रत्नागिरी : एकीकडे मुसळधार पावसाचा अंदाज तर दुसरीकडे पावसाच्या पाण्याचा फटका कोकण किनारपट्टीला बसण्याची शक्यता आहे. मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर आता समुद्राने सुद्धा रौद्ररूप धारण केले. आज सकाळपासून समुद्र खवळलेला आहे. तिकडे दमदार पाऊस तर दुसरीकडे समुद्राच्या लाटांचे रौद्ररूप किनारपट्टी भागात पाहायला मिळते. (Warning of heavy rains along the Konkan coast Waves more than three and a half meters high will rise in the sea)
आज दुपारनंतर साडेतीन मीटर उंचीच्या लाटा किनारपट्टी भागात पाहायला मिळणार आहेत. मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर अमावास्येचं हे पहिले उड्डाण असणार आहे. किनारपट्टी भागात आज साडेतीन मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात अलर्ट जारी केलाय.
हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण किनारपट्टी परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिलाय. त्यामुळे मुंबई आणि कोकणत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल मुंबईला जोरदार पावसाने झोडपलं. आजही मुंबईत पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.
(Warning of heavy rains along the Konkan coast Waves more than three and a half meters high will rise in the sea)
पाहा व्हिडीओ :
हे ही वाचा :
Mumbai Rain Live Updates | 13 जूनपर्यंत मुंबई, कोकणात अतिवृष्टीचा इशारा, ऑरेंज अलर्ट जारी
Video : पावसाचं रौद्ररुप, नदीला पूर, दोन तरुण दुचाकीसह पुरात वाहून गेले, पण…..