नाशिकः एक म्हण आहे. घरचं झालं थोडं अन् इवायानं धाडलं घोडं….याचा प्रत्यय घ्यायचा असेल, तर तुम्हाला नाशिकमध्ये यावे लागेल किंवा इथली माहिती जाणून घ्यावी लागेल. त्याचे झाले असे की, नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी हेल्मेटसक्ती खूपच मनावर घेतलेली दिसते आहे. त्यासाठी विनाहेल्मेट दुचाकीचालकांची चक्क 10 गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. कडी म्हणजे त्यासाठी एक पुस्तकही तयार करण्यात येणार आहे. यातून अभ्यास करून वाहनधारकांना पेपर द्यावा लागेल. आधीच अभ्यास करून-करून पिचून गेलेले विद्यार्थी आणि नागरिकांना खरेच हे पटणार आहे का? दुसरीकडे शहरातील पोलीसच विनाहेल्मेट फिरताना दिसत आहेत. त्यांच्यावर काय कारवाई करणार, असा प्रश्न दक्ष नागरिक करत आहेत. एका पेट्रोल पंपावर विनाहेल्मेट पोलीस पेट्रोल घेण्यासाठी आला, तेव्हा दक्ष नागरिकांनी चांगलाच गोंधळ घातला होता. तेव्हा संबंधित पोलिसाने काढता पाय घेतला. मग हाच नियम पोलीस कर्मचाऱ्यांना लागू होत नाही का, हा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.
अन् सुरू झाली मोहीम
नाशिक जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. हे अपघातसत्र थांबवण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वातंत्र्यदिनापासून शहरातील सर्व पेट्रोल पंपावर नो हेल्मेट, नो पट्रोल धोरण सुरू केले. त्यानंतर हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांचे समपुदेशन सुरू केले. त्यानंतर शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये विनाहेल्मेट प्रवेश दिला जाणार नाही, असा जाचक नियम काढला. विशेष म्हणजे हे सारे नियम सामान्यांसाठी. कारण पोलीस हेल्मेट न घालताच मोकाट फिरत असल्याचे शहरातील चित्र आजही आहे.
असे आहे परीक्षेचे स्वरूप
हेल्मेट न घालणाऱ्या वाहनधारकांचे पू्र्वी समुपदेशन केले. आता परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतरही ते वठणीवर नाही आले, तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. एकूण 3 युनिटमध्ये 12 ठिकाणी ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी पुस्तक तयार करण्याची तयारी सुरू आहे. या परीक्षेत कमीत कमी 5 गुण मिळावावे लागतील. अन्यथा नापास केले जाणार आहे. इतके करूनही वाहनधारक सुधारले नाहीत, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, अशा इशारा पोलिसांनी दिला आहे. मात्र, खरोखरच कडक नियमसक्ती करायची असेल, तर सरळ चौका-चौकात पोलीस उभे करून कारवाई करावी. नागरिकांना आपोआप सवय होईल. विशेष म्हणजे हाच नियम पोलिसांनाही लागू करावा. सामान्यांपेक्षा वेगळा न्याय त्यांना देऊ नये, अशी मागणी दक्ष नाशिककर करत आहेत.
Nashik: साहित्य संमेलनाचे उद्घाटन साहित्यिक विश्वास पाटील, गीतकार जावेद अख्तर, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारhttps://t.co/uuaiLJG8bv#Nashik|#SahityaSammelan|#ChiefMinisterUddhavThackeray|#GuardianMinisterChhaganBhujbal|#NovelistVishwasPatil|#LyricistJavedAkhtar
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 21, 2021
इतर बातम्याः
Nashik| साहित्य संमेलन होणार दणक्यात; पालकमंत्र्यांसह 6 आमदारांनी दिले 55 लाख रुपये