महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं काउंटडाऊन सुरू झालं आहे. येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. 29 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर चार नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. दरम्यान आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. मात्र अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये काही जागांवर तिढा कायम असल्यानं उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाहीये. जागा वाटपाचा पेच सोडवण्यसाठी महायुतीमधील घटक पक्षांचं दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे. तर महाविकास आघाडीच्या देखील बैठकावर बैठका सुरू आहेत. त्यामुळे आता जागा वाटपाचा तिढा कधी सुटणार आणि कधी सर्व उमेदवारांची घोषणा केली जाणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाविकास आघाडीबाबत बोलायचं झाल्यास महाविकास आघाडीकडून आतापर्यंत 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 247 जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. अद्यापही 41 जागांवर उमेदवारांची घोषणा होणं बाकी आहे, महाविकास आघाडीकडून काँग्रेसनं आतापर्यंत 87 जागांवर आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून 76 जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटानं 84 जागांवर आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. तर महायुतीकडून आतापर्यंत एकूण 215 जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून, अद्याप 73 जागांवर उमेदवारांची घोषणा होणं बाकी आहे. ज्यामध्ये भाजपकडून सर्वाधिक 121 जागांवर आपल्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून 45 जागांवर तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 49 जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आतापर्यंत उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पहिल्या यादीमध्ये 65 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. दुसऱ्या यादीमध्ये 15 तर तिसऱ्या यादीमध्ये एकूण 4 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसकडून आतापर्यंत तीन उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत, त्यापैकी पहिल्या यादीमध्ये एकूण 48 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती, दुसऱ्या यादीमध्ये 23 तर तीसऱ्या यादीमध्ये 16 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देखील आतापर्यंत तीन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत, पहिल्या यादीमध्ये 45, दुसऱ्या यादीमध्ये 22 आणि तिसऱ्या यादीमध्ये 9 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. अजून 41 जागांवर उमेदवारांची घोषणा होणं बाकी आहे.
तर दुसरीकडे महायुतीमध्ये अजूनही 73 जागांवर उमेदवार देण्यात आलेले नाहीत. भाजपकडून आतापर्यंत उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये पहिल्या यादीत सर्वाधिक 99 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. तर दुसऱ्या यादीमध्ये एकूण 22 जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून आतापर्यंत फक्त एकच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये त्यांनी एकूण 45 उमेदवारांची घोषणा केली तर अजित पवार गटाकडून आतापर्यंत उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये पहिल्या यादीत 38 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती, दुसऱ्या यादीमध्ये 7 तर दिसऱ्या यादीमध्ये 4 उमेदवारांच्या नावाची घोषणा