Accident VIDEO | वाशिमच्या जिल्हा सत्र न्यायाधीशांच्या गाडीला अपघात, 10 फूट खोल गाडी कोसळली, न्यायाधीश किरकोळ जखमी

| Updated on: May 06, 2022 | 8:48 AM

रात्रीच्या वेळी वळणावर रिफ्लेक्टर नसल्याने बहुतांश नवीन चालकाला पुढे वळण आहे हे लक्षात येत नाही. त्यामुळे या वळणावर रिफ्लेक्टर व दोन्ही बाजूंनी गतीरोधक बसविण्याची मागणी प्रवाशी वर्गाकडून होत आहे.

Accident VIDEO | वाशिमच्या जिल्हा सत्र न्यायाधीशांच्या गाडीला अपघात, 10 फूट खोल गाडी कोसळली, न्यायाधीश किरकोळ जखमी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

वाशिम | राज्यातील रस्ते अपघातांचं (Road Accident)  सत्र सुरूच असून काल रात्री वाशिममध्ये (Washim Accident) एक गंभीर अपघात घडला. वाशीम येथील जिल्हा सत्र न्यायाधीशांच्या (District Judge Accident) गाडीलाच हा अपघात झाला. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. रात्री दहा वाजेच्या सुमारास वाशीम पुसद रोडवर जागमाथा वळणावर हा अपघात झाला. यात न्यायाधीश रचना तेहरा यांच्यासह चालक किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्तळी पोहोचली. दोन्ही अपघातग्रस्तांना उपचारासाठी त्वरीत मदत मिळाली. सध्या वाशीम येथील श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आले आहे. वाशीम येथील जागमाथा वळणावर अनेकदा अपघात घडले असून या मार्गावर गतीरोधक बसवण्याची मागणी नागरिकांनी अनेक वेळा केली आहे.

नेमकी कुढे घडली घटना?

गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडलेल्या या अपघातात न्यायाधीशाचे वाहन मंगरुळपीरहून वाशीमच्या दिशेने येत होते. या मार्गावर जागमाथा येथील वळण मार्गावर चालकाचा अंदाज चुकला. त्यामुळे न्यायाधीश प्रवास करत असलेल्या स्वीफ्ट डिझायक गाडी क्रमांक एम.एच.२६ ए.के ७४८८ ही रस्त्याच्या कडेला १० फुट खोल जावून खांबाला धडकली.सुदैवाने यात चालक आणि न्यायाधीशांना गंभीर जखम झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच वाशीम शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींचा बाहेर काढून पुढील उपचारासाठी वाशीम येथे रवाना केले.

गतिरोधक बसवण्याची मागणी

वाशीम-पुसद मार्गावरील जागमाथा वळणावर असलेल्या खांबावर यापुर्वीही अनेक अपघात झाले आहेत. यामागचे कारणही नागरिकांनी सांगितले आहे. रात्रीच्या वेळी वळणावर रिफ्लेक्टर नसल्याने बहुतांश नवीन चालकाला पुढे वळण आहे हे लक्षात येत नाही. त्यामुळे या वळणावर रिफ्लेक्टर व दोन्ही बाजूंनी गतीरोधक बसविण्याची मागणी प्रवाशी वर्गाकडून होत आहे.