मुंबई: देशाची राजधानी नवी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. नवी दिल्लीत पाणी तुंबल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. आजही नवी दिल्लीत सुरु असलेल्या पावसानं पाणी तुंबल्याचं समोर आलं आहे. तर, भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील काही तासात बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्यानं मुसळधार पाऊस होऊ, शकतो, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे.
राजधानी नवी दिल्लीत गेल्या काही दिवासंपासून सातत्यानं जोरदार पाऊस पडतोय. गेल्या काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या निवासस्थानी पाणी शिरल्याचं समोर आलं होतं. आज संततधार पावसामुळं दिल्लीच्या विविध भागाता पाणी तुंबल्याचं समोर आलं आहे. प्रामुख्यानं मोती बाग आणि आर के पुरम या भागात पावसाचं पाणी तुंबल्याची छायाचित्र एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रकाशित केली आहेत.
Continuous rain causes waterlogging in several parts of Delhi; visuals from Moti Bagh and RK Puram. pic.twitter.com/HpXtex5w7w
— ANI (@ANI) September 11, 2021
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ते वेस्ट-नॉर्थ वेस्ट दिशेने सरकण्याची शक्यता आहे. यामुळे त्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. यामुळे राज्यात येत्या 4, 5 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात यामुळं ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विविध जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अॅलर्ट जारी करण्यात आले आहेत.
10Sept,बंगालच्या उपसागरात येत्या २४तासात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची व त्याची वेस्ट-नॉर्थ वेस्ट दिशेने सरकण्याची शक्यता.पुढच्या ४८तासात,अजून तीव्र होण्याची शक्यता.याचा परीणामामुळे राज्यात येत्या 4,5दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.मुसळधार ते अतीमुसळधार काही ठिकाणी
-IMD pic.twitter.com/85Lz4CQsRP— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 10, 2021
भारतीय हवामान विभागानं रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट दिला असून तिथं मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, दुसरीकडे पुणे, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागानं रविवारी रायगड, रत्नागिरीला ऑरेंज अॅलर्ट तर, पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला यलो अॅलर्ट दिला आहे.
हवामान विभागानं सोमवारसाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, परभणी, हिंगोली, नंदूरबार, भंडारा आणि गडचिरोलीला यलो अॅलर्ट दिला आहे.
हवामान विभागानं मंगळवारी पालघर, ठाणे, रायगड,पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, परभणी, हिंगोली नंदूरबार, जळगाव, धुळे, भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अॅलर्ट दिला आहे.
इतर बातम्या:
PHOTOS : महाराष्ट्रात पावसाचं थैमान, ढगफुटी, पूर, दरडी कोसळल्या, घर-दुकानातही पाणी, पाहा फोटो
Weather Forecast water lodging in New Delhi due to rain IMD issue heavy rain fall during next four days for Maharashtra