मग 2014मध्ये युती का तोडली?, तेव्हा तर काँग्रेससोबत नव्हतो ना?; उद्धव ठाकरे यांचा भाजपला सवाल

| Updated on: May 13, 2024 | 9:46 AM

Uddhav Thackeray : मला एकनाथ खडसे यांचा फोन आला. उद्धवजी… आता आपली युती काही राहात नाही. आम्ही हा निर्णय घेतला आहे. आपल्याला कळवायला सांगितले आहे की, आम्ही युती तोडतोय.

मग 2014मध्ये युती का तोडली?, तेव्हा तर काँग्रेससोबत नव्हतो ना?; उद्धव ठाकरे यांचा भाजपला सवाल
Follow us on

देशात मतदानाचा चौथा टप्पा सुरु असताना उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला. यावेळी पुन्हा भाजपसोबत युती, आघाडी, मुख्यमंत्रीपद या विषयांवर त्यांनी गौप्यस्फोट केले. 2014 साली नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाला भाजप व्यतिरिक्त पाठिंबा देण्याचं पहिले पाप कोणी केले असेल, तर शिवसेनेने केले आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मग 2014 मध्ये युती का तोडली?, तेव्हा तर काँग्रेससोबत नव्हतो ना? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारला.

उद्धव ठाकरे यांनी 2014 मध्ये मोदी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे स्पष्ट सांगितले. ते आमचे पाप असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कारण ते आम्हाला संपवायला निघाले आहेत. आधी ते स्वप्नवत होते की मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. मी समोर बसलोय, माझ्या शेजारी अमित शहा बसले होते. हे सत्य आहे की स्वप्न आहे, हेच आम्हाला कळत नव्हते. साधारणतः जून महिन्यात हा शपथविधी झाला.

चार महिन्यात सर्व बदलले

ऑक्टोबरच्या विधानसभा निवडणुकीत चार-पाच महिन्यांत असे कोणते पाप आम्ही केले होते? की भारतीय जनता पक्षाने शिवसेनेशी युती तोडली, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला. ते म्हणाले, ” 2014 मध्ये आम्ही काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. तेव्हा यांच्या मानेवर बसलेला जो औरंगजेब आहे, त्या औरंगजेब फॅन क्लबमध्ये मी नव्हतो. मग तुम्ही माझी युती 2014 साली का तोडलीत? त्यावर एकनाथ खडसे यांनीही भाष्य केले होते. त्यांना हा निर्णय वरून सांगण्यात आला होता, असे ते म्हणाले. त्याच दिवशी संध्याकाळी एकनाथ खडसेंचा फोन आला की, ‘उद्धवजी… आता आपली युती काही राहात नाही. आम्ही हा निर्णय घेतला आहे. आपल्याला कळवायला सांगितले आहे की, आम्ही युती तोडतोय.’ मग तेव्हा युती तुम्ही का तोडलीत?”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्राची लूट थांबली पाहिजे

उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राची लूट थांबवली पाहिजे. महाराष्ट्रातून बाहेर गेले उद्योग परत आणणार आहे. आर्थिक केंद्र परत आणणार आहे. शेतकऱ्यांनी हमी भाव देणार आहे. मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना कसा भाव मिळत होतो. तो आता का देऊ शकत नाहीत. तसेच राज्यात आणि देशात कर दहशतवाद सुरु आहे. तो मी थांबवणार आहे. जीएसटीमध्ये छोट्या व्यापाऱ्यांना किरकोळ कारणावरुन कारागृहात टाकण्याची तरतूद आहे. ती हटवणार आहे. शेतकऱ्यांचा सहा हजार रुपये देतात. परंतु जीएसटीच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये घेतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व सामानावरील जीएसटी काढणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.