UPSC Final Result : यूपीएससी रिझल्ट लागला!

| Updated on: May 30, 2022 | 2:04 PM

यूपीएससीने 4 मार्च 2021 रोजी अधिसूचना जारी करून सीएसीइ 2021 साठी सुरु केली होती. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2021 होती. त्यांनतर प्राथमिक परीक्षा 27 जून 2021 रोजी घेण्यात आली होती ज्याचा निकाल 29 ऑक्टोबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आला होता.

UPSC Final Result : यूपीएससी रिझल्ट लागला!
Breaking News
Follow us on

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेला बसणारे उमेदवार पीडीएफ मध्ये आपलं नाव किंवा आपला नोंदणी क्रमांक शोधू शकतात. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी बोलवण्यात आले होते. ही वैयक्तिक चाचणी 5 एप्रिल ते 25 मे 2022 या कालावधीत घेण्यात अली. उमेदवार रोल नंबर सर्च करून आपला निकाल तपासू शकतात. यूपीएससीने 4 मार्च 2021 रोजी अधिसूचना जारी करून सीएसीइ 2021 साठी सुरु केली होती. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2021 होती. त्यांनतर प्राथमिक परीक्षा 27 जून 2021 रोजी घेण्यात आली होती ज्याचा निकाल 29 ऑक्टोबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यांनतर मुख्य परीक्षा 7 ते 16 जानेवारी २०२२ या कालावधीत घेण्यात आली आणि 17 मे रोजी निकाल जाहीर करण्यात आला. यंदा श्रुती शर्माने यूपीएससी परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला आहे. यूपीएससी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल 2021 कसा तपासायचा केंद्रीय लोकसेवा आयोगाचा यूपीएससी 2021 चा अंतिम निकाल तपासण्यासाठी, सर्व उमेदवारांनी खाली नमूद दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. लॉग इन करा — upsc.gov.in

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.