आमदार विकत घ्या फक्त दहा रुपयांत… सोशल मीडियावर काय झाले व्हायरल

| Updated on: Jul 16, 2024 | 12:49 PM

अमळनेर येथील संदीप घोरपडे हे अमळनेर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. जळगावच्या अमळनेर येथील प्रत्येक नागरिकांकडून प्रत्येकी दहा रुपये गोळा करत काँग्रेसचे संदीप घोरपडे यांची विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

आमदार विकत घ्या फक्त दहा रुपयांत... सोशल मीडियावर काय झाले व्हायरल
Follow us on

विधानसभा निवडणूक आता दोन, तीन महिन्यांवर आली आहे. इच्छुकांनी या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. आपआपल्या पक्षात लॉबिंग करुन ठेवले आहे. निवडणूक लढवण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदार संघातील निवडणूक चर्चेत असते. या ठिकाणी निवडणुकीत मतदारांना आमिष दाखवले जात असल्याची चर्चा असते. यामुळे अमळनेर येथील काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस असलेले संदीप घोरपडे यांनी वेगळाचा फंडा लढवला आहे. त्यांनी यावेळी आमदार विकत घ्या फक्त दहा रुपयांत असा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. त्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.

अमळनेर पुन्हा विकले जाणार नाही…

संदीप घोरपडे यांनी अमळनेर पुन्हा विकले जाणार नाही…या शीर्षकाखाली सोशल मीडियावर प्रचार सुरु केला आहे. तुम्हीच आमदार दहा रुपयांत विकत घ्या, असे आवाहन सुरु केले आहे. सोशल मीडियावर केलेल्या या बॅनरवर त्यांनी स्वतःचे छायाचित्र, मोबाईल नंबर, ई मेल आयडी आणि क्यूआर कोड दिला आहे. या अनोख्या उपक्रमाची माहिती दिली आहे. संदीप घोरपडे यांचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

हे सुद्धा वाचा

प्रत्येक नागरिकाकडून दहा रुपये

अमळनेर येथील संदीप घोरपडे हे अमळनेर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. जळगावच्या अमळनेर येथील प्रत्येक नागरिकांकडून प्रत्येकी दहा रुपये गोळा करत काँग्रेसचे संदीप घोरपडे यांची विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

 

सत्ताधारीवर निशाणा

विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी प्रत्येक नागरिकांकडून दहा, दहा रुपये ते गोळा करत आहेत. बारकोडच्या माध्यमातूनही नागरिकांना निवडणूक निधी पाठवण्याचे आवाहन संदीप घोरपडे यांनी पोस्टरच्या माध्यमातून केले आहे. अमळनेर पुन्हा पुन्हा विकले जाणार नाही, असे म्हणत संदीप घोरपडे यांनी पोस्टरद्वारे सत्ताधारी अन् विरोधकांवर निशाणा साधला आहे. अमळनेरमध्ये सध्या महायुतीत असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल पाटील आमदार आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात ते मंत्री आहेत. त्यांच्याविरोधात निवडणुकीत उतरण्यासाठी काँग्रेसचे संदीप घोरपडे यांनी तयारी सुरु केली आहे.