नाशिकः नाशिकमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा विस्फोट झाला असून, बाधितांची संख्या चक्क पाच हजारांच्या पल्याड गेलीय. त्यात सर्वाधिक बाधित नाशिक महापालिका क्षेत्रात 3 हजार 955 आहेत. सोबत निफाड, दिंडोरी आणि सिन्नरमध्येही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे समोर येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 5 हजार 735 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 5 हजार 344 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 765 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
येथे वाढले रुग्ण
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 215, बागलाण 39, चांदवड 27, देवळा 22, दिंडोरी 159, इगतपुरी 85, कळवण 31, मालेगाव 13, नांदगाव 65, निफाड 305, पेठ 2, सिन्नर 113, सुरगाणा 7, त्र्यंबकेश्वर 23, येवला 25 असे एकूण 1 हजार 131 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 3 हजार 955, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 55 तर जिल्ह्याबाहेरील 203 रुग्ण असून, असे एकूण 5 हजार 344 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 19 हजार 844 रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये नाशिक 64, बागलाण 14, चांदवड 7, देवळा 7, दिंडोरी 42, इगतपुरी 34, कळवण 6, मालेगाव 1, नादगाव 24, निफाड 86, पेठ 2, सिन्नर 37, सुरगाणा 4, त्र्यंबकेश्वर 9, येवला 12 असे एकूण 349 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 96.63 टक्के, नाशिक शहरात 96.64 टक्के, मालेगावमध्ये 96.77 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 94.82 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 96.64 टक्के इतके नाशिक ग्रामीणमध्ये आतापर्यंत 4 हजार 251 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक महापालिका क्षेत्रातून 4 हजार 30, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 358 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 765 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
भीती कशाचीय?
ओमिक्रॉनची भीती आणि कोरोनाचा अतिजलद होणारा संसर्ग पाहता राज्याच्या आरोग्य सचिवांनी महापालिकेला एक पत्र पाठविले आहे. त्यात आगामी पाच दिवस नाशिकरांसाठी अतिधोक्याचे ठरू शकतात, असा अंदाज वर्तवला आहे. या काळात कोरोना रुग्णांची संख्या अचानक कितीतरी पटीने वाढू शकते अशी भीती वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात 13 लाख 63 हजार नागरिकांपैकी 12 लाख 64 हजार नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. त्यात एकही डोस न घेणाऱ्यांची संख्या 1 लाखाच्या घरात आहे. यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. सोबतच कोरोनाचे प्रतिबंधक नियम पाळावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीत सन्मानपूर्वक आघाडी, भुजबळांचे संकेत, शिवसेना अन् काँग्रेस राजी होणार का?