आम्ही नवाज शरीफ यांचा केक कापून आलो नाही, मोदींवर आदित्य ठाकरे यांची खोचक टीका

| Updated on: Sep 06, 2024 | 4:10 PM

आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नवाज शरीफ यांचा केक कापून आम्ही आलो नाही असं ते म्हणाले. सरकार पडलं हे खूप वाईट झालं असं ही ते म्हणाले.

आम्ही नवाज शरीफ यांचा केक कापून आलो नाही, मोदींवर आदित्य ठाकरे यांची खोचक टीका
Follow us on

आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचा महासंकल्प या टीव्ही ९ मराठीच्या विशेष कार्यक्रमात बोलताना भाजपवर जोरदार टीका केली आहे. शिंदे गटावर ही त्यांनी टीका केलीये. आदित्य ठाकरे म्हणाले की, आपल्याला आपल्या धर्माचा अभिमान असलाच पाहिजे. पण तो आपण कुणावर लादता कामा नये. किती रोजगार दिले, शाश्वत शेती किती दिली, बेरोजगारी कशी दिली, शिक्षणात किती प्रगती केली हे राजकारणात आलं पाहिजे. मी निर्लज्ज मंत्र्यासारखं बोलणार नाही. सरकार पडलं ते वाईट झालं. महाराष्ट्र मागे गेला. अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

‘भावी मुख्यमंत्रीचे स्वप्न पाहत नाही’

भावी मुख्यमंत्री म्हणून बोर्ड लागतात त्याकडे दुर्लक्ष करतो. कार्यकर्त्यांना फोन करून सांगतो होर्डिंग उतरवा. स्वप्न पाहून चालत नाही. ते जनतेचं स्वप्न पाहिलं पाहिजे. उद्धव ठाकरेंना कुटुंबप्रमुख म्हणून पाहिलं जातं. अनेक लोकं असतील भाजपमधील किंवा इतर पक्षातील असतील ते म्हणतात, उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळा राज्यासाठी चांगला होता. विश्वासू नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहे असं लोक म्हणतात. कारण त्यात उद्धव आहे, बाळासाहेब आहे आणि ठाकरेही आहे. असं आदित्य ठाकरे म्हणाले.

देशावर हल्ला करणाऱ्यांचा केक कापला – आदित्य ठाकरे

सबका साथ सबका विकास ही त्यांची लाईन होती. पण ते आम्ही करत आहोत. अडीच वर्षाच्या काळात राज्याला कसं पुढे न्यायचं हे उद्धव ठाकरे यांनी दाखवलं. त्यामुळे लोक आमच्यासोबत येत आहेत. आम्ही नवाज शरीफ यांचा केक कापून कधी आलो नाही. ज्यांनी आपल्या देशावर हल्ला केला त्यांचा केक कापला नाही. त्यांना मिठी मारली नाही. नवाज शरीफला मिठी मारणारा उद्धव ठाकरे यांचा एक तरी फोटो दाखवा. आम्ही आमच्या देशातील मुस्लिमांसोबत असतो. अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

आमच्यावर बोलण्यासाठीच राणेंना पगार मिळतो. त्यामुळे आम्ही काही बोलत नाही. त्यांच्याकडे लक्ष देत नाही. फडणवीस यांना आज बीएमसी आयुक्तांना पत्र लिहावं लागलं आहे. तुम्ही हाफ डीसीएम आहात. पत्र कशाला लिहिलं. बदलापूरची घटना घडली तेव्हा गृहमंत्री कुठे असतात. पोलीस हौसिंगची घटना घडते तेव्हा गृहमंत्री महोदय कुठे असतात. वामन म्हात्रेला अटक का होत नाही गृहमंत्री महोदय, आपटेला उशिरा का अटक केली.

आम्ही सिलेक्टिव्ह आहोत म्हणून आम्ही महायुतीकडून बाजूला गेलो. महाविकास आघाडीला सिलेक्ट केलं. बदलापूरच्या आंदोलनात एकही बॅनर नव्हतं. एकही राजकीय कार्यकर्ता नव्हता. सहा दिवसानंतर गुन्हा दाखल झाला. महिलांसाठी, मुलींसाठी कुणी काही केलं तर ते राजकीय कसं होऊ शकतं. राजकारणच देशात बदल घडवू शकतो. त्यामुळे आम्ही राजकारण करूच.