मुंबई: महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात दाणादाण उडवणाऱ्या पावसानं सध्या उसंत घेतली आहे. मात्र, भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने 31 जुलैपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे. राज्यात येत्या शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा जोर वाढेल, असं हवामान विभागाच्यावतीनं सांगण्यात आलं आहे. संपूर्ण कोकण, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पाऊस वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी ट्विट द्वारे ही माहिती दिली आहे.
हवामान विभागानं 31 जुलैपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी करताना विविध जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट, यलो अॅलर्ट जारी केले आहेत. तर, कोणत्याही जिल्ह्यांना रेड अॅलर्ट देण्यात आलेला नाही. 28 जुलै रोजी हवामान विभागानं रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुणे जिल्ह्याला यलो अॅलर्ट दिला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. तर, 29 जुलै रोजी ठाणे, रायगड, सिंधुदर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
27/7, Severe weather warning issued by IMD for 27-31 July for Maharashtra, indicates possibilities of enhancement of rainfall activity on Fri & Sat (30,31Jul) over entire konkan including Mumbai, Thane,Ratnagiri,Sindhudurg,Pune Kolhapur,Satara.
For details pl watch IMD Update pic.twitter.com/N7eCwLBD8G— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 27, 2021
हवामान विभागानं जारी केलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी 30 आणि 31 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे तर, पालघर, मुंबई, ठाणे आणि सिधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
अखेर गोंदिया जिल्हावर वरुण राजा खुश झाला असून रात्रीपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाची रिपरिप सुरूच आहे.त्यामुळेच की घरात कोनाड़यात ठेवलेल्या छत्रा आणि रेनकोट बाहेर निघाले आहेत. गोंदिया जिल्हात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते. जिल्हात भात रोवणीच्या कामाला जोमात सुरुवात झाली आहे, असे असले तरी जिल्हात केवळ 39%पाऊस पडला आहे. गोंदिया जिल्ह्यातील नदी,नाले, तलावात पाणी साठा हव्या त्या प्रमाणात नाही. इतकेच की काय जिल्ह्यात पडलेल्या या पावसामुळे जिल्हातील धरणे आजही 50 टक्के भरली नाहीत. त्यामुळे या पावसाने थोड्या फार प्रमाणात का होईना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून अजून ही दमदार पावसाची अपेक्षा कायम आहे.
इतर बातम्या:
Video | छोट्याशा मुलीचं वेटलिफ्टिंग, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, मीराबाई चानू यांनी केली वाहवा
Weather Update Today IMD predicted rain will be increased in Maharashtra at all districts of Kokan and Pune Satara Kolhapur