मुंबईः महाराष्ट्र हा भारताच्या लसीकरण मोहीमेत कायमच अग्रेसर राहिलेला आहे. रविवारी महाराष्ट्राने 9.14 कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार राज्यात रविवारी संध्याकाळ पर्यंत 1,29,221 लोकांना लस टोचण्यात आली आणि लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून आता पर्यंत 9,14,34,586 लोकोंचे लसीकरण झोले आहे.
एकूण 9,14,34,586 लाभार्थ्यांच्या लसीकरणात आतापर्यंत 6,32,70,144 जणांना पहिला डोस मिळालेला आहे आणि 2,81,64,442 जणांचा दुसरा डोस घेऊन लसीकरण पूर्ण झाले आहे. आतापर्यंत एकूण लाभारत्यांपैकी 18 ते 44 वयोगटातील 3,38,90,580 जणांना पहिला डोस आणि 99,34,176 लोकांना दुसरा डोस घेऊन लसीकरण पूर्ण झाले आहे. 45+ वयोगटातील लाभारत्यांपैकी 2,59,40,566 जणांना पहिला डोस आणि 1,53,10,357 जणांनी दुसरा डोस घेऊन लसीकरण पूर्ण झाले आहे.
हेल्थ केअर (आरोग्य कर्मचारी) गटात आतापर्यंत 1,2,93,710 कर्मचाऱ्यांना पहिला आणि 11,04,813 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस मीळालेला आहे. फ्रंट लाईन कर्मचारी गटात आपर्यंत 21,45,288 जणांना पहिला आणि 18,15,136 जणांना दुसरा डोस मीळालेला आहे.
मुंबईचा लसीकरणात पहिल्या नंबरला आहे. मुंबईत एकुण 1,39,65,876 डोस दिले गेलेले आहेत. पुणे जिल्हा दुसऱ्या नंबरवर आहे आणि एकूण 1,15,01,073 डोस दिले गेले आहेत. मुंबईत लसीकरणाचा आकडा जरी चांगला असला तरी मुंबईत मागच्या काही दिवसांपासून लसीकरणाचा वेग मंदावलेला आहे. जवळपास 50% डोस दररोज शिल्लक राहत आहेत. प्रतिदिन मुंबईत 1 लाख 50 हजार ते २ लाख लोकांचे लसीकरण होणे अपेक्षित आहे मात्र सध्या मुंबईत प्रतिदिन लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असूनही सार्वजनिक लसीकरण केंद्रावर फक्त 50 ते 90 हजार लोकांचे लसीकरण होत आहे.
देशात पुढच्या काही महिन्यात पात्र नागरीकांच 100 % लसीकरण पूर्ण करण्याचे उद्धिष्ट असताना मुंबईत लसीकरणाचा वेग मंदावणे हि गंभीर बाब आहे. हेच लक्ष्यात घेत मुंबई महानगरपालिके ने आता मुंबईत झोपडपट्ट्या व काही सामूहिक इमारतींसाठी सार्वजनिक जागेवर तात्पुरते लसीकरण केंद्र उपलब्ध करून देण्याची महापालिका योजना आखात आहे. महिला, विद्यार्थीं , वंचित गट इत्यादी करीत विशेष लसीकरण सत्र आयोजन, गरज असल्यास लसीकरण केंद्रावरील वेळेत व सत्रात फेर बदल असे काही उपक्रम मुंबईत लसीकरण गतिमान करण्यासाठी राबविण्यात येतील. ता लसीकरणासाठी लोकांनी पुढे येण्यासाठी उपक्रम सुरु केले आहेत.
(vaccination in maharashtra latest figures)
Edited by- Devashri Bhujbal
संबंधित बातम्या