वर्धा : चोर कशी चोरी करेल काही सांगता येत नाही. रस्त्यावर मोबाईलनं बोलणदेखील धोकादायक झालं आहे. एक युवक मोबाईलवर बोलत होता. त्या मोबाईलवर चोरट्यांची नजर गेली. असा मोबाईल हवा म्हणून त्यांनी चक्क चोरी केली. आता हे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात आडकले आहेत. वर्धेच्या सिव्हील लाईन परिसरातील ही घटना आहे. अनिकेत पवार भावी पत्नीसोबत रस्त्याच्या कडेला उभे राहून फोनवर बोलत होते. त्यावेळी चाकूचा धाक दाखवीत थेट महागडा मोबाईल बळजबरी पळविण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना शहर पोलिसांनी (City Police) अटक केली आहे. रितेश गजानन जाधव (Ritesh Jadhav) (वय 20) व अजीज शेख शाहिद शेख (Shahid Sheikh) (26, दोन्ही रा. आनंदनगर तारफैल वर्धा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
वर्धेच्या यशवंत कॉलनी येथील अनिकेत प्रमोद पवार हे इंजिनिअर आहेत. पुणे येथे नोकरीवर आहेत. सध्या ते वर्क फॉर्म होम करीत आहेत. 11 जूनला रात्रीच्या सुमारास जेवण झाल्यावर फोनवर भावी पत्नीसोबत बोलत होते. फोनवर बोलत बोलत ते सिव्हील लाईन भागातील जलतरण तलाव समोर आले. दरम्यान, दुचाकीने आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना पवनारकडे जाणाऱ्या मार्गाची विचारणा केली. एवढ्यातच दोघांनी चाकूचा धाक दाखवून अनिकेत याच्या जवळील 20 हजार रुपये किमतीचा मोबाईल बळजबरी चोरून नेला. त्यानंतर अनिकेत यांनी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.
चाकूचा धाक दाखवत मोबाइल पळविणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. भावी पत्नीसोबत फोनवर बोलत होता. चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत मोबाईल पळविला. वर्धेच्या सिव्हिल लाईन परिसरातील ही घटना आहे. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेत तपासाला गती दिली. तपासादरम्यान पोलिसांनी रितेश जाधव व अजीज शेख शाहिद शेख यास ताब्यात घेतले. विचारपूस केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या चोरट्यांच्या भीतीने रस्त्यानं जात असताना कुणाचा फोन आला तर बोलायचंही नाही का, असा प्रश्न पडला आहे. अशा चोरट्यांना जेलची हवा दाखविल्याशिवाय काही हे वटणीवर येणार नाही.