काही वर्षांपूर्वी आलेला अमिर खानचा 3 इडियट्स चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्या चित्रपटात अवघड प्रसृती करण्यासंदर्भातील दृश्य होते. डॉक्टरांनी व्हिडिओ कॉलिंगने मार्गदर्शन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रसृती यशस्वी केली होती. त्याला साम्य ठरणारी घटना विदर्भात घडली. विदर्भात कॉलेजमध्ये नाही पण शेतात महिलेची प्रसृती झाली. डॉक्टरांच्या ऑपरेशन थिटर ऐवजी खाटीवर खुल्या आकाशात डॉक्टर आणि आशा वर्कर यांनी ही प्रसृती यशस्वी केली. जन्मलेले बाळ आणि त्याची आई सुखरुप आहे. परंतु आईला पुढील उपचारासाठी रुग्णालयता नेण्यात आले. रुग्णालयात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे शेतातून बैलगाडीत मुख्य रस्त्यापर्यंत त्यानंतर शासनाच्या रुग्णावाहिकेतून महिलेला नेले.
वाशिम जिल्ह्यातील इंझोरी शेत शिवारात राहत असलेल्या महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या. सायंकाळच्या सुमारास सास कंट्रोल रूमच्या अजय ढोक यांना फोनवर माहिती मिळाली. एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना होत आहेत आणि तिची प्रकृती गंभीर आहे, असा हा संदेश होता. अजय ढोक यांनी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्राची एएनएम शारदा वेरूळकर यांना संपर्क साधला. दोघांनी घटनास्थळी जाण्यासाठी दुचाकीचा उपयोग केला. महिलेची प्रसृती केली. तोपर्यंत डॉक्टर त्या ठिकाणी आले.
बाळ आणि आईला पुढील उपचाराची गरज असल्याने त्यांना बैलगाडीतून मुख्य रस्त्यावर आणण्यात आले. तिथून 102 रुग्णवाहिकेद्वारे त्यांना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रसंगात अजय ढोक, शारदा वेरूळकर, डॉक्टर शेख आणि स्थानिक आशा वर्कर सुनिता राठोड यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांनी दाखवलेले धाडस आणि तत्परता यामुळे एक महत्त्वाचा जीव वाचवण्यात यश आले.
प्रकृती चिंताजनक नसल्यामुळे बैलगाडीतून नेले. त्यानंतर रस्त्यावर शासनाची रुग्णवाहिका उभी होती.
डॉक्टर शेख म्हणाले, आम्हाला संदेश मिळाल्यानंतर आधी आशा वर्करला पाठवले. त्यानंतर सर्व औषधे घेऊन मी आलो. महिलीची प्रसृती सामान्य झाली. मुलगा आई आणि सुखरुप आहे. या घटनेत आरोग्य विभागाच्या या कार्याचे संपूर्ण जिल्ह्यात कौतूक होत आहे. डॉक्टर आणि आशा वर्कर यांच्या सेवाभावाला सलाम केला जात आहे. हा प्रसंग ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेच्या तत्परतेचे जिवंत उदाहरण आहे.