नागपूरः देशाच्या लष्कराच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या व्यक्तीचा एवढा भीषण अपघातात (Helicopter crash) मृत्यू ही दुःखाची बाब आहे. या अपघाताबाबत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केलेली शंका अनेकांच्या मनात आहे. राऊतांच्या मनातील शंकेचं निरसन व्हावं, हा अपघात नेमका कसा घडला, याची माहिती केंद्र सरकारनं जनतेला द्यावी, अशी मागणी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली.
मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या अपघाताविषयी शंका उपस्थित केली. हा अपघात नसून घातपात असू शकतो. याची सविस्तर चौकशी व्हावी. संजय राऊत यांच्या मनातील शंका अनेक जणांच्या मनात आहे. त्यामुळे हा नेमका अपघात कसा घडला याची माहिती देशाला कळावी, सत्ताधाऱ्यांची याची माहिती द्यावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.
जगभरावर आलेल्या ओमिक्रॉन या विषाणूच्या संकटावर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवर म्हणाले, कोरोनाची तिसरी लाट येईल की नाही येणार माहिती नाही, मात्र आपण सतर्क रहायला हवं. यात हवामान खात्यासारखे अंदाज लावता येत नाहीत. पण आपण तयारीत असलेलं बरं. ओमिक्रॉनच्या बाबतीत घाबरून जाण्याचं कारण नाही. आजच राज्यातला पहिला ओमिक्रॉनचा रुग्ण बरा झालाय. तो घरीही परतला आहे. याबाबतीत उगाच भीतीचं वातावरण तयार केलं गेलं आहे. आपण काळजी घेण्याची गरज आहे. कुठेही निर्बंध लावण्याची तयारी नाही. देश पातळीवरही कोरोनाचा दर कमी होत आलाय. देशात अॅक्टिव्ह रुग्ण कमी आहेत.
ओबीसी आरक्षणावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले, ओबीसींचे आरक्षण गमावण्यासाठी भाजप जबाबदार आहे. जोपर्यंत केंद्र सराकरा याबाबत अमेंडमेंट आणत नाही. तोपर्यंत हे शक्य नाही. भाजपने मात्र या प्रकरणी नेहमीच टोलवाटोलवी केली आहे. घटनादुरुस्ती करुन केंद्र सरकारने ओबीसींचं 27 टक्के आरक्षण क्लिअर करावं आणि विषय संपवावा. भाजप ढोंगीपणा करुन लोकांमध्ये संभ्रम तयार करु नये.
इतर बातम्या-