वर्धा : शैलेश मडावी (Shailesh Madavi) याने सावंगी पोलीस (Sawangi Police) ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. त्याप्रकरणी त्याच्यावर 2018 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तेव्हापासून तो फरार होता. अखेर सावंगी पोलिसांनी मुंबई येथे जात त्याला अटक केली. सावंगी पोलीस मुंबई येथे पोहोचले असता त्यांना आरोपी शैलेशचा थांगपत्ता नव्हता. तब्बल तीन दिवस पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचा शोध घेतला. शैलेश हा मिळेल ते काम करून फुटपाथवर राहत होता. कल्याण, दादर, मुंब्रा असा फिरत असल्याची माहिती होती. अखेर पोलिसांनी फुटपाथवरील काही मुलांना त्याचा फोटो दाखविला असता शैलेश हा मुंब्रा रेल्वेस्थानकावर दिसल्याचे त्यांनी सांगितले. अखेर पोलीस मुंब्रा रेल्वेस्थानकावर (Mumbra Railway Station) गेले आणि फुटपाथवर बसून असलेल्या आरोपी शैलेशला अटक केली.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून आरोपी पसार झाला होता. मागील तीन वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्या आरोपीचा सावंगी पोलिसांनी अटक केलीय. आरोपीला सावंगी पोलिसांनी मुंबई येथून ताब्यात घेतले. हा आरोपी मुंबई येथे फुटपाथवर वास्तव्यास होता. साटोडा येथील शैलेश देवीदास मडावी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
तीन वर्षांपूर्वी शैलेशने एका युवतीचा विनयभंग केला. त्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलीस अटक करतील, या भीतीने तो गावाबाहेर गेला. पण, तो कुठे आहे, याचा पत्ता लागत नव्हता. तीन वर्षांनंतर तो मुंबईत असल्याचं कळलं. पोलीस तीन दिवस त्याचा शोध घेत होते. शेवटी तो मुंब्रा रेल्वेस्थानकावर सापडला. गेली तीन वर्षे तो भटकत होता. मिळेल ते काम करून दिवस काढत होता. फुटपाथवर दिवस काढत होता. आधी केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त करत होता. पण, परत आल्यास पोलीस आपल्याला अटक करतील, अशी त्याला भीती होती. त्यामुळं तो काही घरी परत येत नव्हता. शेवटी पोलीस तिथं गेले नि त्याला ताब्यात घेतले.