मुंबई : बाळासाहेबांची काल जयंती होती, पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) त्यांनी काल महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांशी (Shivsena) संवाद साधला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आणि मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन परिणामकारक होतं त्यामुळेच भारतीय जनता पक्षाच्या (Bjp) नेत्यांचा जळफळाट सुरू झालाय त्यातूनच त्यांची प्रतिक्रिया येते. सत्ता मिळत नाहीये त्यामुळे तडफडणारा मासा कसा असतो, असे भाजपवाले तडफडत आहेत अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांचे भाषणात शिवसैनिकांचा उत्साह वाढवणारे होते. त्यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत, पक्षवाढीसाठी निवडणूक जिंकण्यासाठी कशा पद्धतीने काम करायचं हे त्यांनी सांगितले आहे, असे विनायक राऊत म्हणाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर भाजप नेत्यांनी टीका करत तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यावर आता शिवसेना नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत.
शिवसेना देशात पसरतेय याची भाजपला भिती
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या आशीर्वादाने शिवसेना संघटन सर्व महाराष्ट्रात पसरली आहे, देशांमध्येसुद्धा आता वाढत आहोत त्यामुळेच भारतीय जनता पक्षाला भीती वाटू लागली आहे, असेही ते म्हणाले आहेत. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी मातोश्रीवर शब्द देऊन सुद्धा कशी पलटी मारली आहे हे सर्वांनी बघितलं आहे. भारतीय जनता पक्षाची ओळख विश्वास घातकी अशी आहे. तसेच शिवसेनेचे हिंदुत्व कसे आहे त्याची जाण देशाला आणि सर्वांना आहे काल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आम्ही हिंदुत्व सोडलेला नाही, हिंदुत्वाच्या नावावर ज्यांनी ठेकेदारी सुरू केली त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवत आहोत. शिवसेनेचे हिंदुत्व भाजपच्या हिंदुत्वाप्रमाणा बेगडी नाही. हिंदुत्व आमचा श्वास आहे, असे सांगितल्याचे ते बोलले.
राज्यपालांचा दुरुपयोग पक्ष वाढीसाठी
राज्यपालांचा दुरुपयोग पक्षवाढीसाठी कुठे असेल तो या महाराष्ट्रात होतंय. ऊठसूट मुंबई महापालिकेच्या कामापासून ते राज्याच्या प्रश्नांच्या बाबतीत राज्यपालांकडे तक्रार करणार हे लोकशाहीची थट्टा करण्याचं काम भाजपचे नेते करत आहेत, अशी घणाघाती टीका त्यानी केली आहे. तसेच थकित वीजबिलाची वसुली झालीच पाहिजे, त्याच्यावर सरकारने मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. यात दोन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. थकीत वीजबिल ऊर्जा विभागाची समस्या आहे. कोळशाच्या पुरवठ्याच्या संदर्भात आम्ही केंद्र सरकारकडे महाराष्ट्रावर केंद्राने अन्याय करू नये अशी मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.