लातूरमध्ये किती वंदे भारत तयार होणार ? कोणत्या दोन कंपन्या करणार निर्मिती ?

| Updated on: Mar 04, 2023 | 10:20 AM

लातूरचा मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यात कोचच्या निर्मितासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे . यामुळे लवकरच लातूरच्या मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यातून १२० वंदे भारत रेल्वे तयार होऊन बाहेर पडतील.

लातूरमध्ये किती वंदे भारत तयार होणार ? कोणत्या दोन कंपन्या करणार निर्मिती ?
लातूर वंदे भारत एक्स्प्रेस कोच कारखाना
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us on

लातूर : यंदाच्या अर्थसंकल्पात ( Budget ) रेल्वेसाठी मोठी तरतूद केली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भर असणारी आलिशान वंदेभारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express)  मेक इन इंडीया (Make in India) अंतर्गत तयार होत आहेत. चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यासह महाराष्ट्रातील लातूर येथील रेल्वेच्या कारखान्यात (Latur rail factory) वंदेभारतच्या कोचची निर्मिती केली जाणार आहे. आता त्यासाठी लागणारी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामुळे लातूरमधील कारखान्यातून लवकर वंदे भारत एक्स्प्रेसचे कोच बाहेर पडणार आहे, अशी माहिती खासदार सुधाकर शृंगारे यांनी दिली आहे .

किती कोच तयार होणार


पंतप्रधान मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी म्हणजेच २०१७ मध्ये भारतातच जागतिक दर्जाची ट्रेन आणण्याचे सांगितले. परंतु या ट्रेनचे डिजाइन व निर्मिती देशातच झाली पाहिजे, ही अट ठेवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानंतर फक्त दिड वर्षात वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती केली गेली. त्यात प्रवाशांची सुरक्षा आणि अन्य मुद्यांवर सतत काम केले गेले. जगात केवळ आठच देश आहे, ज्यांच्याकडे १६० किलोमीटर प्रतितास धावणारी रेल्वे आहे. यामुळे वंदे भारत भारतासाठी मोठे यश आहे. आता पुढील लक्ष २२० किलोमीटर वेगाचे असणार आहे.

हे सुद्धा वाचा

येत्या तीन वर्षांत भारत रेल्वेचे तंत्रज्ञान निर्यात करणार आहे. आता लातूरचा मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यात कोचच्या निर्मितासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे . यामुळे लवकरच लातूरच्या मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यातून १२० वंदे भारत रेल्वे तयार होऊन बाहेर पडतील अशी माहिती खासदार सुधाकर शृंगारे यांनी दिली आहे .

पहिल्या टप्प्यात २०० वंदे भारत एक्स्प्रेस

पहिल्या टप्प्यात २०० वंदे भारत रेल्वे गाड्या तयार केल्या जाणार आहेत. त्यापैकी १२० लातूरमध्ये तर उर्वरित ८० रेल्वे ह्या चेन्नईमध्ये तयार होणार आहेत. मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याला सुरुवात करण्यासाठीची निविदा प्रक्रिया पार पडली असल्याची माहिती खासदार सुधाकर शृंगारे यांनी दिली आहे. रेल विकास निगम लिमीटेड आणि रशियाच्या सीजेएससी ट्रान्समास कॅसोर्टियम या दोन कंपन्यांच्या संयुक्त माध्यमातून २०० वंदे भारत रेल्वेची निर्मिती केली जाणार आहे .

काय आहेत सुविधा

  • या ट्रेनमध्ये प्रत्येक सीटसाठी स्वतंत्र मोबाईल चार्जिंगची सुविधा
  • जेवण किंवा नाश्ता करण्यासाठी फोल्डेबल कॉम्पॅक्ट टेबल
  • लोणावळा घाटासह विविध दृश्य पाहण्यासाठी रोटेट चेअरही आहे
  • मोबाईल किंवा कॅमेरात विहंगम दृश्य टिपण्याचा आनंद
  • अगदी विमानात प्रवास करावा अशा पद्धतीच्या अद्ययावत सुविधा
  • मुंबईहून सोलापूरला ही ट्रेन केवळ साडेसहा तासात पोहोचते
  • या ट्रेनमध्ये चेअर कार आणि एक्झिक्यूटिव्ह कार अशा दोन प्रकारच्या बोगी