नाशिकः महापालिका निवडणूक दोन महिन्यांवर आलीय. मात्र, अजूनही महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर देणे भाजप नगरसेवकांनी सुरूच ठेवले असून, त्यांनी बुधवारी तर Water Grace कंपनीच्या घोटाळ्याचे बिंग फोडले. त्यामुळे महापालिकेच्या महासभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले. त्यांची उत्तरे देता-देता महापौरांच्या नाकी नऊ आले. येणाऱ्या काळातल्या संघर्षाची ही चुणूक मानले जाते आहे.
काय आहे प्रकरण?
नाशिक शहरातील स्वच्छतेचे कंत्राट Water Grace कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने कर्मचाऱ्यांची लूट केल्याचे समोर आले आहे. कंपनीने शेकडो कर्मचाऱ्यांना कामावर घेतले आहे. त्यांना कागदावर प्रत्येक महिनाकाठी 20 ते 22 हजार रुपयांचे वेतन दिले. मात्र, कंत्राटदार केवळ 8 ते 9 हजार रुपये कर्मचाऱ्यांना देत आहे. याची कागदपत्रे भाजपच्या नगरसेवकांनी मिळवली आहेत. त्याच्याच जोरावर शहर स्वच्छतेच्या कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप करत त्यांनी बुधवारी महापालिकेच्या महासभेत प्रचंड गोंधळ घातला. सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आक्रमक झाल्याचे पाहून त्यांना विरोधकांनी साथ दिली. त्यामुळे महासभेत आज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला.
संचालक भुजबळांचा निकटवर्तीय
Water Grace कंपनीचा संचालक हा पालकमंत्री छगन भुजबळ यांचा निकटवर्तीय आहे, असा आरोप यावेळी नगरसेवकांनी केला. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यासाठी कंत्राटदाराने पैसे घेतल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला. तरीही या कर्मचाऱ्यांना अपुरे वेतन दिले जात आहे. त्यांचा महापालिकेत छळ सुरू आहे. या साऱ्या कृष्णकृत्याला कुणाचा आशीर्वाद आहे, असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला. याप्रकरणी तातडीने दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.
यापूर्वीही 15 हजार केले वसूल
Water Grace कंपनीने महापालिकेच्या स्वच्छता कामासाठी 2020 मध्ये भरती केली. त्यावेळी जवळपास सातशे कामगारांची भरती सुरू करण्यात आली. नोकरी भरतीसाठी प्रत्येक कामगाराकडून 15 हजार रुपये वसूल केले जात असल्याचा आरोप झाला. कंत्राटदाराने सुरू केलेली वसुली नियमबाह्य आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी म्युनिसीपल कर्मचारी कामगार सेनेने महापौर सतीश कुलकर्णी यांच्याकडे केली होती. विशेष म्हणजे ही रक्कम कामगारांनी आठ-दहा दिवसांत नोकरी सोडल्यास अनामत म्हणून घेण्यात येत आहे. कंपनीमार्फत त्यांना दोन गणवेश, हँडग्लोज, गमबूट, कचरा उलणम्यासाठी व्हील बरोज, जीपीएस यंत्रणेसाठी हा खर्च असल्याची कबुलीही कंपनीने दिली होती. मात्र, त्यानंतरही कंपनीवर काहीही कारवाई झाली नव्हती, हे विशेष.
पुन्हा एकदा घरचा आहेर
महापालिकेतील भाजप सत्ताधाऱ्यांना यापूर्वीही घरचा आहेर मिळाला आहे. त्यात भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी काही दिवसांपूर्वी एक ‘लेटर बॉम्ब’ टाकून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची विनंती केली. त्यानंतर हे काम खराब झाल्याचे म्हणत चौकशीची मागणी केली. इतर नगरसेवकांनीही सत्ताधाऱ्यांना वारंवार खंडित गाठले आहे. त्यामुळे महापालिकेत सत्ताधारीही भाजप आणि विरोधकही भाजप असेच चित्र निर्माण झाले आहे.
Health Care : फळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक, वाचा अधिक!https://t.co/utzB0ZkKLN | #Healthcare | #Water | #dangerous | #Healthcaretips | #lifestyle |
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 15, 2021
इतर बातम्याः
Nashik| तरुणांना मिळणार मोफत निवासी वाईन प्रशिक्षण; काय आहे पात्रता, घ्या जाणून!