मुंबई : महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात पाऊस काळ म्हणून कोसळलाय. या 3 जिल्ह्यात दरड कोसळून 70 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचा आकडा अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशावेळी दुसरीकडे दूधसागर रेल्वे मार्गावरही दरड कोसळली आहे. रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणाच चिखल आणि माती वाहून आल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय. दरड कोसळून अडथळा निर्माण झाल्यामुळे दक्षिण-पश्चिम रेल्वे प्राधिकरणानं या मार्गावरुन जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. तर वास्को रेल्वे स्थानकावरुन दिल्लीला जाणाऱ्या गाड्यांचा मार्ग मडगाव रेल्वे स्थानकावरुन कोकण रेल्वे मार्गानं वळवण्यात आला आहे. (Landslide on Dudhsagar railway line, railway traffic disrupted)
दोन्ही बाजूच्या डोंगरावरुन रेल्वे रुळावर दरड कोसळल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे रेल्वे रुळ पूर्णपणे चिखलात गेलाय. तसंच रेल्वेच्या डब्यातही चिखल आणि पाणी आल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. रेल्वेचा एक डबा रुळावरुन घसरल्याचंही पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा रेल्वे मार्ग सुरळीत करण्यास काहीसा वेळ लागण्याची शक्यता आहे. अशावेळी या मार्गावरील रेल्वे गाड्या अन्य मार्गांनी वळवण्यात आल्या आहेत.
लोंढ्यावरुन गोव्याकडे जाताना लागणाऱ्या घाटात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, दूधसागर रेल्वे मार्गावर आज सकाळी 2 ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरुन धावणाऱ्या काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तर वास्को-हावडा, वास्को-तिरुपती आणि वास्को-तिरुपती-हैदराबाद एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.
संबंधित बातम्या :
Raigad Satara landslide live : दरड दुर्घटनेतील बळींची संख्या 89 वर, कुठे किती मृत्यू?
Landslide on Dudhsagar railway line, railway traffic disrupted