मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात थंडी दिसून आली. त्यानंतर आता हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईचा पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी प्रजासत्ताक दिनापासून ते पुढच्या दोन दिवसांमध्ये किमान तापमानासह जास्तीत जास्त तापमान कमी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामानातल्या या बदलांमुळे मुंबई, पुण्यासह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये थंडी वाढणार आहे. (Weather Alert cold in Mumbai Pune and possibility of rain in 2 days in marathwada vidarbha)
पुण्यातही पुढचे दोन दिवस कोरड्या हवामानाची शक्यता आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पार दोन अंश सेल्सिअसने घसरेल असा अंदाज रविवारी हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुंबईचे किमान तापमान गुरुवारीपासून सातत्याने कमी होताना दिसून आलं. पूर्वोत्तर भागातून थंड हवा वाहू लागली आहे. याचा परिणाम मुंबईच्या किमान आणि जास्तीत जास्त तपमानावर होईल. तापमान एक ते दोन अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल. तर आठवडाभर असंच तापमान असेल असाही इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
मराठवाडा आणि विदर्भात पाऊस
खरंतर, मराठवाडा ते बिहार दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील वातावरणातही बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या गुरुवारी मराठवाडा आणि विदर्भाच्या काही महत्त्वाच्या भागांमध्ये आणि घाटमाथ्यावर पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता बदलत्या हवामानाविषयी बोलायचं झालं तर गेल्या 6 महिन्यापासून वारंवार हवामानात बदल होत आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचं वातावरण तयार झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम हवामानावर होतो. यामुळे थंडी आणि पाऊस असं वातावरण सध्या सुरू आहे.
Min temp recorded in N Madhya Mah and adjoining areas on 25 Jan Morning.
Jalgaon 10, Nashik 10.4, Malegaon 12.2, Pune 13.6, Satara 15.5
Dahanu 18.2, Thane 18.6, Santacruz 16.4°C
Fall in min temp trend to continue for next 48 hrs in north Mah.@RMC_Mumbai— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 25, 2021
कोरड्या हवामानामुळे राज्यात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडल्याचं पाहायला मिळालं. यामुळे किमान तापमानातही घट झाली आहे. अशात उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये वातावरणात वेगाने बदल होताना दिसत आहे. देशात अनेक राज्यांमध्ये तर अद्यापही पाऊस सुरू आहे. राज्यातही फेब्रुवारी महिन्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.
भारतीय हवामान खात्याने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, चार आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार 5 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे. यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याध्ये तुरळक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे शेतीला धोका पोहोचण्याची अधिक शक्यता आहे. सध्या आंबा आणि काजू पिकासाठी वातावरण आहे. मात्र, पाऊस पडला तर या पिकाला मोठा धोका निर्माण होणार आहे. आंबा, भाजीपाला आणि इतर पिकांवर तुडतुडा आणि भुरी रोगाचा धोका पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेण्याच्या सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत. (Weather Alert cold in Mumbai Pune and possibility of rain in 2 days in marathwada vidarbha)
संबंधित बातम्या –
ओबीसीचा मुख्यमंत्री व्हावा का? पंकजा का म्हणतायत ‘मला थोडं बाजुला ठेवा’!
खडसेंवरील गुन्हा रद्द होणार?; आज कोर्टात सुनावणी
(Weather Alert cold in Mumbai Pune and possibility of rain in 2 days in marathwada vidarbha)