वेदर रिपोर्ट : पुढील दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण; काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता

| Updated on: Mar 09, 2022 | 10:21 AM

येत्या दोन -तीन दिवसांत महाराष्ट्राच्या (maharashtra) अनेक भागात पावसाची शक्यता आहे. तसा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार मंगळवारी राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

वेदर रिपोर्ट : पुढील दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण; काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : येत्या दोन -तीन दिवसांत महाराष्ट्राच्या (maharashtra) अनेक भागात पावसाची शक्यता आहे. तसा अंदाज हवामान विभागाकडून (Meteorological Department) वर्तवण्यात आला आहे. वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार मंगळवारी राज्यात अनेक ठिकाणी पावसाने (Rain) हजेरी लावली. काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. राज्यातील जवळपास सर्वच विभागात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. गुरुवारी उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस झाला. नाशिक तसेच जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यात काल मध्यरात्री पावसाने हजेरी लावली. दरम्यान वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस पावसाची शक्यता कायम आहे. काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. राज्यात पुढील दोन -तीन दिवसांत पावसाची काय स्थिती राहील याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

मुंबई आणि कोकण विभाग

मुंबई आणि कोकणात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे, तसेच काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसामुळे कोकणातील हापूस आंब्याला मोठा फटका बसू शकतो.

उत्तर महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण कायम राहणार असून, काही ठिकाणी हलका ते मध्यम व काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल मध्यरात्रीपासून उत्तर महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली आहे. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

मराठवाडा

मराठवाडात पुढील तीन दिवस हवामान ढगाळ राहणार असून, तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य भारतात पुर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रसह राजस्थान आणि गुजरातमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय. महाराष्ट्रात ताशी 40 कि.मी वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Raj Thackeray in Pune : आज पुण्यात होणार ‘राजगर्जना’ ; वर्धापनदिनासाठी राज्यभरातील कार्यकर्ते शहरात दाखल

इंदुरीकर महाराजांना मोबाईलचा धसका, ऐन कीर्तनात शूटिंग बंद करण्याच्या सूचना

यवतमाळातील आयता गावात गॅस सिलेंडरचा स्फोट, मायलेकीचा होरपळून मृत्यू!