मलेशियातील कसिनोत गेल्यावर काय घडलं?; राज ठाकरे यांनी सांगितलेला किस्सा काय?

| Updated on: May 04, 2024 | 9:38 PM

राज ठाकरे यांनी आज कणकणवलीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी अनेक विषयांवर मोदी सरकारचे कौतूक केले. यावेळी त्यांना मलेशियातील एका कसिनोचे उदाहरण दिले. विकासासाठी धर्म आडवा येत असेल तर तो धर्म कसला असं त्यांनी म्हटलंय.

मलेशियातील कसिनोत गेल्यावर काय घडलं?; राज ठाकरे यांनी सांगितलेला किस्सा काय?
Follow us on

Raj Thackeray : जैतापूरच्या प्रकल्पाला विरोध केला. कोकणात प्रकल्प येऊ द्यायचा नाही. नाणारला विरोध झाला. याचा खासदार विरोध करणार. लोकांना भडकवणार. नाणार होणार तिथे जमीन आली कुठून. अनेक दलालांनी जमीन विकत घेतली. मुख्यमंत्री झाल्यावर यांनी म्हटले बारसुला हलवा. आता जमीन कशी सापडली. यांच्याच लोकांनी या जमिनी घेऊन ठेवल्या आहेत. तुमच्याकडे १० रुपयाला घ्यायची आणि सरकारकडून २०० रुपये घ्यायचे. हे सगळे प्रकार सुरु आहे.

कोकण रेल्वे किती वर्षात झाली. तेव्हा असे दलाल फिरत नव्हते म्हणून झाली कोकण रेल्वे. चांगले प्रकल्प यावे अशी सगळ्यांची इच्छा आहे. गोव्यात अख्ख जग जातं. पण कोकणाच्या किनाऱ्यावर ते चित्र दिसलं तर मोठी गर्दी होईल. म्हणे आमची संस्कृती बिघडते. दोन वेळचं जेवन देऊ शकत नाही ती कोणती संस्कृती. पक्ष स्थापनेच्या वेळी मी सांगितलं होतं. मलेशियाला एक जागा आहे. तिथे सुरुवातीला फक्त एक हॉटेल होतं.

मलेशियात गेलो होतो. तिथे एका हॉटेलात थांबलो. तिथे एक कसिनो होता. मी कसिनोमध्ये गेलो. मला जुगार खेळता येत नाही. पाच वर्षातून एकदा गेलो. मी आत गेलो. भिंगऱ्या फिरवत होतो. दहा मिनिटात बाहेर आलो. म्हटलं हड. बाहेर आलो. तिथे बार होता. मी तिथे बसलो. तिथे सहज लक्ष गेलं. तिथे एक मोठी पाटी होती. त्यावर लिहिलं होतं. मुस्लिम्स आर नॉट अलाऊड. मुस्लिमांना परवानगी नाही. मलेशिया हा मुस्लिमांचा देश आहे. आपल्याकडे अशी पाटी लावली असेल हिंदूंना परवानगी नाही. तर काय कराल. पिऊन फोडून टाकाल ना.

मी त्याला विचारलं. कशासाठी. म्हणाला, मुस्लिम धर्मात दारू पिणं चुकीचं मानतात. जुगारही खेळणं निषिद्ध मानतात. मी म्हटलं बार आणि कसिनो कसा. कसं तुम्ही मुस्लिम ओळखता. तो म्हणाला, कायद्याने पाटी लावली आहे. पण सर्वांना येऊ देतो. उत्कर्ष करण्यासाठी एक देश धर्म बाजूला ठेवतो. आपण कोणती संस्कृती घेऊन बसला. बाकीचे राज्य देश पुढे जात आहेत. आपण तारकर्ली घेऊन बसलोय.