Pune | चक्क लग्नसोहळ्यातच नाचवल्या बारबाला, Video Viral झाल्यानंतर नागरिक संतप्त
पुण्यातील वडारवाडी (Vadarwadi area) परिसरात लग्न सोहळ्यात (Wedding ceremony) चक्क बारबाला नाचवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाला आहे.
पुण्यातील वडारवाडी (Vadarwadi area) परिसरात लग्न सोहळ्यात (Wedding ceremony) चक्क बारबाला नाचवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाला आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वडारवाडी परिसरात एका लग्न समारंभाच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला आहे. एवढच नव्हेतर या दरम्यान डान्स करणाऱ्या बाराबालांना पैसे दिले जात असल्याचेही दिसून आले आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्याप्रमाणात तरुणांचा समावेश असल्याचे दिसून आले. शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने, लग्न समारंभाच्या कार्यक्रमांना मार्यादित नागरिकांच्या उपस्थितीचे निर्बंध थोडे शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसारच सद्यस्थितीला अनुसरून लग्न समारंभाना परवानगी देण्यात आली होती. मात्र या निर्बंधात दिलेल्या शिथिलतेचा गैरफायदा घेतला जात आहे. वडारवाडीतील या प्रकारमुळे तेथील स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.