सध्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा नकोच.. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर काँग्रेस नेते नाराज; मविआत धुसफूस ?

| Updated on: Aug 23, 2024 | 9:44 AM

आगामी निवडणुकीत प्रचाराआधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? हे ठरवण्याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आग्रही असल्याची बातमी समोर आली होती. याचबाबत उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. मात्र त्यांच्या सीएमपदाच्या भूमिकेवर काँग्रेस नेते नाराज आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळत्ये.

सध्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा नकोच.. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर काँग्रेस नेते नाराज; मविआत धुसफूस ?
Follow us on

आगामी निवडणुकीत प्रचाराआधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? हे ठरवण्याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आग्रही असल्याची बातमी समोर आली होती. याचबाबत उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. मात्र त्यांच्या सीएमपदाच्या भूमिकेवर काँग्रेस नेते नाराज आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळत्ये. सध्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत कोणतीही चर्चा नको, अशी भूमिका काँग्रेसने घेतल्याचं कळतंय. महाराष्ट्रात सुरूवातील मविआ सरकार आणणं महत्वाचं आहे, अशी काँग्रेस नेत्यांची भूमिका आहे, असंही सूत्रांनी सांगितलंय.

चार भिंतीच्या आत तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांवी घेतली होती अशी माहिती नुकतीच समोर आली होती. मात्र उद्धव ठाकरे यांची ही भूमिका काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना पटली नसून त्यांनी नाराजीचा सूर लावला आहे.

आमच्यासमोर सध्या महाराष्ट्र वाचवण्याचा प्रश्न आहे

असं आम्ही कुठेही बोललेलो नाही, मीटिंगमध्येही तो विषय नाहीये. महाराष्ट्रात जे भ्रष्टाचारी सरकार आहे, शेतकरी विरोधी सरकार आहे. तरूणांच्या विरोधात, गरिबांच्या विरोधा सरकार आहे. ज्या घटना महाराष्ट्रात सातत्याने काही दिवसांपासून घडत आहेत, सरकारल त्याची काही काळजी नाही , अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आमच्यासमोर सध्या प्रश्न आहे तो महाराष्ट्र वाचवण्याचा , अशी भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी मांडली. मुख्यमंत्री पदाबाबत सध्या चर्चा नसल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री पदाबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

“चार भिंतींच्या आत तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा”, असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये वक्तव्य केलं. “ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील, त्यांचा मुख्यमंत्री बनेल हे सूत्र नको”, असंही ठाकरे म्हणाले होते. “महाविकास आघाडीच्या घटक पक्षांपैकी कोणत्याही नेत्याला मुख्यमंत्री करा. मला ते मान्य असेल. मात्र चेहरा जाहीर करा”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

“ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री या सूत्रामुळे एकमेकांच्या जागा पडल्या जातील. युतीत तेच झालं होतं. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरुन कोणताही वाद नको”, असं उद्धव ठाकरे पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणाले होते. यापूर्वी ही त्या मविआच्या मुंबईतील मेळाव्यामध्ये ही भूमिका मांडत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी केली होती. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्या मागणीबद्दल कोणतेही वक्तव्य करणं तसेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणं टाळलं होतं.