Dhananjay Munde Case : धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप; विनायक मेटे म्हणतात…

| Updated on: Jan 15, 2021 | 3:35 PM

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे झाल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. (vinayak mete reaction on dhananjay munde rape case)

Dhananjay Munde Case : धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप; विनायक मेटे म्हणतात...
Follow us on

नाशिक: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे झाल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी मात्र सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे जाणते राजे आहेत. तेच निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया मेटे यांनी व्यक्त केली आहे. (vinayak mete reaction on dhananjay munde rape case)

नाशिकमध्ये मीडियाशी संवाद साधताना विनायक मेटे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. धनंजय मुंडे यांचा विषय हा अकस्मात पुढे आलेला आहे. ही मुंडे यांची खासगीबाब आहे. त्यांचा पक्ष त्याबाबत निर्णय घेईल. शरद पवार हे जाणते राजे आहेत. ते योग्य निर्णय घेतील, असं मेटे म्हणाले.

भाजप नेत्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तुम्हीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार का? असा सवाल मेटे यांना करण्यात आला. त्यावर, भाजपने काय मागणी करावी हा त्यांचा प्रश्न आहे. सध्या हे प्रकरण पोलिसांकडे आहे. पोलिसांच्या चौकशीनंतर आम्ही भूमिका स्पष्ट करू, असं सांगत त्यांनी थेट भूमिका घेण्यास नकार दिला.

बैठक सकारात्मक, पण निर्णय नाही

यावेळी मराठा आरक्षणावरून मेटे यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली. 7 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली होती. ही बैठक सकारात्मक पार पडली. पण मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या एकाही निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही, हे दुर्देव आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे त्यांचे सहकारी मंत्री ऐकतात का? हाच प्रश्न आहे, असं मेटे म्हणाले. मुख्यमंत्र्यांची बैठक एका अर्थाने निरर्थक ठरल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकला

यावेळी त्यांनी एमपीएससी परीक्षेचा निर्णय पुढे ढकलावा, रखडलेल्या नियुक्त्यांचा निर्णय त्वरीत घ्यावा नाही तर आम्हाला मार्ग बदलावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांनी पायउतार होण्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. (vinayak mete reaction on dhananjay munde rape case)

 

संबंधित बातम्या:

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही, शरद पवारांची आजही रोखठोक भूमिका

Dhananjay Munde Case : म्हणून धनंजय मुंडेंवरील आरोप ‘गंभीर’ असल्याचं म्हणालो, शरद पवारांचं स्पष्टीकरण

ज्या मुद्द्यावरून वाद आहेत त्यापासून दूर राहणं हेच शहाणपणाचं; राम मंदिर मुद्द्यावरुन पवारांचा राज्यपालांना टोला

(vinayak mete reaction on dhananjay munde rape case)