Vasai Assembly election : वसईत हिंतेद्र ठाकूर यांना कोण देणार टक्कर?

| Updated on: Oct 28, 2024 | 5:41 PM

वसई विधानसभा मतदारसंघात यंदा तीन नेत्यांमध्ये मुख्य लढत होणार आहे. वसईमधून भाजपने स्नेहा दुबे यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसकडून विजय पाटील रिंगणात आहे. या दोन्ही नेत्यांपुढे हितेंद्र ठाकूर यांचं मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे वसईतकर जनता कोणाच्या पारड्यात मतदान करते हे २३ नोव्हेंबरलाच कळणार आहे.

Vasai Assembly election : वसईत हिंतेद्र ठाकूर यांना कोण देणार टक्कर?
Follow us on

Vasai Assembly election : 2008 नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, वसई मतदारसंघात आगाशी, वसई, माणिकपूर ही महसूल मंडळे नवघर माणिकपूर नगरपालिका, वसई नगरपालिका आणि सन डोअर सीटी यांचा समावेश करण्यात आला होता. वसई हा विधानसभा मतदारसंघ पालघर लोकसभा मतदारसंघात मोडतो. वसई विधानसभा मतदारसंघातून 2009 च्या निवडणुकीत विवेक पंडीत यांनी अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळवला होता. त्यांनी बविआच्या नारायण मानकर यांना पराभूत केले होते. विवेक पंडित यांना ८१ हजार ३५८ मतं पडली होती. 2014 च्या निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. हितेंद्र ठाकूर यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांना 97 हजार 291 मतं मिळाली होती.