मुंबई: भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागानं पुढील पाच दिवसांसाठीचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे. कमोरिन आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील कमी दाबाचे क्षेत्र आता लक्षद्वीप आणि अरबी समद्राकडे सरकलं आहे. येत्या तीन दिवसात हवामान प्रणाली तीव्र होण्याची शक्यता असल्यानं पुढील चार पाच दिवसात महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात देखील मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. अधिका माहितीसाठी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पुढचे 4-5 दिवस राज्यात विजांच्या गडगडाटासहीत काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 5 दिवसांत अपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढचे 4-5 दिवस राज्यात वीजांच्या गडगडाटासहीत काही ठिकाणी पावसाची शक्यता . येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा . तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3QwEY भेट द्या pic.twitter.com/pZo76JhaT8
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) November 3, 2021
3 नोव्हेंबर:
रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
4 नोव्हेंबर
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आलाय.
5 आणि 6 नोव्हेंबर
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आलाय.
7 नोव्हेंबर
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आलाय.
पुढचे 4-5 दिवस राज्यात वीजांच्या गडगडाटासहीत काही ठिकाणी पावसाची शक्यता . येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा . तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3QwEY भेट द्या pic.twitter.com/pZo76JhaT8
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) November 3, 2021
इतर बातम्या:
अमरावतीत आर्थित विवंचनेतून शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या, मन सुन्न करणारी सुसाईड नोट समोर
ही तर सैतानाचा अवतार, नग्न करुन महिलेचा बळी देण्याचा प्रयत्न, रडण्याच्या आवाजाने शेजाऱ्यांचा थरकाप
‘अंबानी, RSS व्यक्तीची फाईल मंजूर करण्यासाठी दबाव होता, 300 कोटींची लाच देऊ केली’
Weather Forecast imd predict rainfall in south kokan south Maharashtra and Marathwada within next four days