Wardha Crime : हिंगणघाट जळीत कांड प्रकरणी न्यायालय 5 फेब्रुवारीला सुनावणार निकाल

| Updated on: Jan 21, 2022 | 5:19 PM

नंदोरी चौकातून कॉलेजच्या दिशेने जाताना आरोपी विकेश नगराळे दबा धरून बसला होता. अंकिता दिसताच विकेशने अगोदरच दुचाकीतील पेट्रोल काढलेली पेट्रोल तिच्यावर ओतली आणि तिला पेटवून टाकले. यात गंभीररीत्या जळालेल्या अवस्थेत नागपूरातील ऑरेंजसिटी रुग्णालयात अंकितावर उपचार सुरू झाले.

Wardha Crime : हिंगणघाट जळीत कांड प्रकरणी न्यायालय 5 फेब्रुवारीला सुनावणार निकाल
हिंगणघाट जळीत कांड प्रकरणी न्यायालय 5 फेब्रुवारीला सुनावणार निकाल
Follow us on

वर्धा : हिंगणघाट येथील जळीत कांड प्रकरणात दोन्ही बाजूने होणारा युक्तिवाद संपल्याने न्यायालयात कामाकाज अंतिम टप्प्यात आले आहे. कोरोनामुळे या प्रकरणाची सुनावणी लांबली होती. मात्र 5 फेब्रुवारीला प्रकरणाचा निकाल न्यायालय सुनावणार आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपीने गुन्हा केला की नाही हे आता न्यायालय ठरवणार असल्याची उज्वल निकम यांनी सांगितले. 3 फेब्रुवारी 2020 रोजी आरोपी विकेश नगराळे शिक्षिकेला याने पेटविले होते. त्यानंतर 10 फेब्रुवारीला उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. या प्रकरणात शासनाने उज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. घटनेपासून आरोपी विकेश नगराळे कारागृहात आहे. आतापर्यंत प्रकरणात 29 साक्षीदार तपासण्यात आले आहे. (Wardha hinganghat murder case to be heard in court on February 5)

कॉलेजला जात असताना पीडितेला पेट्रोल टाकून जाळले होते

मृतक अंकिता ही हिंगणघाटच्या स्व.आशा कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यकरत होती. यामध्ये पीडिता 3 फेब्रुवारीला 2020 ला सकाळी आपल्या घरातून बसने हिंगणघाटला पोहचली. नंदोरी चौकातून कॉलेजच्या दिशेने जाताना आरोपी विकेश नगराळे दबा धरून बसला होता. अंकिता दिसताच विकेशने अगोदरच दुचाकीतील पेट्रोल काढलेली पेट्रोल तिच्यावर ओतली आणि तिला पेटवून टाकले. यात गंभीररीत्या जळालेल्या अवस्थेत नागपूरातील ऑरेंजसिटी रुग्णालयात अंकितावर उपचार सुरू झाले. मात्र आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 10 फेब्रुवारीला तिने अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला.

आरोपीविरुद्ध 426 पानांचे दोषारोप

या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणात महिला तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी कार्यालयीन कामकाजाच्या 19 दिवसांत दोषारोप पत्र पूर्ण केले. शिवाय शुक्रवार 28 फेब्रुवारीला या प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्याविरुद्ध तब्बल 426 पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले होते.

खटल्याचा निकाल जलदगतीने लागावा यासाठी उज्वल निकम यांची नियुक्ती

या खटल्याचा निकाल जलदगतीने लागावा या दृष्टीने उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत 29 साक्षीदार तपासण्यात आले आहेत. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थिती जाण्या पुराव्याच्या आधारे आरोपीने गुन्हा केला की नाही हे आता न्यायालय ठरवणार असल्याची माहिती सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली. आरोपी विकेश नगराळेचे वकील यांनी दोन्ही पक्षाचे लेखी आणि मौखिक युक्तिवाद संपला असून न्यायालय 5 तारखेला निर्णय देणार असल्याच सांगितले.

या प्रकरणानंतर राज्यात शक्ती कायदा आणला

हिंगणघाट येथील बहुचर्चीत असलेल्या जळीतकांड प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरले होते. आता या प्रकरणाचा निकाल लागणार असून सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहे. तर याच प्रकरणानंतर राज्यात शक्ती कायदा आणण्याचे सांगण्यात आले होते. हिवाळी अधिवेशनात हा कायदा विधिमंडळात मंजूर सुद्धा करण्यात आला. (Wardha hinganghat murder case to be heard in court on February 5)

इतर बातम्या

Nagpur Crime | रामटेकमधील दुहेरी खुनाचा उलगडा; कुऱ्हाडीने वार करून फेकले होते, नेमकं काय घडलं?

Anil Deshmukh : सचिन वाझेनी घेतली अनिल देशमुखांची शाळा, उलट तपासणीत काय घडलं; वाचा टू द पॉईंट