वाशिम – सोयाबी आणि कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी गेल्या तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सोयाबीनला 8 हजार तर कापसाला 12 हजार रुपये भाव मिळावा अशी मागणी तुपकर यांनी केली आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान आता या आंदोलनाला हिंसक वळण लागत असल्याचे पहायला मिळत आहे. तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाशिम जिल्हातील कामरगाव येथील वीज उपकेंद्र पेटविण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्या दुसरीकडे शुक्रवारी रात्री देखील आंदोलस्थळी पोलीस आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्यचे पहायला मिळाले. पोलीस आणि कार्यकर्ते आमने-सामने आल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारानंतर आंदोलनस्थळावरील पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे.
कापसाला 12 हजार रुपये आणि सोयाबीनला 8 हजार रुपये भाव मिळावा, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. सरकारने सोयापेंड आयात केल्यामुळं सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत. पाऊस आणि अतिवृष्टीनं उत्पादनही प्रभावित झाले आहे. त्यामुळे सोयाबीन आणि कापसाचे भाव वाढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई न देणाऱ्या पीकविमा कंपन्यांवर कारवाई करावी, वीजबिल थकलेल्या शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापू नये, अशा विविध मागण्यांसाठी तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.
…अन् तुपकरांच्या आईने फोडला हंबरडा; माझ्या मुलाचे काही बरे-वाईट झाल्यास सरकार जबाबदारhttps://t.co/iwalRwtftQ#RajuShetty #ravikanttupkar #RavikantTupkaragitation
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 20, 2021
संबंधित बातम्या
‘निवडणुकीत हरवा, भाजपची जिरवा’, काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांची मोदींच्या घोषणेवर बोचरी टीका
Kisan Andolan News: हुकूमशहा राज्यकर्त्यांचं गर्वहरण झालं, सोनिया गांधींची मोदींवर सडकून टीका