महाराष्ट्रात आता युती सरकारचं नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत. निवडणुकीनंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल? याचा फैसला तीनही पक्ष करतील, असं विधान अमित शाहांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी शिराळ्यातील सभेत शाहांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल फडणवीसांचं नाव घेत संकेत दिल्याची चर्चा रंगली होती. राज्यात महायुती आणि फडणीसांना जिंकवून आणण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. मात्र आता शाहांनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निकालानंतर ठरणार असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे शरद पवारांनी सुद्धा मविआत ज्यांचे जास्त आमदार असतील, त्यांच्या प्रतिनिधीला मुख्यमंत्री बनवण्यासाठी प्राधान्य दिलं जाईल, असं म्हटलंआहे. याआधीपर्यंत निवडणुकांआधीच मविआने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यावा यासाठी उद्धव ठाकरे आग्रही होते.
एका मुलाखतीत शरद पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आम्ही सर्व घटक पक्ष एकत्र बसू, ज्यांचे आमदार जास्त त्या पक्षाला मुख्यमंत्रिपदासाठी आम्ही पाठिंबा देऊ. दरम्यान भाजप आणि मविआतल्या तीनही पक्षांचा संयुक्त जाहीरनामाही मांडण्यात आलाय. त्यातल्या काही ठळक वायद्यांवर नजर टाकूयात.
संकल्पपत्र मांडताना अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना काही सवालही केले. त्या प्रश्नावरुनही ठाकरे गट आणि भाजपात वार-पलटवार रंगले. दरम्यान, राहुल गांधीनी दाखवलेल्या संविधानाच्या लाल रंगावरुन देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेवर काँग्रेसनं प्रतिप्रश्न करत उत्तर दिलंय. मोदींनी सुद्दा देशाच्या राष्ट्रपतींनी लालरंगाचंच संविधान दिल्याचा फोटो मल्लिकार्जुन खर्गेंनी दाखवला.