लागलं, पण तुम्ही…’ उद्धव ठाकरे ‘कलंक’ शब्दावर बोलले

| Updated on: Jul 11, 2023 | 2:18 PM

Uddhav Thackeray | "मोदींना आता पवारांच्या हस्ते टिळक पुरस्कार मिळणार. मग 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच काय झालं? चक्की पिसिंग म्हमून अजितदादांना लावलेल्या कलंकाच काय झालं?"

Uddhav Thackeray | मी एक शब्द बोललो, तर एवढ लागलं, पण तुम्ही... उद्धव ठाकरे कलंक शब्दावर बोलले
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : “राज्यातल्या जनतेच्या प्रश्नांकडे सरकार लक्ष देत नाहीय. सरकार दारात जातय पण तिथून परत येतय. घरात सुख, शांती, समाधान कसं लाभेल हे पाहत नाहीय. शासन आपल्या दारी फक्त कार्यक्रम केला जातोय, पण त्याचा फायदा मिळतोय का? योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी, होऊन जाऊ द्या चर्चा हा कार्यक्रम कार्यकर्त्यांना दिला आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“पाऊस म्हणावा तसा पडलेला नाही. विदर्भात काय होईल ते सांगता येत नाही. सरकारी योजनांच्या कागदी होड्या सोडायच्या कुठे? हे सरकारला विचारण्याची वेळ आली आहे. या योजनाचा लाभ मिळतोय का? याचा लोकांनी विचार करावा” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘सरकार माझच बनणार, असा पायंडा पडला’

“एकूणच राजकारणामध्ये व्यस्त असलेल्या पक्षांचा जनतेला उबग आलाय. मत कोणालाही द्या, सरकार माझच बनणार असा पायंडा पडला आहे. जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उडाला, तर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘मी कलंक म्हटलं, त्यात एवढं लागण्यासारख काय?’

सध्या महाराष्ट्रात भाजपाकडून उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आंदोलन सुरु आहे. उद्धव ठाकरे काल एका सभेत देवेंद्र फडणवीस यांना नागपूरचा कलंक म्हटलं होतं. त्यावरुन राजकारणात मोठा गहजब सुरु आहे. “मी कलंक म्हटलं, त्यात एवढं लागण्यासारख काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. तुम्ही एखाद्या माणसला भ्रष्ट म्हणता, त्यावेळी कलंक लावत नाही का? तुम्ही भ्ष्टाचाराचे आरोप करुन एखाद्याला कलंकित करता. नंतर त्याला मंत्रिमंडळात स्थान देता, मग त्याने समाजात वावरायच कसं? माझा कलंक शब्द इतका परिणामकारक ठरेल असं वाटलं नव्हतं” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मग 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच काय झालं?

“मोदींना आता पवारांच्या हस्ते टिळक पुरस्कार मिळणार. मग 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच काय झालं? चक्की पिसिंग म्हमून अजितदादांना लावलेल्या कलंकाच काय झालं? मी एक शब्द बोललो, तर एवढ लागलं, पण तुम्ही वाटेल ते आरोप करता, माझ्या ऑपरेशनरुन चेष्टा करता, मी जे भोगले ते त्यांना भोगाव लागू नये एवढीच इच्छा” असं उद्धव ठाकरे म्हणाले.